loader image

सौ.अंजुमताई कांदे यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप

Aug 19, 2023


नांदगाव सोमनाथ घोगांणे

आमदार सुहास आण्णा कांदे व सौ. अंजुमताई कांदे प्रत्येक वर्षी न. प. शाळेतील विद्यार्थ्यांना स्वखर्चातून शालेय साहित्याचे वाटप करत असतात.
नांदगाव न. प. शाळेतील विद्यार्थ्यांना शिवनेरी विश्राम गृह येथे सौ.अंजुम ताई कांदे यांनी स्वतः सर्व विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप केले.
याप्रसंगी बोलताना त्यांनी सर्व विद्यार्थ्यांना शैक्षणिक वर्षासाठी शुभेच्छा दिल्या तसेच प्रत्येक विद्यार्थ्याला शिक्षणाचा हक्क आहे पण त्यासाठी त्याला वातावरणही तसेच पाहिजे म्हणून लवकरच सर्व विद्यार्थ्यांना नूतन शाळा इमारत पाहायला मिळणार असल्याचे सांगितले.
सौ. अंजुमताई कांदे यांनी मागील वर्षी सर्व शाळांची पाहणी केली होती .या पाहणी दरम्यान सर्व शाळांच्या इमारतींची परिस्थिती अतिशय दयनीय असल्याचे त्यांच्या लक्षात आले सदर बाब त्यांनी आमदार सुहास अण्णा कांदे यांना सांगितल्यानंतर तात्काळ नांदगाव व मनमाड शहरातील नगरपरिषद शाळांकरिता दहा कोटी रुपये मंजूर करण्यात आले होते या सर्व शाळांची काम प्रगतीपथावर असून बहुतेक शाळांची कामे पूर्णत्वाकडे आहे.
आज नांदगाव येथील गांधीनगर न प शाळेचे सुरू असलेल्या कामावर सौ अंजुमताई यांनी भेट दिली असता कामाची पाहणी केली.
याप्रसंगी सौ.अंजुमताई कांदे, शिवसेना महिला आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्ष उज्वलाताई खाडे, तालुका प्रमुख विद्याताई जगताप, मनमाड शहर प्रमुख संगीताताई बागुल, नांदगाव शहर प्रमुख रोहिणी ताई मोरे,
तसेच न.प.शाळेचे शिक्षक राजेंद्र मोरे, शाहिद अख्तर, दीपक मोरे , गंभीर त्रंबक अहिरे, नगर पालिकेचे गणेश पाटील, व इतर मराठी व उर्दू माध्यमाचे शिक्षक वृंद उपस्थित होते.
सूत्रसंचालन राजेंद्र मोरे सरांनी केले.


अजून बातम्या वाचा..

मनमाडच्या प्रगती बँकेला महाराष्ट्र स्टेट अर्बन को-ऑप बँक्स फेडरेशनचा राज्यस्तरीय प्रथम क्रमांकाचा सर्वोत्कृष्ट बँक पुरस्कार

मनमाडच्या प्रगती बँकेला महाराष्ट्र स्टेट अर्बन को-ऑप बँक्स फेडरेशनचा राज्यस्तरीय प्रथम क्रमांकाचा सर्वोत्कृष्ट बँक पुरस्कार

  मनमाड - शहरात गेली 29 वर्ष कार्यरत असलेली व मनमाड शहराची अर्थ वाहिनी असलेल्या प्रगती अर्बन...

read more
भुमी क्रिकेट अकॅडमीतील आर्या साळुंखे , स्वरांजली पवार व सुहानी बोरा यांची नंदुरबार जिल्हा क्रिकेट आसोसिएशन महिला अंडर 15 संघात निवड

भुमी क्रिकेट अकॅडमीतील आर्या साळुंखे , स्वरांजली पवार व सुहानी बोरा यांची नंदुरबार जिल्हा क्रिकेट आसोसिएशन महिला अंडर 15 संघात निवड

मनमाड - BCCI अंतर्गत असलेल्या महाराष्ट्र क्रिकेट आसोसिएशन आयोजीत आमंत्रितांच्या स्पर्धेसाठी (...

read more
सेंट झेवियर हायस्कूल मनमाड येथे शिकणाऱ्या वेदांत रवींद्र सोनवणेची नाशिक जिल्हा बास्केटबॉल संघात निवड

सेंट झेवियर हायस्कूल मनमाड येथे शिकणाऱ्या वेदांत रवींद्र सोनवणेची नाशिक जिल्हा बास्केटबॉल संघात निवड

मनमाड- महाराष्ट्र बास्केटबॉल असोसिएशन यांच्या मान्यतेने तसेच नाशिक डिस्ट्रिक्ट बास्केटबॉल असोसिएशन...

read more
.