भुसावळ शहरात बायोडिझेल वाहतूक प्रकरणात सह आरोपी न करण्यासाठी तीन लाख रुपयांची लाच घेताना भुसावळ बाजारपेठ ठाण्याचे निरीक्षक राहुल गायकवाड यांच्यासह इतर दोन जणांना धुळे एसीबीच्या पथकाने रंगेहात अटक केली. पोलिस निरीक्षक राहुल गायकवाड, पोलिस नाईक तुषार पाटील, खासगी व्यक्ती ऋषी शुक्ला यांना लाच स्वीकारताच अटक करण्यात आली. पाच लाखांची लाच मागून तीन लाखांवर तडजोड करण्यात आली होती.
पालकमंत्री भुजबळ यांचा अतिवृष्टी दौरा ठरला वादळी…दौऱ्यांनंतर तहसील कार्यलयात झालेल्या आढावा बैठकीत पालकमंत्री छगन भुजबळ व शिवसेना आमदार सुहास कांदे यांच्यात खडाजंगी….
नांदगाव:- पालकमंत्री भुजबळ यांचा अतिवृष्टी दौरा ठरला वादळी...दौऱ्यांनंतर तहसील कार्यलयात झालेल्या...


