भुसावळ शहरात बायोडिझेल वाहतूक प्रकरणात सह आरोपी न करण्यासाठी तीन लाख रुपयांची लाच घेताना भुसावळ बाजारपेठ ठाण्याचे निरीक्षक राहुल गायकवाड यांच्यासह इतर दोन जणांना धुळे एसीबीच्या पथकाने रंगेहात अटक केली. पोलिस निरीक्षक राहुल गायकवाड, पोलिस नाईक तुषार पाटील, खासगी व्यक्ती ऋषी शुक्ला यांना लाच स्वीकारताच अटक करण्यात आली. पाच लाखांची लाच मागून तीन लाखांवर तडजोड करण्यात आली होती.
२०२२ सालात साई बाबांच्या चरणी ४०० कोटींच्या देणग्या
२०२२ यावर्षी श्री साईबाबा संस्थान ट्रस्ट, शिर्डीला ४०० कोटी रुपयांपेक्षा जास्त देणग्या मिळाल्या...











