Breaking News

[post-marguee]

[ays_poll id=7]

आमदार आपल्या दारी शिबिर अंतर्गत मनमाड शहरातील नागरिकांना रेशन कार्ड व विविध दाखल्यांचे वाटप

Aug 5, 2023

आमदार सुहास अण्णा कांदे यांच्या माध्यमातून आमदार आपल्या दारी या महा शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. नांदगाव मनमाड व मतदार संघातील विविध गावांमध्ये या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
मनमाड शहरातील विविध प्रभागांमध्ये घेण्यात आलेल्या आमदार आपल्या दारी या महा शिबिराच्या अंतर्गत हजारो नागरिकांनी शासकीय योजनांचा लाभ घेतला यामध्ये रेशन कार्ड संबंधित विविध अडचणी नवीन रेशन कार्ड तसेच विविध दाखल्यांसाठी हजारोंनी प्रकरणी जमा केली होती.
सर्व कागदपत्रांची पूर्तता करत लाभार्थी नागरिकांना रेशन कार्ड व विविध दाखले शिवसेना मध्यवर्ती कार्यालय मनमाड येथे देण्यात येत आहे. यामध्ये 310 रेशन कार्ड व 250 दाखले तयार झाल्यानंतर मनमाड येथील शिवसेना कार्यालयात संबंधित लाभार्थ्यांना पाचारण करून त्यांना सुपूर्द करण्यात आले.
या प्रसंगी शिवसेना शहर प्रमुख मयूर बोरसे, महिला आघाडी विधानसभा संघटक पूजाताई छाजेड, शहर उपप्रमुख मच्छिंद्र सांगळे, विकी कातारी, आशिष पाराशरे,सचिन दरगुडे, प्रसिद्धी प्रमुख निलेश व्यवहारे उपस्थित होते.

अजून बातम्या वाचा..

श्री निलमणी गणेश मंदिर सार्वजनिक ट्रस्ट तर्फे महाराष्ट्र तील पूरग्रस्ता साठी वस्तू स्वरूपात मदती चे आवाहन

श्री निलमणी गणेश मंदिर सार्वजनिक ट्रस्ट तर्फे महाराष्ट्र तील पूरग्रस्ता साठी वस्तू स्वरूपात मदती चे आवाहन

मनमाड - शहरात गेल्या 1997 पासून सलग 29 वर्ष आम्ही परंपरा पाळतो..!! आम्ही संस्कृती चे रक्षण करतो हे...

read more
[hsas-shortcode group="" speed="10" direction="left" gap="50"]