भुसावळ शहरात बायोडिझेल वाहतूक प्रकरणात सह आरोपी न करण्यासाठी तीन लाख रुपयांची लाच घेताना भुसावळ बाजारपेठ ठाण्याचे निरीक्षक राहुल गायकवाड यांच्यासह इतर दोन जणांना धुळे एसीबीच्या पथकाने रंगेहात अटक केली. पोलिस निरीक्षक राहुल गायकवाड, पोलिस नाईक तुषार पाटील, खासगी व्यक्ती ऋषी शुक्ला यांना लाच स्वीकारताच अटक करण्यात आली. पाच लाखांची लाच मागून तीन लाखांवर तडजोड करण्यात आली होती.
मनमाडला २२,२३,२४ रोजी कबड्डीचे सामने रंगणार – नाशिक जिल्हा अजिंक्यपद व चाचणी स्पर्धांचे आयोजन
नाशिक जिल्हा ग्रामिण कबड्डी असो व सम्राट क्रिडा मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने दि.२२, २३, २४...











