loader image
[ays_poll id=7]

महामाया महिला मंडळ, बुद्धवाडीच्या अध्यक्ष पदी सौ.आम्रपाली निलेश वाघ

Aug 12, 2023


मनमाड – बुद्धवाडी येथील महामाया महिला मंडळाच्या अध्यक्षपदी आम्रपाली निलेश वाघ तर सचिवपदी चंद्रकला दिवाकर एळींजे यांची एकमताने निवड करण्यात आले.
कपिल वस्तू बुद्ध विहारात संपन्न झालेल्या बैठकीत यंदा वर्षावासासाठी कार्यकारणी निवडण्यात आली. कार्यकारणीत उपाध्यक्ष -अलकाबाई केदारे, चित्राबाई अंकुश, चंद्रकला प्रकाश एळींजे, लताबाई हिरे,खजिनदार – सुमनबाई गरुड, ऑडीटर-वंदनाबाई अकुंश, संगिता जाधव, मंदाबाई जाधव, अनिता केदारे, भारती केदारे,कार्याध्यक्ष – कमळाबाई एळींजे,निर्मलाबाई अंकुश, कमळाबाई हिरे, शालूबाई आहिरे, इंदुबाई एळींजे, संजिवनी गरुड, शालुबाई भोसले, सभासद -सुमनबाई एळींजे, अंजनाबाई वाघ, मिनाबाई वाघ, लक्ष्मीबाई वाघ, चित्रा डांगळे, ताईबाई केदारे, उषाबाई केदारे सुगंधाबाई निळे, भागुबाई जगताप, अंजनाबाई अंकुश ,निता एळींजे, पायल केदारे यांची निवड करण्यात आली. कपिलवस्तू बुद्ध विहारात आषाढ पौर्णिमा ते अश्विन पौर्णिमा असे तीन महिने वर्षावास कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून या काळात ” बुद्ध आणि त्यांच्या धम्म” या पवित्र ग्रंथाचे अखंड वाचन करण्यात येणार असून विविध धार्मिक व सामाजिक उपक्रम राबविण्याचा निर्धार नूतन कार्यकारणीने केला आहे.
याप्रसंगी कपिल वस्तू बुद्ध विहार विकास समितीचे अध्यक्ष – अरुण अंकुश, सचिव प्रकाश एळींजे,ऑडिटर – गणेश केदारे, केंद्रीय शिक्षक भागवतराव गांगुर्डे , बौद्धाचार्य मच्छिद्र भोसले आदी उपस्थित होते.


अजून बातम्या वाचा..

नांदगाव मनमाड मराठी पत्रकार संघाच्या तालुकाध्यक्षपदी संदीप जेजुरकर, सरचिटणीसपदी निलेश वाघ यांची बिनविरोध निवड

नांदगाव मनमाड मराठी पत्रकार संघाच्या तालुकाध्यक्षपदी संदीप जेजुरकर, सरचिटणीसपदी निलेश वाघ यांची बिनविरोध निवड

मनमाड - नांदगाव मनमाड मराठी पत्रकार संघाच्या झालेल्या सभेत तालुकाध्यक्षपदी एबीपीमाझा, पुण्यनगरी,...

read more
फलक रेखाटन-उस्ताद झाकीर हुसैन यांना रंगीत खडू माध्यमातील फलक रेखाटणातून भावपूर्ण श्रद्धांजली

फलक रेखाटन-उस्ताद झाकीर हुसैन यांना रंगीत खडू माध्यमातील फलक रेखाटणातून भावपूर्ण श्रद्धांजली

जागतिक कीर्तीचे तबलावादक ,तालतज्ञ, पदमविभूषण, उस्ताद झाकीर हुसैन यांना रंगीत खडू माध्यमातील फलक...

read more
मार्गशीर्ष मास संकष्ट चतुर्थी निमित्त बुधवार दिनांक 18/12/2024 रोजी वेशीतील श्री निलमणी गणेश मंदिरात धार्मिक कार्यक्रम

मार्गशीर्ष मास संकष्ट चतुर्थी निमित्त बुधवार दिनांक 18/12/2024 रोजी वेशीतील श्री निलमणी गणेश मंदिरात धार्मिक कार्यक्रम

मनमाड शहराचे आराध्य दैवत आणि नवसाला पावणार गणपती म्हणून पंचक्रोशीत प्रसिद्ध असणाऱ्या वेशीतील श्री...

read more
.