loader image

नांदगाव छत्रपती संभाजीनगर रोडवरील पोखरी येथे गोमांस जप्त

Aug 12, 2023


नांदगाव सोमनाथ घोगांणे

नांदगाव शहरापासून जवळच असलेल्या छत्रपती संभाजीनगर रोड वरील पोखरी फाटा येथे गोमांस, वाहतुक करणारा  टेम्पो पकडला असून त्यातील १५०० किलो गोंंमास जप्त करण्यात आले आहे.

यामध्ये गोमांस सह वाहन जप्त करण्यात आले आहे.
शहराजवळील पोखरी फाट्यावर  गोवंश जनावरांचे  गोमांस घेऊन जाणारा टेम्पो कंमाक,M,H,41G, 2667 छत्रपती संभाजी नगर येथून मालेगांव कडे जात असतांना सकाऴी  पोखरी येथील काही ग्रामस्थांनी पकडला असता

यामध्ये १५०० किलो गोमांस मिळून आले आहे.  पोखरी येथील पोलिस पाटिल आनंत पागे यांनी नांदगाव पोलिस स्टेशनला खबर दिली असता नांदगांव पोलिस निरीक्षक प्रितम चौधरी, पोलिस उपनिरीक्षक मनोज वाघमारे, हवालदार दत्ता सोनवणे, अनिल शेरेकर, विनायक जगताप घटनास्थळी तात्काळ हजर झाले. मात्र यावेळी पोखरी ग्रामस्थांनी  रस्ता रोको केला असता पोलीस निरीक्षक प्रितम चौधरी यांनी  गावकऱ्याची समजुत काढली .यामुळे पुढील अनर्थ टऴला,नांदगाव पोलिसांनी, संशयित आरोपी अब्दुल अजीज,खलील तन्वीर,शेख सत्तार ‘पुर्ण नाव माहीत नाही.यांना अटक करण्यात आली आहे. याप्रसंगी महाराष्ट्र प्राणी रक्षण सुधारणा अधिनियम १९९५ चे कलम ५ क भारतीय प्राण्यांना कूर ते ने वागविणे प्रतिबंध अधिनियम कलम ११ खाली अटक करण्यात आली,मांस हे नांदगाव हद्दीतील फाॉरेस्ट येथे नष्ट करण्यात आले. पोलिस निरीक्षक प्रितम चौधरी यांच्या मागदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक प्रविण मोरे, पोलिस हवालदार दशरथ मोरे  तपास करीत आहे.


अजून बातम्या वाचा..

भुमी क्रिकेट अकॅडमीतील आर्या साळुंखे , स्वरांजली पवार व सुहानी बोरा यांची नंदुरबार जिल्हा क्रिकेट आसोसिएशन महिला अंडर 15 संघात निवड

भुमी क्रिकेट अकॅडमीतील आर्या साळुंखे , स्वरांजली पवार व सुहानी बोरा यांची नंदुरबार जिल्हा क्रिकेट आसोसिएशन महिला अंडर 15 संघात निवड

मनमाड - BCCI अंतर्गत असलेल्या महाराष्ट्र क्रिकेट आसोसिएशन आयोजीत आमंत्रितांच्या स्पर्धेसाठी (...

read more
सेंट झेवियर हायस्कूल मनमाड येथे शिकणाऱ्या वेदांत रवींद्र सोनवणेची नाशिक जिल्हा बास्केटबॉल संघात निवड

सेंट झेवियर हायस्कूल मनमाड येथे शिकणाऱ्या वेदांत रवींद्र सोनवणेची नाशिक जिल्हा बास्केटबॉल संघात निवड

मनमाड- महाराष्ट्र बास्केटबॉल असोसिएशन यांच्या मान्यतेने तसेच नाशिक डिस्ट्रिक्ट बास्केटबॉल असोसिएशन...

read more
नांदगाव तालुकास्तरीय मैदानी स्पर्धेत सेंट झेवियर हायस्कूलच्या खेळाडूंचे घवघवीत यश

नांदगाव तालुकास्तरीय मैदानी स्पर्धेत सेंट झेवियर हायस्कूलच्या खेळाडूंचे घवघवीत यश

मनमाड:-क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय नाशिक, व...

read more
.