आशियाई ज्युनियर वेटलिफ्टिंग पटकावले दोन रौप्य व एक कांस्यपदक
मनमाडच्या जय भवानी व्यायाम शाळेच्या मुकुंद संतोष आहेर याने आपल्या सलग तिसऱ्या आंतरराष्ट्रीय वेटलिफ्टिंग स्पर्धेत पदक पटकावून ऐतिहासिक कामगिरी बजावली आहे १०८ किलो स्नॅच व १३७किलो क्लीन जर्क असे एकूण २४५ किलो वजन उचलून एक कांस्यपदक व दोन रौप्यपदकांची कमाई केली आहे
आज ग्रेटर नोएडा येथे संपन्न झालेल्या आशियाई ज्युनियर वेटलिफ्टिंग स्पर्धेत जय भवानी व्यायामशाळेच्या मुकुंद संतोष आहेर याने विक्रमी कामगिरी करीत भारतीय संघासाठी स्नॅच मध्ये १०८ किलो वजन उचलून कांस्यपदक क्लीन जर्क मध्ये १३७ किलो वजन उचलून रौप्यपदक एकूण २४५किलो वजन उचलून रौप्यपदक मिळवित कौतुकास्पद यश संपादन केले आहे
नगरकोईल येथे झालेल्या राष्ट्रीय वेटलिफ्टिंग स्पर्धेत ज्युनियर व सीनियर स्पर्धेत नवीन राष्ट्रीय विक्रमासह सुवर्णपदक तसेच सर्वोत्कृष्ट खेळाडूचा बहुमान नुकत्याच ग्रेटर नोएडा येथे झालेल्या कॉमनवेल्थ चैम्पियनशिप या स्पर्धेत जूनियर व सीनियर मध्ये सुवर्णपदक व आंतरराष्ट्रीय स्पर्धेत सर्वोत्कृष्ट खेळाडूचा बहुमान पटकाविणारा मुकुंद पाठीच्या दुखण्यातून सावरत जिद्दीच्या जोरावर आपल्या तिसऱ्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत पदक मिळवित स्पृहणीय यश संपादन केले आहे
मुकुंद ला छत्रे विद्यालयाचे क्रीडा प्रशिक्षक प्रवीण व्यवहारे व भारतीय संघाची आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक तृप्ती पाराशर यांचे मार्गदर्शन लाभले आहे
जय भवानी व्यायामशाळेचे अध्यक्ष डॉ विजय पाटील मोहन अण्णा गायकवाड डॉ सुनील बागरेचा प्रा दत्ता शिंपी छत्रे विद्यालयाचे आधारस्तंभ पी जी धारवाडकर अध्यक्ष पी जे दिंडोरकर संचालक नाना कुलकर्णी प्रसाद पंचवाघ मुख्याध्यापक आर एन थोरात उपमुख्याध्यापक संदीप देशपांडे पर्यवेक्षिका सौ पोतदार एस एस महाराष्ट्र वेटलिफ्टिंग संघटनेचे उपाध्यक्ष संतोष सिंहासने सचिव प्रमोद चोळकर यांनी अभिनंदन केले व स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.













