loader image
[ays_poll id=7]

मनमाड सार्वजनिक वाचनालयातर्फे स्व.अण्णाभाऊ साठे व लोकमान्य टिळक यांच्या स्मृतिदिनानिमित्ताने सन 2023 मध्ये झालेल्या आंतरशालेय वक्तृत्व स्पर्धेत मरेमा विद्यालयाची कु. मानसी दत्तात्रय सांगळे तर खुल्या वक्तृत्व स्पर्धेत के आर टी विद्यालय ची कु. कशिष आझाद आव्हाड प्रथम तर कथाकथन स्पर्धेत गुरुगोविंदसिंग हायस्कूल चा अर्णव मंदार ढोबळे प्रथम व निबंध स्पर्धेत, मोठया गटात छत्रे हायस्कूल चा सिद्धेश मंगेश वाणी तर लहान गटात कु. श्रावणी ईश्वर खैरनार प्रथम पारितोषिक विजेते

Aug 1, 2023


मनमाड – मनमाड सार्वजनिक वाचनालयाच्या वतीने स्व.अण्णाभाऊ साठे व लोकमान्य टिळक यांच्या स्मृतीदिनानिमित्त गेल्या 55 वर्षापासून मनमाड शहरातील शालेय विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवड निर्माण व्हावी आणि त्यांना विविध विषयात लेखन, करण्याची गोडी लागावी म्हणून मनमाड शहरात या आंतरशालेय निबंध कथाकथन व वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात येते. नाशिक जिल्ह्यात नव्हे तर संपूर्ण उत्तर महाराष्ट्रात अशा प्रकारची एकमेव स्पर्धा आयोजित केली जाते. यंदाही हिच परंपरा कायम टिकवत यंदाही वाचनालयातर्फे सोमवार दि.31 जुलै 2023 रोजी आंतर शालेय कथाकथन तर दिनांक 01ऑगस्ट 2023 रोजी आंतर शालेय वक्तृत्व स्पर्धा लोकमान्य सभागृह इंडियन हायस्कूल येथे संपन्न झाल्या . या तिन्ही स्पर्धां तसेच मनमाड सार्वजनिक वाचनालय तर्फे इयता 10 वी 12 वी च्या परीक्षेत 2023 मध्ये मनमाड केंद्रात पहिल्या तीन विद्यार्थी चा गुणगौरव समारंभाच्या व्यासपीठवर प्रमुख अतिथी म्हणून मनमाड पोलीस विभागा चे उपविभागीय अधिकारी आदरणीय सोहेल शेख साहेब तसेच मनमाड सार्वजनिक वाचनालयाचे अध्यक्ष नितीन पांडे, सचिव कल्पेश बेदमुथा जेष्ठ संचालक नरेश गुजराथी, उपाध्यक्ष प्रज्ञेश खांदाट, मनमाड शहर पत्रकार संघाचे अध्यक्ष आझाद आव्हाड वाचनालय चे माजी अध्यक्ष सुरेश शिंदे, प्रदीप गुजराथी कथाकथन व वक्तृत्व स्पर्धेचे परिक्षक सर्व सन्माननीय प्रा सौ. प्रांजली हेमंत लाळे , मा नगरसेविका सौ संगीता सुनील पाटील प्रसिद्ध विधीज्ञ ॲड रमेश अग्रवाल ,निबंध स्पर्धा परीक्षक विजय मधुकर पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. सर्व मान्यवरांच्या हस्ते माता सरस्वती, स्व.लोकमान्य टिळक, स्व.अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करीत द्विप प्रज्वलन करून या पारितोषिक वितरण कार्यक्रमाचा शुभारंभ झाला.