loader image
[ays_poll id=7]

मनमाड बस आगारात “आमदार आपल्या दारी” आरोग्य शिबीर संपन्न

Aug 16, 2023

मनमाड बस आगारात अधिकारी व कर्मचारी वर्गासाठी आमदार सुहास आण्णा कांदे यांच्या माध्यमातून मोफत डोळे तपासणी शिबिर 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिनानिमित्त आयोजित करण्यात आले होते.
बस चालक, वाहक यांना होणारा डोळ्यांचा त्रास,लांब पल्ल्याचा बस प्रवास आणि दगदग यामुळे बस कर्मचार्यांची मनमाड शिवसेना पदाधिकाऱ्यांकडून डोळे तपासणी शिबिर घेण्याची मागणी केली होती. आमदार सुहास आण्णा कांदे यांनी तात्काळ शिबिर घेण्याच्या सूचना दिल्यानंतर 15 ऑगस्ट रोजी येथे शिबिर संपन्न झाले .
या वेळी बस डेपो अधिकारी व चालक, वाहक व उपस्थित प्रवाशांनी या शिबिराचा लाभ घेत आपले डोळे तपासून घेतले.आवश्यक असल्यास या वेळी मोफत चष्म्यांचे वाटप करण्यात आले.
सकाळी श्रीफळ वाढवून शिबिरास सुरुवात करण्यात आली.
आमदार आपल्या दारी मोफत सुविधा घरोघरी या अभियान अंतर्गत दर रोज मतदारसंघातील गावा गावात मोफत मेडिकल कँप व मोफत शासकीय सुविधा उपलब्ध करून दिले जात आहेत.

या वेळी शिवसेना उजिल्हाप्रमुख सुनील हाडगे, माजी नगराध्यक्ष बबलू पाटील, नगरसेवक गालिब शेख,आझाद पठाण, महिला आघाडी विधानसभा संघटक पूजा छाजेड,वैद्यकीय मदत पक्षाचे पिंटू वाघ, रुग्ण कल्याण समितीचे दिनेश घुगे, लोकेश साबळे, उपशहर प्रमुख विशाल सुरवसे, एजाज शहा, प्रकाश शिंदे,आसिफ पठाण, सचिन दरगुडे कुणाल विसापूरकर प्रसिद्धीप्रमुख निलेश व्यवहारे उपस्थित होते.

अजून बातम्या वाचा..

मनमाड पाठोपाठ नांदगाव भाजपा मध्ये नाराजीनाट्य, सानप, छाजेड यांच्यावर कारवाईची मागणी

मनमाड पाठोपाठ नांदगाव भाजपा मध्ये नाराजीनाट्य, सानप, छाजेड यांच्यावर कारवाईची मागणी

नुकत्याच पार पडलेल्या नगरपालिका व नगरपंचायत निवडणुकीत महाराष्ट्रात नंबर एक राहिलेल्या भारतीय जनता...

read more
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या गटनेतेपदी नाईक तर विरोधी पक्षनेतेपदी नरवडे

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या गटनेतेपदी नाईक तर विरोधी पक्षनेतेपदी नरवडे

नाशिक येथे झालेल्या बैठकीत मनमाड नगर परिषदेच्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या गटनेतेपदी...

read more
फुले शाहू आंबेडकर मुस्लिम विचार मंच व मुस्लिम लायब्ररी यांच्यातर्फे फातिमाबी शेख यांची जयंती साजरी

फुले शाहू आंबेडकर मुस्लिम विचार मंच व मुस्लिम लायब्ररी यांच्यातर्फे फातिमाबी शेख यांची जयंती साजरी

म.ज्योतिबा फुले व क्रांतिज्योती सावित्रीमाई फुले यांच्या स्त्री शिक्षणाच्या कार्यात स्वतःला वाहून...

read more
मतदार संघातील धार्मिक स्थळ विकासासाठी केंद्राकडून निधी मिळावा – आ. कांदेच्या शिष्ट मंडळाने घेतली केंद्रीय मंत्र्यांची भेट

मतदार संघातील धार्मिक स्थळ विकासासाठी केंद्राकडून निधी मिळावा – आ. कांदेच्या शिष्ट मंडळाने घेतली केंद्रीय मंत्र्यांची भेट

नांदगाव - मनमाड शहर तसेच मतदार संघातील धार्मिक स्थळाच्या सर्वांगीण विकासासाठी केंद्रीय पर्यटन...

read more
.