नांदगाव तालुक्यातील ग्रामीण भागात सध्या होत असलेल्या गोधन चोरीमुळे शेतकऱ्यांवर नवे संकट ओढवले आहे. लाखो रुपयांचे बैल, गाई, शेळ्या चोरून नेल्या जात असल्याने शेतकरी भयभीत होत असून गोधन चोरांचा बंदोबस्त करण्याची मागणी किसान सभेने मनमाड पोलिसांना निवेदनाव्दारे केली आहे.
तालुक्यातील ग्रामीण भागात सध्या पावसाने पाठ फिरवल्याने
अनेक ठिकाणी पेरण्या झाल्या नाही तर अनेक ठिकाणी दुबार पेरण्याचे संकट ओढवले असून अशातच आता शेतकऱ्यांच्या जिवाभावाच्या गो धनाची चोरी होत असल्यामुळे शेतकऱ्यांची डोकेदुखी वाढली आहे. खादगाव येथील संजय वडक्ते यांच्या गोठ्यात बांधलेल्या बैल तसेच नवसारी येथील शेतकऱ्याची बैले चोरट्यांनी चोरून नेली आहे. यासह इतरही अनेक ठिकाणी वासरे, गायी, शेळ्या चोरून नेल्या जात आहे. पोलिसांनी ग्रामीण भागात गस्त वाढवावी आणि या गोधन चोरट्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी केली आहे. ग्रामसुरक्षा दल व पोलीस मित्र यांना कार्यान्वीत करावे यासाठी पोलिस स्थानकाच्या वतीने गावागांमध्ये बैठका घेऊन जनजागृती करण्यात यावी. पोलिसांनी तत्काळ कार्यवाही केली तरच शेतकऱ्यांचे पशुधन सुरक्षीत राहिल आणि शेतकऱ्यांना आधार पोहचेल. सध्या दुष्काळी परिस्थिती असतांना गोधन चोरीमुळे शेतकऱ्यांचे होणारे आर्थिक नुकसान हे परवडणारे नाही. त्यामुळे पोलिसांनी गोधन चोरट्यांचा धुमाकूळ बंद करण्याची मागणी निवेदनाद्वारे किसान सभेचे जिल्हा संघटक विजय दराडे, स्वप्निल डोणे, दत्तू घुगे, दिलीप दराडे, संजय वडक्ते, प्रकाश दराडे, दिलीप दराडे, सुरेश आहिरे, जालिंदर कनोर आदींनी केले आहे.
राशी भविष्य : २७ सप्टेंबर २०२५ – शनिवार
मेष: आज तुमच्यासाठी चांगला दिवस आहे. तुमच्या कार्यक्षेत्रात तुम्ही निर्णय घेण्याची क्षमता वाढेल....









