loader image
[ays_poll id=7]

मृतदेह रस्त्यावर ठेवत नागरिकांचा रस्ता रोको

Jul 18, 2023


नांदगाव सोमनाथ घोंगाणे

नांदगाव तालुक्यातील जातेगाव येथील कृषी तंत्रनिकेतन विद्यालयाचा विद्यार्थी सागर म्हसू कांदे ( वय १९ ) रा. जळगाव बुद्रुक याचा विद्यालयाच्या आवारातील शेततळ्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. विद्यार्थ्यांच्या मृत्यूस शाळेचा स्टाफ कारणीभूत असल्याचा आरोप करीत नातेवाईकांनी पोलिसांकडे विद्यालयाच्या स्टाफ विरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. पोलिसांनी स्टाफ विरोधात थेट गुन्हा दाखल करण्यास नाकार दिल्याने जळगाव बुद्रुक येथील विद्यार्थ्यांच्या नातेवाईकांनी नांदगाव ते छत्रपती संभाजीनगर रोडवरील गंगाधरी येथील महात्मा फुले सर्कल येथे ‘सागरचा मृतदेह ठेवत रास्ता रोको आंदोलन छेडले’. मृत्यू झालेल्या विद्यार्थ्याच्या संतापलेल्या नातेवाईकांनी ( एन एच ७५३ जे ) महामार्ग अडवून धरल्याने येथे कायदा सुव्यवस्थेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला होता. संतापलेले नातेवाईक खुनाचा गुन्हा दाखल केल्याशिवाय रास्तारोको मागे घेणार नाही या भूमिकेवर ठाम असल्याने, उद्रेकाची शक्यता लक्षात घेऊन पोलिसांनी जमावावर नियंत्रण ठेवण्यासाठी अतिरिक्त कुमक मागवून घेतली होती. परिस्थितीतून मार्ग काढण्यासाठी पोलिसांनी आंदोलन स्थळी गुन्हा दाखल करणार असल्याची लिखित प्रत स्वाक्षरीसाठी आणली होती मात्र आंदोलन करर्त्यांनी ऑनलाइन गुन्हा दाखल होत नाही तोपर्यत मागे हटणार नाही अशी भूमिका घेतली. शेवटी पोलिसांनी आंदोलकांसमोर माघार घेतली व ऑनलाइन खुनाचा गुन्हा नोंदवून घेतला गुन्ह्याची प्रत दाखवल्यावर आंदोलन मागे घेण्यात आले. यावेळी आंदोलकांनी मृतदेहाला रुग्णवाहिकेतून शवविच्छेदनासाठी नेण्यास नकार देत खांद्यावर मृतदेह घेऊन ग्रामीण रुग्णालय गाठले. दीड तास चाललेल्या या आंदोलनामुळे रस्त्याच्या दुतर्फा वाहनांच्या लांब रांगा लागल्या होत्या.
जळगाव बुद्रुक येथील सागर कांदे हा विद्यार्थी जातेगाव येथील सी . के . पाटील तंत्रनिकेतन येथे कृषी विषयक पदवीचे शिक्षण घेत होता नेहमीप्रमाणे सोमवारी सकाळी तो आपल्या दुचाकीवरून विद्यालयात गेला असता येथील शिक्षकांनी सागरला शाळेच्या आवारात असलेल्या शेततळ्यातून मासे पकडण्यासाठी पाठवले मासे पकडत असताना सागरचा बुडून मृत्यू झाला सागर हा पट्टीचा पोहणारा असल्याने त्याचा बुडून मृत्यू होऊ शकत नाही त्याच्या मृत्यू मागे काहीतरी वेगळे कारण असावे असा आरोप नातेवाईकांनी केला मृत्यू झाल्यानंतर सागरला नजीकच्या बोलठाण येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात नेण्यात आले तेथे त्याला मृत घोषित केल्यावर त्याला नांदगाव येथील ग्रामीण रुग्णालयात आणण्यासाठीही विलंब लागला तसेच त्याचे कपडे आणि मोबाईल मिळून न आल्याने त्याच्या नातेवाईकांनी सागरचा घातपात असल्याचा संशय व्यक्त केला व पोलिसांकडे स्टाफ विरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी केली परंतु पोलिसांनी नातेवाईकांना बराच वेळ तिष्टत ठेवून गुन्हा दाखल केला नाही त्यामुळे. पोलिस गुन्हेगारांना पाठिशी घालत असल्याचा आरोप करत जळगाव बुद्रुक येथील ग्रामस्थांनी गंगाधरी येथील फुले सर्कल येथे रास्तारोको केला. पोलीस उपविभागीय अधिकारी सोहेल शेख नांदगाव चे पोलीस निरीक्षक प्रीतम चौधरी तहसीलदार डॉ . सिद्धार्थ मोरे आंदोलन संपेपर्यंत येथे तळ ठोकून होते.

 

 


अजून बातम्या वाचा..

ग्रंथालयांच्या अडचणी सोडवण्यासाठी शासन प्रयत्नशील उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील

ग्रंथालयांच्या अडचणी सोडवण्यासाठी शासन प्रयत्नशील उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील

  पुणे - जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत ग्रंथालयांना अनुदान उपलब्ध करून देण्यासाठी, शासन प्रयत्न...

read more
आंतरराष्ट्रीय खेळाडू मुकुंद संतोष आहेर साईराज राजेश परदेशी यांना महाराष्ट्र शासनाचा जिल्हा गुणवंत खेळाडू पुरस्कार जाहीर

आंतरराष्ट्रीय खेळाडू मुकुंद संतोष आहेर साईराज राजेश परदेशी यांना महाराष्ट्र शासनाचा जिल्हा गुणवंत खेळाडू पुरस्कार जाहीर

राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय वेटलिफ्टिंग स्पर्धांमध्ये सातत्याने उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या मनमाड...

read more
मनमाड येथे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातर्फे पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा तीव्र निषेध.

मनमाड येथे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातर्फे पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा तीव्र निषेध.

मनमाड, दि. २५ एप्रिल २०२५: जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे नुकत्याच घडलेल्या भीषण दहशतवादी हल्ल्याचा...

read more
.