loader image
[ays_poll id=7]

मनमाड महाविद्यालयातील माजी विद्यार्थी रोहित राजेंद्र दंडगव्हाळ यांची एम.पी.एस.सी. मार्फत कर सहाय्यक व मंत्रालयात महसूल सहाय्यक पदांसाठी निवड

Jul 22, 2023

महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, मनमाड मधील माजी विद्यार्थी रोहित राजेंद्र दंडगव्हाळ यांची महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेल्या कर सहाय्यक व महसूल सहाय्यक पदांसाठी निवड झाली. ही महाविद्यालयाच्या दृष्टीने व संस्थेच्या दृष्टीने अतिशय गौरवाची बाब आहेत. रोहित या विद्यार्थ्याने महाविद्यालयातून 2016 या वर्षी वाणिज्य शाखेतून पदवी प्राप्त केली आहे. महाविद्यालयात असतानाच स्पर्धा परीक्षेची पूर्वतयारी करण्याची आवड तयार झाली होती. रोहित राजेंद्र दंडगव्हाळ हा विद्यार्थी मनमाड शहरातील असून आपल्या वडिलांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी जिद्द,चिकाटी व मेहनतीच्या जोरावर रोहित या विद्यार्थ्याने पुणे या ठिकाणी क्लास करून परत आपल्या मूळ गावी येऊन घरीच अभ्यास करून या पदांना गवसणी घातली. महाविद्यालय मार्फत रोहित राजेंद्र दंडगव्हाळ या विद्यार्थ्याचा महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुभाष निकम सर यांनी शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला तसेच यापुढेही न थांबता राज्यसेवा परीक्षा देऊन वरील पदावरती नियुक्ती होण्याची अपेक्षा व्यक्त केली. याप्रसंगी महाविद्यालयातील स्पर्धा परीक्षा समन्वयक प्राध्यापक डाॅ. गणेश गांगुर्डे, उपप्राचार्य प्राध्यापक डॉ. बी.एस. देसले, कनिष्ठ महाविद्यालयाच्या उपप्राचार्या ज्योती पालवे मॅडम, वरिष्ठ महाविद्यालयाचे शैक्षणिक पर्यवेक्षक प्राध्यापक रोहित शिंदे, कनिष्ठ महाविद्यालयाचे शैक्षणिक पर्यवेक्षक फड सर, वाणिज्य विभागातील प्राध्यापिका डॉ. आरती छाजेड, प्राध्यापक मुसळे सर, प्राध्यापक नजरधाने सर, महाविद्यालयातील लेखापाल श्री प्रशांत सानप सर तसेच महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक वृंद, शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी वर्ग उपस्थित होते.

अजून बातम्या वाचा..

नांदगाव शहर व चांडक प्लॉट भागाला जोडणाऱ्या नवीन पुलाचे लोकार्पण सौ. अंजुमताई सुहास कांदे यांच्या हस्ते संपन्न.

नांदगाव शहर व चांडक प्लॉट भागाला जोडणाऱ्या नवीन पुलाचे लोकार्पण सौ. अंजुमताई सुहास कांदे यांच्या हस्ते संपन्न.

  आमदार सुहास अण्णा कांदे यांच्या माध्यमातून नांदगाव शहरातील चांडक प्लॉट भागातील व परिसरातील...

read more
व्ही. एन. नाईक हायस्कूल येथे छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली

व्ही. एन. नाईक हायस्कूल येथे छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली

मनमाड :. व्ही. एन. नाईक हायस्कूल येथे छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली....

read more
महाराष्ट्र राज्याचे शालेय शिक्षण मंत्री नामदार दादाजी भुसे व नांदगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार सुहास अण्णा कांदे यांचा भव्य नागरी सत्कार नाशिक स्वामीनारायण बँक्वेट हॉल येथे संपन्न झाला.

महाराष्ट्र राज्याचे शालेय शिक्षण मंत्री नामदार दादाजी भुसे व नांदगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार सुहास अण्णा कांदे यांचा भव्य नागरी सत्कार नाशिक स्वामीनारायण बँक्वेट हॉल येथे संपन्न झाला.

याप्रसंगी मंचावर नाशिक जिल्ह्यातील शिवसेनेचे नेते पदाधिकारी शिवसैनिक उपस्थित होते. नागरी सत्कार...

read more
मनमाड क्रिकेट असोसिएशन तर्फे कार्यसम्राट आमदार मा.सुहासआण्णा कांदे साहेब यांचा सत्कार.

मनमाड क्रिकेट असोसिएशन तर्फे कार्यसम्राट आमदार मा.सुहासआण्णा कांदे साहेब यांचा सत्कार.

  मनमाड:-आपल्या नांदगाव तालुक्याचे लोकप्रिय,कार्यसम्राट, पाणीदार, क्रीडासम्राट दमदार आमदार...

read more
राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे उपजिल्हाध्यक्ष दत्तू पवार यांच्यासह अनेक पदाधिकाऱ्यांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश

राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे उपजिल्हाध्यक्ष दत्तू पवार यांच्यासह अनेक पदाधिकाऱ्यांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश

  नांदगाव - आमदार सुहास आण्णा कांदे यांच्या उपस्थितीत देवाज बंगलो नांदगाव येथे राष्ट्रवादी...

read more
.