loader image

राष्ट्रीयकृत बँक मॅनेजर व कर्मचाऱ्यांनी शेतकरी व सामान्य ग्राहकांना चांगली वागणूक द्यावी : आ.सुहास आण्णा कांदे

Aug 23, 2023


नांदगाव सोमनाथ घोगांणे

आज शिवनेरी शासकीय विश्रामगृह येथील मा.बाळासाहेब ठाकरे सभागृहा मध्ये आमदार सुहास आण्णा कांदे यांनी सर्व राष्ट्रीयकृत बँक अधिकाऱ्यांची विविध विषयांवर बैठक घेतली.
गेल्या अनेक दिवसांपासून नांदगाव मधील बँक कर्मचारी ग्राहकांना योग्य मार्गदर्शन करत नाही, सहकार्य करत नाही किंवा उद्घटपने वागतात अशा तक्रारी आमदार संपर्क कार्यालयात आल्या होत्या. या पार्श्वभूमीवर आज आमदार सुहास आण्णा कांदे यांनी सर्व अधिकाऱ्यांची बैठक बोलावण्यात आली होती.
या वेळी उपस्थित सर्व बँक मॅनेजर यांना सद्यपरिस्थिती पाहता ग्रामीण भागातील शेतकरी बांधवांना कर्ज प्रकरण असो वा इतर काहीही काम असो आपण सहकार्याची भूमिका घेऊन काम करावे अशी सूचना केली. आपण कर्मचारी आहात आणि गाव आमचे आहे तेंव्हा आपण सामंजस्य घेऊन प्रत्येक ग्राहकाला समजून घ्या त्याला मदत करा असे आवाहन केले. ग्राहकांना त्रास होईल असे कोणी कर्मचारी वागत असेल तर त्याला तशी ताकीद द्या असे या वेळी सांगितले.
या बैठकीत स्टेट बँक, महाराष्ट्र बँक, बँक ऑफ बडोदा, महारष्ट्र ग्रामीण बँक, एच डी एफ सी बँक, युनियन बँक आदी बँकेचे मॅनेजर यावेळी उपस्थित होते.


अजून बातम्या वाचा..

भीमोत्सव समिती आयोजित प्रसिद्ध खंजिरी वादक मीरा उमप यांच्या गीतांची मैफल संपन्न

भीमोत्सव समिती आयोजित प्रसिद्ध खंजिरी वादक मीरा उमप यांच्या गीतांची मैफल संपन्न

मनमाड - डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त भीमोत्सव आयोजन समितीच्या वतीने आयोजित करण्यात...

read more
कवयित्री प्रतिभा खैरनार यांच्या ‘वंशावळीच्या प्राचीन सरीतून’ काव्यसंग्रहाचे पुण्यात प्रकाशन

कवयित्री प्रतिभा खैरनार यांच्या ‘वंशावळीच्या प्राचीन सरीतून’ काव्यसंग्रहाचे पुण्यात प्रकाशन

  नांदगाव: मारुती जगधने येथील प्रसिद्ध कवयित्री,कथा लेखिका यांच्या 'वंशावळीच्या प्राचीन...

read more
.