सर्व मान्यवर व परीक्षक चा प्रमाणपत्र व ग्रंथ भेट देऊन स्वागत सत्कार करण्यात आला कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात वाचनालयाचे अध्यक्ष नितीन पांडे यांनी सोशल मीडिया च्या अत्यंत कठीण काळातही शालेय विद्यार्थ्यांना वक्तृत्व व लेखनाचे वाचनाचे बळ मिळावे म्हणून सर्वांच्या सहकार्याने वाचनालय नियमित पणे दरवर्षी या स्पर्धा आयोजित करीत आहे असे सांगितले. मनमाड सार्वजनिक वाचनालयाच्या विविध उपक्रमा ची माहिती देत सचिव कल्पेश बेदमुथा यांनी कार्यक्रमाचे सुत्रसंचालन यांनी केले. जेष्ठ संचालक नरेश गुजराथी यांनी देखील मार्गदर्शन पर मनोगत व्यक्त केले तर परिक्षकांतर्फ, विजय पाटील,ऍड रमेश अग्रवाल यांनी मार्गदर्शनपर मनोगत मध्ये विध्यार्थी /पालक /शिक्षक यांना महत्वपूर्ण सूचना केल्या मनमाड सार्वजनिक वाचनालय हे मोठया सामाजिक जबाबदारीने अशा आंतरशालेय स्पर्धांचे आयोजन करुन शालेय विद्यार्थ्यांन साठी वाचन लेखन आणि वक्तृत्व चे व्यासपीठ उपलब्ध करून त्यांचा आत्म विश्वास वाढविणारा उपक्रम करीत आहे हे कौतुकास्पद आहे असे आपल्या प्रमुख अतिथीय भाषणात पोलीस उपविभागीय पोलीस अधिकारी सोहेल शेख यांनी सांगितले.डी वाय एस पी सोहेल शेख यांच्या हस्ते खालील विजेत्या स्पर्धकांना रोख रक्कम, प्रमाणपत्र व पुस्तक स्वरुपात बक्षिस वितरण करण्यात आले.तर या सर्व स्पर्धा मध्ये सहभागी झालेल्या 650 विध्यार्थ्यांना वाचनालय तर्फे सहभाग प्रमाणपत्र देण्यात येणार , अक्षय सानप, मच्छिंद्र साळी अभिषेक पितृभक्त, ,प्रकाश धामणस्कर,यांनी स्पर्धेला केलेल्या विशेष सहकार्याबद्दल शेख साहेबांच्या हस्ते त्यांचा सन्मान व सत्कार करण्यात आला. आंतरशालेय निबंध स्पर्धेमध्ये 5 वी ते 7 वी छोटा गटा मध्ये प्रथम क्रमांक कु श्रावणी ईश्वर खैरनार (के आर टी विद्यालय ), द्वितीय क्रमांक कु मयुरी मोगलायन गाडे (छत्रे न्यू इंग्लिश स्कूल ), तृतीय क्रमांक कु.भाग्यश्री संदीप पवार (छत्रे न्यू इंग्लिश स्कूल ), प्रथम उत्तेजनार्थ कु.गार्गी राजेंद्र व्यवहारे (छत्रे न्यू इंग्लिश स्कूल ) , द्वितीय उत्तेजनार्थ कु. काव्या विवेक गुजराथी (गुड शेफर्ड स्कूल ), तृतीय उत्तेजनार्थ कु.श्रुती सचिन काकड ( के आर टी इंग्लिश स्कुल), चतुर्थ उत्तेजनार्थ कु.ईश्वरी अनिल इप्पर (सरस्वती विद्यालय ), पाचवे उत्तेजनार्थ कु राधिका नारायण जाधव (सरस्वती विद्यालय ), निबंध स्पर्धा इ.8वी ते 10वी मोठा गट प्रथम क्रमांक कु.सिद्धेश मंगेश वाणी (छत्रे न्यू इंग्लिश स्कूल ), द्वितीय क्रमांक कु.श्वेता भारत जगताप (गुरु गोविंद सिंग हायस्कूल ), तृतीय क्रमांक कु प्रणाली अशोक गांगुर्डे (छत्रे न्यू इंग्लिश स्कूल ), प्रथम उत्तेजनार्थ कु.प्रगती भारत खताळ (बी जी दरगुडे स्कूल ), द्वितीय उत्तेजनार्थ कु मनस्वी प्रदीप संसारे (के आर टी विद्यालय ), तृतीय उत्तेजनार्थ कु.हर्षदा राघो कांबळे (संत झेवीयर हायस्कूल ), चतुर्थ उत्तेजनार्थ कु.