loader image
[ays_poll id=7]

केंद्र आणि राज्य सरकारच्या विरोधात शिवसेना (उबाठा) आक्रमक – रोखला मनमाड चांदवड  मार्ग

Aug 28, 2023


नांदगाव तालुक्यात यंदा पुरेसा समाधानकारक पाऊस पडलेला नाही. त्यामुळे नांदगाव तालुक्यात दुष्काळाची गंभीर स्थिती निर्माण झालेली आहे. तालुक्यातील शेतकरी, नागरिक व हातमजूर कामगार व इतर घटक हवालदिल झाले आहे. दुष्काळाचे गंभीर परिणाम दिसत असून शेतकऱ्यांनी पेरलेले पिक येऊ शकलेले नाही त्यामुळे तालुक्यातील शेतकऱ्यांना पिकाचे नुकसानीची भरपाई मिळावी तालुक्यातील ज्या गावांमध्ये पिण्याचे पाण्याची गंभीर समस्या उद्भवत आहे त्या गावांना तात्काळ टँकरद्वारे पाणीपुरवठा करणेत यावा. दुष्काळाची तीव्रता पाहता जनावरांचे देखील चाऱ्याचा प्रश्न निर्माण झालेला असल्याने शासनाच्या नियमाप्रमाणे जनावरांसाठी तालुक्यात ठिकठिकाणी चारा छावण्या सुरू करणेत याव्यात.
केंद्र शासनाने कांद्याचे निर्यातीवर ४० टक्के निर्यात शुल्क आकारणेचा निर्णय घेतलेला आहे. शासनाच्या या निर्णयामुळे तालुक्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होणार आहे. या शासन निर्णयामुळे कांद्याचा बाजारभाव पडण्याची भिती निर्माण झाली आहे. त्यामुळे सदरचे निर्यात शुल्कवाढीचा निर्णय केंद्र शासनाने त्वरीत मागे घ्यावा. राज्य सरकारने राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी कांदा अनुदान जाहीर केलेले आहे मात्र ते अद्यापही शेतकऱ्यांचे खात्यात जमा झालेले नाही. त्यामुळे सदरचे कांदा अनुदान तात्काळ सरसकटपणे एकरकमी कोणतेही टप्पे न करता शेतकऱ्यांचे खात्यात जमा
करणेत यावे तसेच कांदा अनुदानासाठी शेतकऱ्यांचे ७/१२ उताऱ्यावर कांदा पिकाचे नोंद असोची अट शिथील करण्यात यावी व तात्काळ सरसकट सर्व शेतकर्यांचे बँक खात्यात सदरचे कांदा अनुदान जमा करणेत यावे. तालुक्यातील शेतकऱ्यांना सन २०१८ ते २०२० मधील पिक विम्याचे पैसे अद्याप मिळालेला नाही, त्यामुळे सदर पिक विम्याचे पैसे देखील संबंधीत शेतकऱ्यांना तात्काळ मिळावे अशी मागणी शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे निवेदन देऊन करण्यात आली आहे. सर्व मागण्यासंदर्भात तात्काळ निर्णय न घेतल्यास शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हाप्रमुख गणेश जगन्नाथ पात्रक यांच्या नेतृत्वाखाली नांदगाव तालुक्यातील समस्त शेतकरी हातमजूर कामगार व इतर घटक यांना सोबत घेऊन राष्ट्रीय महमार्ग बंद करण्यात येईल व रेल रोको सारखे अतिउग्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल व त्यांच्या होणाऱ्या परिणामास सर्वस्वी शासन जबाबदार राहील याची नोंद घेण्यात यावी असा इशारा देण्यात आला आहे.

याप्रसंगी शिवसेना सहसंपर्कप्रमुख प्रवीण नाईक, जिल्हा प्रमुख गणेश धात्रक, उप जिल्हा प्रमुख संतोष बळीद, शहरप्रमुख माधव शेलार, भाऊ पाटील,दिनेश केकाण, कैलास भाबड,अनिल दराडे, विनय आहेर, संजय कटारिया, सनी फसाटे, इरफान शेख, भैया घुगे आदींसह शिवसेना पदाधिकारी, शेतकरी बांधव उपस्थित होते.


अजून बातम्या वाचा..

जिल्हास्तरीय क्रिकेट सामण्यात भुमी क्रिकेट अकॅडमीतील खुशाल परळकर चे दमदार अर्धशतक तर युवराज शर्माचे चार बळी

जिल्हास्तरीय क्रिकेट सामण्यात भुमी क्रिकेट अकॅडमीतील खुशाल परळकर चे दमदार अर्धशतक तर युवराज शर्माचे चार बळी

  रविवार 04 मे 25 रोजी BCCI अंतर्गत असलेल्या महाराष्ट्र क्रिकेट आसोसिएशन क्रिकेट आसोसिएशन...

read more
पिंपरी हवेली येथील प्रतिष्ठित कापूस व्यापारी व समाजसेवक योगेश साहेबराव वाघ यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्त्यांचा शिवसेना पक्षात प्रवेश.

पिंपरी हवेली येथील प्रतिष्ठित कापूस व्यापारी व समाजसेवक योगेश साहेबराव वाघ यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्त्यांचा शिवसेना पक्षात प्रवेश.

  पिंपरी हवेली येथील सोसायटीचे माजी चेअरमन शिवाजी दामू वाघ बाळासाहेब वाघ पिंटू गांगुर्डे संजय...

read more
सिटू संघटनेसह विविध नगरपालिका कर्मचाऱ्यांचा महाराष्ट्र नगरपालिका कर्मचारी कामगार विकास सेनेत जाहीर प्रवेश

सिटू संघटनेसह विविध नगरपालिका कर्मचाऱ्यांचा महाराष्ट्र नगरपालिका कर्मचारी कामगार विकास सेनेत जाहीर प्रवेश

  "मनमाड शहरात कामगार भवन बांधणार : आमदार सुहास अण्णा कांदे." नांदगाव येथील आमदार निवासस्थानी...

read more
जिल्हास्तरीय क्रिकेट सामण्यात भुमी क्रिकेट अकॅडमीतील खुशाल परळकर शतकवीर तर मयंक भालेरावची अर्धशतकीय खेळी

जिल्हास्तरीय क्रिकेट सामण्यात भुमी क्रिकेट अकॅडमीतील खुशाल परळकर शतकवीर तर मयंक भालेरावची अर्धशतकीय खेळी

  गुरुवार 01 मे 25 रोजी BCCI अंतर्गत असलेल्या महाराष्ट्र क्रिकेट आसोसिएशन क्रिकेट आसोसिएशन...

read more
महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन अंडर 16 जिल्हास्तरीय क्रिकेट सामन्यात भुमी क्रिकेट अकॅडमीतील खुशाल परळकरची शतकीय खेळी हा – जिल्हास्तरीय सामण्यात पहिले शतक

महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन अंडर 16 जिल्हास्तरीय क्रिकेट सामन्यात भुमी क्रिकेट अकॅडमीतील खुशाल परळकरची शतकीय खेळी हा – जिल्हास्तरीय सामण्यात पहिले शतक

  गुरुवार 1 मे 25 रोजी BCCI अंतर्गत असलेल्या महाराष्ट्र क्रिकेट आसोसिएशन क्रिकेट असोसिएशन...

read more
.