Breaking News

[post-marguee]

[ays_poll id=7]

येवल्यातील पारख पतसंस्थेतील २२ कोटी रुपयांच्या फसवणुकीतील संशयित अजय जैन सह एकाला मनमाड शहरातून अटक – चार दिवसांची कोठडी

Jul 22, 2023

मनमाड – येवल्यातील (कै.) सुभाषचंदजी पारख नागरी सहकारी पतसंस्थेच्या घोटाळ्यातील मुख्य संशयित आरोपी अजय जैन याच्यासह अक्षय छाजेड या दोहोंना नाशिकच्या स्थानिक गुन्हे शाखेने पाळत ठेवून मनमाड शहरातून ताब्यात घेतले. या दोघांना न्यायालयात हजर केले असता त्यांना चार दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली असल्याचे नाशिक ग्रामीण पोलिसांनी दिलेल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.

येवला शहरात असलेल्या (कै.) सुभाषचंदजी पारख नागरी सहकारी पतसंस्थेचे चेअरमन, संचालक मंडळ, व्यवस्थापक, संस्थेचे कर्मचारी अशांनी संगनमत करून खातेदार व ठेवीदारांना विविध योजनांचे जास्त व्याजदराचे आमिष दाखवून लोकांचा विश्वास संपादन करून ठेवीदारांच्या पैशांचा स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी उपयोग करून ठेवीदारांची २१ कोटी ९६ लाख ९९ हजार ८५० रुपयांची फसवणूक केली होती. या प्रकरणातील मुख्य आरोपी अजय भागचंद जैन हा गुन्हा

घडल्यापासून फरारी होता. त्याला अटक करण्यासाठी नाशिक ग्रामीण जिल्हा पोलिस अधीक्षक शहाजी उमप यांनी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाची नेमणूक केली होती. अजय जैन हा गुन्हा घडल्यापासून राजस्थान, गुजरात, मध्य प्रदेश तसेच महाराष्ट्रातील विविध शहरांमध्ये लपत होता. मात्र, पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे अजय जैन हा छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात असल्याचे समजले असता तातडीने पथक रवाना करण्यात आले. मात्र, छत्रपती संभाजीनगर येथील वाळूज एमआयडीसी भागात त्याचा शोध घेतला असता तो मनमाड शहरात असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली.

त्या आधारे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पाळत ठेवून मनमाड शहरातील माधवनगर भागातून अजय जैन (छाजेड), अक्षय रवींद्र छाजेड (दोघेही रा. येवला) यांना ताब्यात घेतले. या दोघांना न्यायालयात हजर केले असता चार दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली. आर्थिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक राहुल तसरे पुढील तपास करीत आहेत.

अजून बातम्या वाचा..

हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख वंदनीय स्व बाळासाहेब ठाकरे यांच्या ९ व्या स्मृतिदिनानिमित्त शिवसेना मनमाड शहर शाखेच्या वतीने स्व.बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून व पूजन करून आदरांजली अर्पण करण्यात आली.

आज हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख वंदनीय स्व बाळासाहेब ठाकरे यांच्या ९ व्या स्मृतिदिनानिमित्त...

read more
मनमाड शहरात १८,१९ आणि २० नोव्हेंबरला या केंद्रावर होणार लसीकरण

हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनानिमित्त महाराष्ट्र राज्याचे अन्न,नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी आज शिवतीर्थावर जाऊन पवित्र स्मृतीस विनम्र अभिवादन केले*

हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनानिमित्त महाराष्ट्र राज्याचे...

read more

मनमाड सार्वजनिक वाचनालयास पत्रकार स्व.प्रकाश गोयल यांचे जयंती स्मृतीप्रित्यर्थ ग्रंथ भेट !

सा.मनमाड ठिणगी या वृत्तपत्राचे संस्थापकीय संपादक पत्रकार, लेखक स्वर्गीय प्रकाश गोयल यांचे ७१ व्या...

read more
[hsas-shortcode group="" speed="10" direction="left" gap="50"]