
झेवियर्स स्पोर्ट्स क्लब आणि सेंट झेवियर्स हायस्कुल,मनमाड यांचे संयुक्त विद्यमाने रविवार दिनांक 20 ऑगस्ट 2023 रोजी बास्केटबॉल या खेळाचे जिल्हास्तरीय पंच उजळणी शिबीर आयोजित केले आहे. सदर शिबिरात राष्ट्रीय बास्केटबॉल प्रशिक्षक व नाशिक जिल्हा अमेच्युअर बास्केटबॉल संघटनेचे श्री. राजेश क्षत्रिय सर मार्गदर्शन करणार आहेत. तरी सदर पंच शिबिरात (Refree Clinic) अधिकाधिक क्रीडा शिक्षक व बास्केटबॉल प्रेमी तसेच खेळाडु यांनी सहभागी व्हावे असे आवाहन सेंट झेवियर्स हायस्कुल चे मुख्याध्यापक फादर माल्कम आणि जेष्ठ क्रीडा शिक्षक श्री दिवाकर दोंदे सर यांनी केले आहे.
ठिकाण -सेंट झेवियर्स हायस्कुल,येवला रोड
मनमाड
वेळ – सकाळी ठीक 10 वाजता












