loader image
[ays_poll id=7]

मनमाडच्या शिरपेचात अजून एक मानाचा तुरा

Jul 26, 2023


एशियन वेटलिफ्टींग चॅम्पियनशिप साठी महाराष्ट्रातील एकमेव आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक तृप्ती शेखर पाराशर हीची सलग सहाव्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी भारतीय संघाचे प्रशिक्षक म्हणून तर
जय भवानी व्यायाम शाळेचा आंतरराष्ट्रीय सुवर्णपदक विजेता खेळाडू मुकुंद संतोष आहेर याची भारतीय संघात निवड
उत्तर प्रदेश नोएडा येथे दिनांक 28 जुलै ते 05 ऑगस्ट 2023 दरम्यान होणाऱ्या एशियन ज्युनियर वेटलिफ्टिंग चॅम्पियनशिप साठी मनमाडच्या जय भवानी व्यायाम शाळेच्या मुकुंद संतोष आहेर याची भारतीय संघात 55 किलो वजनी गटात निवड करण्यात आली आहे नुकत्याच संपन्न झालेल्या कॉमनवेल्थ चँपियनशिप स्पर्धेत ज्युनियर व सीनियर गटात दोन सुवर्णपदक पटकविणारा व नागरकोईल येथे झालेल्या राष्ट्रीय वेटलिफ्टिंग स्पर्धेत ज्युनिअर व सीनियर गटात राष्ट्रीय विक्रम स्थापित करणारा मुकुंद आपल्या तिसऱ्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी सज्ज झाला असून नोएडा येथे होणाऱ्या वेटलिफ्टिंग स्पर्धेत मुकुंद भारतासाठी पदक प्राप्त करण्याची शक्यता आहे
तसेच आपल्या सलग सहाव्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी भारतीय संघाची प्रशिक्षक म्हणून निवड झालेली तृप्ती शेखर पाराशर ही महाराष्ट्रातील एकमेव प्रशिक्षक असून स्पर्धेत खेळाडूंकडून उत्तम कामगिरी करण्यासाठी सज्ज झाली आहे
मुकुंद आहेर यास छत्रे विद्यालयाचे क्रीडा प्रशिक्षक प्रवीण व्यवहारे व आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक तृप्ती पाराशर यांचे मार्गदर्शन लाभले आहे
जय भवानी व्यायामशाळेचे अध्यक्ष डॉ विजय पाटील मोहन अण्णा गायकवाड डॉ सुनील बागरेचा प्रा दत्ता शिंपी छत्रे विद्यालयाचे आधारस्तंभ पी जी धारवाडकर अध्यक्ष पी जे दिंडोरकर संचालक नाना कुलकर्णी प्रसाद पंचवाघ मुख्याध्यापक आर एन थोरात उपमुख्याध्यापक संदीप देशपांडे पर्यवेक्षिका सौ पोतदार एस एस महाराष्ट्र वेटलिफ्टिंग संघटनेचे उपाध्यक्ष संतोष सिंहासने सचिव प्रमोद चोळकर यांनी अभिनंदन केले व स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या


अजून बातम्या वाचा..

अडीच महिन्यांपासून पाणी टंचाईच्या झळा सोसणाऱ्या साकोरा वासियांना प्रतीक्षा उपाययोजनांची

अडीच महिन्यांपासून पाणी टंचाईच्या झळा सोसणाऱ्या साकोरा वासियांना प्रतीक्षा उपाययोजनांची

नांदगाव : मारुती जगधने अनेक दिवसाच्या प्रतिक्षेनंतर साकोरा गावाला शास्वत पाणी पुरवठा होणार...

read more
बघा व्हिडिओ : अस्मिता खेलो इंडिया महिला लीग मध्ये आकांक्षा व्यवहारे ने पटकावली तीन सुवर्णपदके

बघा व्हिडिओ : अस्मिता खेलो इंडिया महिला लीग मध्ये आकांक्षा व्यवहारे ने पटकावली तीन सुवर्णपदके

नगरोटा हिमाचल प्रदेश येथे सुरू असलेल्या अस्मिता खेलो इंडिया महिला लीग मध्ये ४५ किलो वजनी गटात ६०...

read more
सराफ सुवर्णकार बांधवांसाठी राज्य शासनाचे आश्वासक पाऊल – आयपीसी 411 अंतर्गत पोलीस अधिकाऱ्यांना सूचना

सराफ सुवर्णकार बांधवांसाठी राज्य शासनाचे आश्वासक पाऊल – आयपीसी 411 अंतर्गत पोलीस अधिकाऱ्यांना सूचना

राज्यातील सराफ सुवर्णकार बांधव जे सराफी व्यवसाय करतात त्यांच्या सुरक्षेबाबतच्या समस्यांचे निराकरण...

read more
.