अनुष्का शामराव सोनवणे ( संत झेवीयर हायस्कूल ), पाचवे उत्तेजनार्थ कु.कार्तिकी दीपक शर्मा (सरस्वती विद्यालय) , आंतर शालेय कथाकथन स्पर्धा प्रथम क्रमांक कु.अर्णव मंदार ढोबळे (गुरु गोविंद सिंग हायस्कूल ), द्वितीय क्रमांक कु.रुद्राणी विनोद देशमानकर (के आर टी विद्यालय ), तृतीय क्रमांक कु.जान्हवी सुनील महाले (सरस्वती विद्यालय ), प्रथम उत्तेजनार्थ कु.सिद्धेश मंगेश वाणी (छत्रे न्यू इंग्लिश स्कूल ), द्वितीय उत्तेजनार्थ कु.दक्ष प्रमोद पाचोरकर (मरेमा विद्यालय ), तृतीय उत्तेजनार्थ कु सई भूषण शाकद्विपी ( के आर टी विद्यालय ), चतुर्थ उत्तेजनार्थ कु गोपालजी चव्हाण (छत्रे न्यू इंग्लिश स्कूल ) पाचवे उत्तेजनार्थ कु आराध्या सूर्यवंशी वक्तृत्व स्पर्धा व्यक्तिगत खुला गट प्रथम क्रमांक कु. कशिष आझाद आव्हाड (के आर टी विद्यालय )वक्तृत्व स्पर्धा प्रथम कु मानसी दत्तात्रय सांगळे (मरेमा विद्यालय ), द्वितीय क्रमांक कु .दिव्या उपेंद्र सोनवणे (छत्रे न्यू इंग्लिश स्कूल ), तृतीय क्रमांक कु.सई संतोष झाल्टे (के आर टी विद्यालय ), प्रथम उत्तेजनार्थ कु. साक्षी संतोष आहेर (छत्रे न्यू इंग्लिश स्कूल ), द्वितीय उत्तेजनार्थ कुआयुष महेंद्र पाटील (संत बार्णबा हायस्कूल ), तृतीय उत्तेजनार्थ कु.तनुश्री चंद्रकांत नाईक (के आर टी विद्यालय ) चतुर्थ उत्तेजनार्थ कु संजना स्नेहल पांडे (के आर टी विद्यालय ) पाचवे उत्तेजनार्थ कु साक्षी शहाजी झाल्टे (मरेमा विद्यालय ) या निबंध मनमाड शहरातील सुमारे 15 माध्यमिक विद्यालयातील स्पर्धेत 567 तर कथाकथन व वक्तृत्व स्पर्धेमध्ये सुमारे 100 पेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. या बक्षिस वितरण समारंभात मनमाड केंद्रात इयत्ता 10 वी मध्ये प्रथम तीन आलेल्या अनुक्रमे मोहिनी संजय गवळी, ब्राम्ही गायकवाड, देवयानी विद्याधर वाघ तर इयत्ता 12 वी मध्ये मनमाड केंद्रात प्रथम तीन आलेल्या अनुक्रमे कु उत्कर्षा पवार, कु मोहिनी रवींद्र तुपे,कु राहिश असिफ खान,,कु युसूफ बहरीनवाला यांना ही प्रमाणपत्र व पुस्तके देऊन गौरव करण्यात आला दिनेश धारवाडकर , सदाशिव सुतार संदीप देशपांडे ,हर्षद गद्रे, चेतन सुतार,हेमंत वाले,संत बार्णाबा चे मुख्यध्यापक गरुड सर यांचे विशेष सहकार्य या स्पर्धा उपक्रमास लाभले या कार्यक्रमास किशोर गुजराथी सर, मंगेश वाणी, विनोद देशमानकर मनमाड सार्वजनिक वाचनालयाच्या ग्रंथपाल सौ.संध्या गुजराथी, हेमंत मटकर, सौ.नंदिनी फुलभाटी, मच्छिन्द्र साळी आदी मान्यवरांसह मोठ्या संख्येने पालक, शिक्षक व विद्यार्थीवर्ग उपस्थित होता. कार्यक्रम चे संयोजन मनमाड सार्वजनिक वाचनालया चे अध्यक्ष नितीन पांडे,सचिव कल्पेश बेदमुथा आणि संचालक मंडळ ने केले

