loader image
[ays_poll id=7]

निसर्गकवी ना.धो.महानोर अनंतात विलीन

Aug 3, 2023

नांदगाव ( प्रतिनिधी)
“ह्या नभाने या भुईला दान द्यावे ”
असे शेतकऱ्यांसाठी आभाळाकडे पावसाचे पसायदान मागणारे.. निसर्ग कवी तसेच शेती मातीवर आणि माणसांवर भरभरुन प्रेम करणारे..निसर्गकवी जेष्ठ साहित्यिक व कवी नामदेव धोंडो महानोर यांच आज सकाळी ८.३० वाजता निधन झाले. रुबी हॉल रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु होते. त्यांच्या निधनामुळे मराठी साहित्य विश्वात शोक व्यक्त केला जात आहे. ते ८१ वर्षाचे होते.

आपल्या निसर्ग काव्याच्या जोरावर काव्यप्रेमी मराठी वाचकांच्या मनात नां.धो.महानोर यांनी हक्काचे स्थान निर्माण केले होते. महानोर यांनी काव्यसंग्रहाबरोबरच अनेक मराठी चित्रपटांसाठी प्रसिद्ध गीते लिहिली. त्यांच्या गीतांना प्रेक्षकांनी भरभरून दाद दिली. व त्यांच्या कवितां काव्यप्रेमींच्या ओठांवर दरवळत आहेत.
शुक्रवारी त्यांच्या पळसखेडे या गावी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.गेल्या पाच-सहा महिन्यांपासून सातत्याने आजारी होते. ह्रुदयविकाराच्या त्रासामुळे त्यांना वीस दिवसांपुर्वी पुण्यातील रुबी हॉल क्लिनिक रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. परंतु त्यांच्याकडुन प्रतिसाद मिळत नव्हता.गेल्या काही दिवसांपासून ते व्हेंटिलेटरवर होते.अखेर आज त्यांची ज्योत मालवली.
ना.धो. महानोर यांचा जन्म औरंगाबाद जिल्ह्यातील पळसखेड या गावी झाला. त्यांचे शालेय शिक्षण पळसखेड, पिंपळगाव, शेंदुर्णी येथे झाले. त्यानंतर जळगाव येथील महाविद्यालयात त्यांनी प्रवेश घेतला पण त्यांचे महाविद्यालयीन शिक्षण पहिल्या वर्षांपर्यंत झाले. महाविद्यालयीन शिक्षण सोडून ते शेती करण्यासाठी पळसखेडला आले. मराठी साहित्य विश्वात ते रानकवी म्हणून प्रसिद्ध आहेत. त्यांच्या कवितांवर बालकवींचा प्रभाव जानवतो. ना.धो.महानोर यांनी पानझड, तिची कहाणी,रानातल्या कविता, अजिंठा आणि गाण्यातुन महाराष्ट्रातील रसिकांच्या मनावर अधिराज्य त्यांनी गाजवले. नांदगावचे ते जावई असल्याने त्यांचे नांदगावकरांवर विशेष प्रेम होते. २०१० मध्ये त्यांच्या मार्गदर्शनाखाली मराठी साहित्य परिषदेची शाखा स्थापन करुन अनेक कवी व लेखकांना त्यांनी प्रोत्साहन देऊन लिहिते केले. साहित्य क्षेत्रातील बाप आज हरवला आहे. कविवर्य निसर्ग कवी ना.धो. महानोर यांना मराठी साहित्य परिषद शाखा नांदगावच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली..!

म.सा.प.शाखा नांदगाव
अध्यक्ष -प्रा.सुरेश नारायणे, नांदगाव

अजून बातम्या वाचा..

फलक रेखाटन – श्रीकृष्ण जन्माष्टमी व दहीहंडीच्या रंगीत खडू माध्यमातून मोरपंखी शुभेच्छा !

फलक रेखाटन – श्रीकृष्ण जन्माष्टमी व दहीहंडीच्या रंगीत खडू माध्यमातून मोरपंखी शुभेच्छा !

फलक रेखाटन - श्रीकृष्ण जन्माष्टमी व दहीहंडीच्या रंगीत खडू माध्यमातून मोरपंखी शुभेच्छा ! फलक रेखाटन...

read more
मनमाड शहर भाजप मंडलाच्या वतीने सलग 21व्या वर्षी अखंड भारत दिनी निमित्त व मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या जन्म दिना निमित्त आयोजित रक्तदान शिबीरात 30 रक्तदात्यांचे रक्तार्पण

मनमाड शहर भाजप मंडलाच्या वतीने सलग 21व्या वर्षी अखंड भारत दिनी निमित्त व मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या जन्म दिना निमित्त आयोजित रक्तदान शिबीरात 30 रक्तदात्यांचे रक्तार्पण

मनमाड - 79 व्या भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या पूर्व संध्ये ला 14 ऑगस्ट या अखंड भारत दिना निमित्ताने...

read more
व्यसनाधीन तरुण देशाच्या शाश्वत विकासासाठी धोक्याचे जागतिक युवा दिनानिमित्त मनमाड महाविद्यालयात, पोस्टर रांगोळी व पथनाट्य यांचे सादरीकरण

व्यसनाधीन तरुण देशाच्या शाश्वत विकासासाठी धोक्याचे जागतिक युवा दिनानिमित्त मनमाड महाविद्यालयात, पोस्टर रांगोळी व पथनाट्य यांचे सादरीकरण

महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयाच्या रेड रिबन क्लब, राष्ट्रीय...

read more
श्रावण मास अंगारक (मंगळी ) संकष्ट चतुर्थी निमित्त मंगळवार दिनांक 12/08/2025 रोजी वेशीतील श्री निलमणी गणेश मंदिरात विशेष धार्मिक कार्यक्रमा चे आयोजन

श्रावण मास अंगारक (मंगळी ) संकष्ट चतुर्थी निमित्त मंगळवार दिनांक 12/08/2025 रोजी वेशीतील श्री निलमणी गणेश मंदिरात विशेष धार्मिक कार्यक्रमा चे आयोजन

मनमाड - शहराचे आराध्य दैवत आणि नवसाला पावणार गणपती म्हणून पंचक्रोशीत प्रसिद्ध असणाऱ्या वेशीतील...

read more
भारतीय जनता पार्टी मनमाड शहर प्रणित भाजप कामगार आघाडीच्या शहर शाखेच्या फलकाचे उदघाटन

भारतीय जनता पार्टी मनमाड शहर प्रणित भाजप कामगार आघाडीच्या शहर शाखेच्या फलकाचे उदघाटन

मनमाड - भारतीय जनता पार्टी देश स्तरावर विविध क्षेत्रामध्ये काम करीत असते कामगार क्षेत्रामध्ये...

read more
.