loader image
[ays_poll id=7]

फलक रेखाटन – भावनांचा आक्रोश

Jul 21, 2023


रायगड जिल्ह्यातील खालापूर तालुक्यात इर्शाळवाडी येथे संततधार पावसामुळे भूस्खलन झाल्याने दरड कोसळून 16 जणांचा मृत्यू झाला असून 100 जण अजूनही अडकल्याची भीती आहे.
इर्शाळगडाच्या पायथ्याशी असलेल्या आदिवासी वाडीवर दरड कोसळून ही दुर्दैवी घटना दिनांक 19 जुलै 2023 रोजी रात्री घडली. यात अनेक घरे गाडली गेली, अजूनही ढिगाऱ्याखाली मृतदेह सापडण्याची शक्यता आहे. या वाडीत अंदाजे 25 ते 28 कुटुंबे वास्तव्यास होते. क्षणार्धात या आदिवासी कुटुंबाच्या संसाराची राख रांगोळी झाली. स्वप्ने मातीच्या ढिगाऱ्याखाली चिखलात गाडली गेली. ही मन हेलावणारी अत्यंत हृदयद्रावक घटना आहे. आपले मुलं, भाऊ,बहीण,आई,वडील,पती,पत्नी,नातेवाईक गमावून बसलेल्यांचा भावनांचा आक्रोश, स्रियांचा मन पिळवून टाकणारा टाहो फक्त या डोंगर कपारीत ऐकू येत आहे.
या दुर्दैवी घटनेत मृत्यू मुखी पडलेल्या आदिवासी बंधू भगिनींना फलक रेखाटणातून भावपूर्ण श्रद्धांजली.
– देव हिरे. ( कलाशिक्षक, शिक्षण मंडळ भगूर,संचालित, नूतन माध्यमिक विद्यालय भाटगाव. ता.चांदवड.जि.नाशिक.)


अजून बातम्या वाचा..

मनमाड सार्वजनिक वाचनालय आयोजित निबंध स्पर्धेला शालेय विध्यार्थ्यांचा उदंड प्रतिसाद :578 विध्यार्थ्यांनी घेतला उस्फुर्त सहभाग

मनमाड सार्वजनिक वाचनालय आयोजित निबंध स्पर्धेला शालेय विध्यार्थ्यांचा उदंड प्रतिसाद :578 विध्यार्थ्यांनी घेतला उस्फुर्त सहभाग

मनमाड - मनमाड सार्वजनिक वाचनालय तर्फे स्व.लोकमान्य टिळक यांच्या 168 व्या जयंती तथा व स्व.अण्णाभाऊ...

read more
मध्य रेल्वे महिला कल्याण संघटन संचलित शाळेला रेल प्रबंधक श्रीमती इती पांडे यांची भेट

मध्य रेल्वे महिला कल्याण संघटन संचलित शाळेला रेल प्रबंधक श्रीमती इती पांडे यांची भेट

प्रतिनिधी मनमाड - येथील मध्य रेल्वे महिला कल्याण संघटन संचलित शाळेमध्ये मंडळ श्रीमती इती पांडे...

read more
.