 

 


अजून बातम्या वाचा..

बघा व्हिडिओ : पाण्याखाली श्रीगणेशाची प्रतिमा रांगोळी ने साकारत बाप्पाचे अनोखे विसर्जन…!

बघा व्हिडिओ : पाण्याखाली श्रीगणेशाची प्रतिमा रांगोळी ने साकारत बाप्पाचे अनोखे विसर्जन…!

या गणेशोत्सवात लाडक्या श्रीगणेशाच्या आगमनाने दहा दिवस सर्वत्र प्रसन्नमय वातावरण झाले. बाप्पाच्या...

read more
बघा व्हिडिओ-भाद्रपद महागणेशोत्सव 2024 निमित्त वेशीतील प्राचीन श्री निलमणी गणेश मंदीरात सलग 10 वर्षी

बघा व्हिडिओ-भाद्रपद महागणेशोत्सव 2024 निमित्त वेशीतील प्राचीन श्री निलमणी गणेश मंदीरात सलग 10 वर्षी

छप्पन महाभोग (महानैवेद्य) कार्यक्रमाचे आयोजन संपन्न गणेश भक्तांचा उदंड प्रतिसाद मनमाड - आम्ही...

read more
नाशिक जिल्हा बँकेने ९ कर्जदारांना बजावल्या अंतीम जप्तीच्या नोटीसा; थकबाकीदारांमध्ये भीतीचे वातावरण ?

नाशिक जिल्हा बँकेने ९ कर्जदारांना बजावल्या अंतीम जप्तीच्या नोटीसा; थकबाकीदारांमध्ये भीतीचे वातावरण ?

नांदगाव : मारुती जगधने नांदगांव तालुक्यातील जिल्हा बँकेचे कर्ज घेतलेल्या व थकित झालेल्या ९...

read more
मनमाड महाविद्यालयात हिंदी दिवस उत्साहात साजरा… “हिंदी फक्त राष्ट्रभाषाच नव्हे तर विश्व भाषा” – श्री.राजेंद्र जगताप

मनमाड महाविद्यालयात हिंदी दिवस उत्साहात साजरा… “हिंदी फक्त राष्ट्रभाषाच नव्हे तर विश्व भाषा” – श्री.राजेंद्र जगताप

मनमाड: येथील महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित, कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयाच्या पदव्युत्तर...

read more
भाद्रपद महागणेशोत्सव ➖2024 निमित्त रविवारी वेशीतील प्राचीन श्री निलमणी गणेश मंदीरात सलग 10 वर्षी छप्पन महाभोग (महानैवेद्य) व श्री सत्यविनायक महापूजा या धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन

भाद्रपद महागणेशोत्सव ➖2024 निमित्त रविवारी वेशीतील प्राचीन श्री निलमणी गणेश मंदीरात सलग 10 वर्षी छप्पन महाभोग (महानैवेद्य) व श्री सत्यविनायक महापूजा या धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन

मनमाड - आम्ही परंपरा पाळतो... आम्ही संस्कृती चे रक्षण करतो.... हे ब्रीद घेऊन मनमाड शहरात धार्मिक...

read more
मनमाड करांच्या शिरपेचात अजून एक मानाचा तुरा तृप्ती पाराशर आकांक्षा व्यवहारे साईराज परदेशी आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी भारतीय संघात निवड

मनमाड करांच्या शिरपेचात अजून एक मानाचा तुरा तृप्ती पाराशर आकांक्षा व्यवहारे साईराज परदेशी आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी भारतीय संघात निवड

सुवा फिजी येथे १४ ते २१ सप्टेंबर २०१४ रोजी होणाऱ्या कॉमनवेल्थ चँपियनशिप साठी महाराष्ट्रातील एकमेव...

read more
मनमाड शहर भाजपा तर्फे आरक्षण विरोधी राहुल गांधी व हिंदू विरोधी शरद पवार यांचे विरोधात जोरदार घोषणा बाजी करीत निषेध आंदोलन

मनमाड शहर भाजपा तर्फे आरक्षण विरोधी राहुल गांधी व हिंदू विरोधी शरद पवार यांचे विरोधात जोरदार घोषणा बाजी करीत निषेध आंदोलन

राहुल गांधी यांनी अमेरिकेतील एका मुलाखती दरम्यान काँग्रेस भारतात सत्तेत आल्यास आरक्षण काढून टाकू...

read more
कासलीवाल स्कूलमध्ये माता पालकांसाठी कुकिंग बॅटल (कुकिंग विदाऊट फ्लेम्स ) स्पर्धेचे आयोजन…..

कासलीवाल स्कूलमध्ये माता पालकांसाठी कुकिंग बॅटल (कुकिंग विदाऊट फ्लेम्स ) स्पर्धेचे आयोजन…..

नांदगांव : दि १३ मारुती जगधने दि.13 सप्टेंबर 2024 नांदगाव येथील जे. टी. कासलीवाल इंग्लिश मिडियम...

read more
.