loader image
[ays_poll id=7]

“हिरवी वनराई – हिरवी बेटे” उपक्रमांतर्गत शंभर वृक्षांचे रोपण – मनमाड बचाव कृती समितीचा पुढाकार

Jul 20, 2023

मनमाड – “हिरवी वनराई- हिरवी बेटे” ही संकल्पना अनोखी असून मनमाड शहराला हरित मनमाड बनविण्याबरोबरच पर्यावरण आणि पर्जन्याबाबतच्या दूरदृष्टीलाही कृतीशील चालना देणारी आहे,”असे प्रतिपादन ख्यातनाम डॉक्टर तथा लायन्स क्लबचे अध्यक्ष डॉ.अजय भन्साळी यांनी केले. शहरातील मूकबधिर तथा दिव्यांग मुलांसाठीच्या निगराणी प्रशाळेच्या प्रांगणात मनमाड बचाव कृती समिती, सत्यशोधक मंच आणि जनहित विकास संस्थेमार्फत ” हिरवी वनराई- हिरवी बेटे” या उपक्रमांतर्गत शंभर वृक्षांचे रोपण करून दुसऱ्या क्रमांकाचे बेट तयार करण्याच्या कामाला प्रारंभ करण्यात आला. याआधी 252 वृक्षांचे संगोपन महात्मा फुले वाचनालय प्रांगणात पहिल्या हिरव्या बेटातून करण्यात आलेले आहे. याप्रसंगी डॉ.अजय भन्साळी बोलत होते. “मूकबधिर तथा दिव्यांग मुलांचे संगोपन आणि शिक्षण देण्याचे महा कठीण कार्य करून ह्या मुलांना समाजात सन्मानाने जगण्याची संधी उपलब्ध करून देण्यासाठी अपार कष्ट निगराणी प्रशाळेच्या सौ.सुनीता महाले घेत आहेत, ही गौरवाची बाब आहे,” असा सन्मान डॉ.भन्साळी यांनी करताच सभागृहात जोरदार टाळ्यांचा गजर दूमदूमला. कार्यक्रमाचे अध्यक्ष सत्यशोधक चळवळीतील ज्येष्ठ कार्यकर्ते अशोक परदेशी यांनी आपल्या मनोगतातून सांगितले की ,”आम्ही बचाव समितीच्या माध्यमातून उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करून न्यायालयामार्फत करंजवण जल योजना प्रस्तावित केलेली आहे. आज “हिरवी बेटे” या उपक्रमातून यंदा दहा ठिकाणी “हिरवी वनराई- हिरवी बेटे” उभारण्याचा संकल्प करून मनमाडला ‘हरित मनमाड’ बनविण्यासाठी निर्धार करीत आहोत. नागरिकांनी यात सहभाग द्यावा,” असे आवाहनही त्यांनी केले. श्री. पोपटशेठ बेदमुथा व माजी नगरसेवक महेंद्र शिरसाठ यांनीही आपापले मनोगत मांडले.
यावेळी मंचावर माजी नगरसेवक दिलीप तेजवानी, इंजि.अमर चव्हाण, सुषमा तिवारी, रश्मी मोरे,बबीता चिंडालिया, रमेश खरे, सूर्यकांत राजगिरे,सुशांत केदारे, मनोज गांगुर्डे, रवी इप्पर, महेश दारुंटे, आर.बी. ढेंगळे,बी.टी.पद्मने, सौ. चव्हाण, मधुकर मोरे,श्याम महाले तसेच विद्यार्थ्यांचे पालक उपस्थित होते. राम महाले आणि जनार्दन देवरे यांनी सूत्रसंचालन केले.प्रास्ताविक सौ.सुनीता महाले यांनी तर निगराणीच्या शिक्षक वृंदाने आयोजन केले.

अजून बातम्या वाचा..

राजे मल्हारराव होळकर यांचे शौर्य आणि पराक्रमाचा इतिहास प्रेरणादायी – डॉ.भारती पवार

राजे मल्हारराव होळकर यांचे शौर्य आणि पराक्रमाचा इतिहास प्रेरणादायी – डॉ.भारती पवार

चांदवड - हिंदुस्थानचे युगपुरुष श्रीमंत सुभेदार 'मल्हारराव होळकर' जन्मोत्सव सोहळा श्रीमंत महाराजा...

read more
एच.ए.के.हायस्कूल अँड ज्यु. कॉलेज, मनमाड मध्ये क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले जयंती साजरी.  मनमाड:- एच.ए.के.हायस्कूल अँड ज्यु. कॉलेज,मनमाड मध्ये क्रांतीसूर्य,महान समाज सुधारक महात्मा ज्योतिबा फुले जयंती साजरी करण्यात आली.शाळेचे मुख्याध्यापक भूषण दशरथ शेवाळे यांच्या हस्ते महात्मा ज्योतिबा फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.यावेळी शाळेतील शिक्षक व शिक्षिका कर्मचारी  उपस्थित होते.उपशिक्षिका सविता सचिन कराड यांनी महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जीवन कार्यांची माहिती दिली. शाळेचे मुख्याध्यापक भूषण शेवाळे व संस्थेच्या सदस्या आयशा सलीम गाजियानी यांचे मार्गदर्शन लाभले.

एच.ए.के.हायस्कूल अँड ज्यु. कॉलेज, मनमाड मध्ये क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले जयंती साजरी....

read more
मनमाड शहरात भाजपा च्या वतीने क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची 197 वी जयंती साजरी

मनमाड शहरात भाजपा च्या वतीने क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची 197 वी जयंती साजरी

मनमाड - भाजपा मनमाड शहर मंडला च्या वतीने क्रांती सूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या 197 व्या...

read more
.