Breaking News

[post-marguee]

[ays_poll id=7]

येवल्यातील पारख पतसंस्थेतील २२ कोटी रुपयांच्या फसवणुकीतील संशयित अजय जैन सह एकाला मनमाड शहरातून अटक – चार दिवसांची कोठडी

Jul 22, 2023

मनमाड – येवल्यातील (कै.) सुभाषचंदजी पारख नागरी सहकारी पतसंस्थेच्या घोटाळ्यातील मुख्य संशयित आरोपी अजय जैन याच्यासह अक्षय छाजेड या दोहोंना नाशिकच्या स्थानिक गुन्हे शाखेने पाळत ठेवून मनमाड शहरातून ताब्यात घेतले. या दोघांना न्यायालयात हजर केले असता त्यांना चार दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली असल्याचे नाशिक ग्रामीण पोलिसांनी दिलेल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.

येवला शहरात असलेल्या (कै.) सुभाषचंदजी पारख नागरी सहकारी पतसंस्थेचे चेअरमन, संचालक मंडळ, व्यवस्थापक, संस्थेचे कर्मचारी अशांनी संगनमत करून खातेदार व ठेवीदारांना विविध योजनांचे जास्त व्याजदराचे आमिष दाखवून लोकांचा विश्वास संपादन करून ठेवीदारांच्या पैशांचा स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी उपयोग करून ठेवीदारांची २१ कोटी ९६ लाख ९९ हजार ८५० रुपयांची फसवणूक केली होती. या प्रकरणातील मुख्य आरोपी अजय भागचंद जैन हा गुन्हा

घडल्यापासून फरारी होता. त्याला अटक करण्यासाठी नाशिक ग्रामीण जिल्हा पोलिस अधीक्षक शहाजी उमप यांनी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाची नेमणूक केली होती. अजय जैन हा गुन्हा घडल्यापासून राजस्थान, गुजरात, मध्य प्रदेश तसेच महाराष्ट्रातील विविध शहरांमध्ये लपत होता. मात्र, पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे अजय जैन हा छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात असल्याचे समजले असता तातडीने पथक रवाना करण्यात आले. मात्र, छत्रपती संभाजीनगर येथील वाळूज एमआयडीसी भागात त्याचा शोध घेतला असता तो मनमाड शहरात असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली.

त्या आधारे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पाळत ठेवून मनमाड शहरातील माधवनगर भागातून अजय जैन (छाजेड), अक्षय रवींद्र छाजेड (दोघेही रा. येवला) यांना ताब्यात घेतले. या दोघांना न्यायालयात हजर केले असता चार दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली. आर्थिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक राहुल तसरे पुढील तपास करीत आहेत.

अजून बातम्या वाचा..

राष्ट्रपुरुषांच्या यादी : पंजाबराव देशमुख, प्रबोधनकार व बाळासाहेबांच्या नावाचा समावेश !

राज्य शासनाच्या राष्ट्रपुरुष, थोर पुरुषांच्या यादीत शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे आणि...

read more

३ ते १२ जानेवारी २०२२ दरम्यान ‘जिजाऊ ते सावित्री-सन्मान महाराष्ट्राच्या लेकींचा’ अभियान !

छत्रपती शिवरायांना स्वराज्य निर्मितीची प्रेरणा देणाऱ्या राजमाता जिजाऊ यांची जयंती आणि पहिल्या...

read more

प्रशासक म्हणून नगर परीषदेचे मुख्याधिकारी डॉ. विजयकुमार मुंढे यांनी आज गुरुवारी पदाची सूत्रे हाती घेतली

नगर परीषदेच्या सभागृहाची मुदत बुधवारी संपल्यानंतर प्रशासक म्हणून नगर परीषदेचे मुख्याधिकारी डॉ....

read more
जिल्ह्यातील विद्यालय व महाविद्यालय कोविड लसीकरण सुरू करा भाजपा विध्यार्थी आघाडीची मागणी

जिल्ह्यातील विद्यालय व महाविद्यालय कोविड लसीकरण सुरू करा भाजपा विध्यार्थी आघाडीची मागणी

केंद्रसरकार ने 15 ते 18 मुलांचे लसीकरण करण्याचे जाहीर केले आहे .. त्यामुळे या वयोगटातील लसीकरण...

read more

मयांकसिंग यांचा सत्कार

ऑल इंडिया एससी एसटी रेल्वे एम्प्लाईज असोसिएशन कारखाना अतिरिक्त मंडळ मनमाड तर्फे नवीन मुख्य कारखाना...

read more
[hsas-shortcode group="" speed="10" direction="left" gap="50"]