loader image
[ays_poll id=7]

मतदारसंघातप्रत्येक घरा घरात २४ तास पाणी यावे हेच माझं स्वप्न – आमदार कांदे जलजीवन मिशन कामांचे लोकार्पण व पाहणी दौरा संपन्न

Aug 28, 2023


नांदगाव तालुक्यातील कासारी व बोलठाण घाटमाथा परिसरात जल जीवन मिशन अंतर्गत सुरू असलेल्या कामांचा पाहणी दौरा आमदार सुहास आण्णा कांदे यांनी केला.
कासारी येथील इंदिरानगर, जातेगाव येथील वसंतनगर व चंदनपुरी तांडा येथील कामांचे लोकार्पण या वेळी करण्यात आले. या योजने अंतर्गत नागरिकांना 24 तास शुद्ध पाणी मिळणार आहे. जल जीवन मिशन अंतर्गत पाण्याचा स्त्रोत म्हणून विहीर, पाण्याची टाकी, पाईप लाईन व गावं अंतर्गत वितरण व्यवस्था या सुविधा उपलब्ध करून दिल्या जात आहेत.
आमदार सुहास आण्णा कांदे यांनी यावेळी उपस्थित महिलांचे अभिनंदन केले, ग्रामीण भागात असलेली वन वन पाहता आता जलजीवन मिशन अंतर्गत 24 तास पाणी उपलब्ध झाले असून माझ्या माता माय माऊलींचे पाण्याची आज पासून थांबलेली आहे असे त्यांनी सांगितले.
मतदार संघातील प्रत्येक घराघरात पाणी पोहोचवण्याचे माझे स्वप्न असून या मार्गाने मी प्रामाणिक प्रयत्न करीत असल्याची आमदार सुहास अण्णा कांदे यांनी मनोगतात सांगितले.
या वेळी घाटमाथ्यावरील ढेकू,जातेगाव,बोलठाण, रोहिला,येथे सुरू असलेल्या जलजीवन मिशन अंतर्गत कामांची पाहणी करून काम चांगल्या प्रतीचे व वेळेत पूर्ण करण्याचे निर्देश दिले. कामाबाबत असलेल्या अडचणी समजून घेत त्याही तात्काळ सोडवण्याचे आश्वासन आमदार सुहास कांदे यांनी दिले.
यावेळी शिवसेना ज्येष्ठ नेते बापूसाहेब कवडे, कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती अर्जुन पाटील, नागापूर सरपंच राजेंद्र पवार, जिल्हाप्रमुख किरण देवरे, प्रमोद भाबड, बोलठाण सरपंच वाल्मिक गायकवाड, अनिल रिंढे, रफिक पठाण, दत्तात्रय निकम ,गुलाब चव्हाण, संजय बोरसे, संजय पवार, मनोज रिंढे, गोकुळ कोठारी, बापूसाहेब जाधव, शुभम आव्हाड, आण्णा मुंढे, सौ.अनिता संतोष सरपंच कासारी इप्पर, काशिनाथ काळे, सोनाली राठोड, नितीन शेरेकर, अंबादास पवार, तुळशीराम शिंगाडे, नाना राठोड, प्रकाश चव्हाण, ईश्वर राठोड, भाऊसाहेब चव्हाण,अनिल अरबुज, सरपंच ठकुबाई पवार, अवधूत गायकवाड, सचिन गायखे, भगवान गायखे गटविकास अधिकारी गणेश चौधरी, अशोक बिन्नर उप अभियंता ग्रामीण पाणी पुरवठा उप विभाग नांदगांव यांच्या सह नागरिक उपस्थित होते.


अजून बातम्या वाचा..

भुमी क्रिकेट अकॅडमीतील स्वामी दिंडे , खुशाल परळकर, गौरव निते व हसनेन शेख यांची नंदुरबार जिल्हा क्रिकेट असोसिएशन अंडर 19* संघात निवड

भुमी क्रिकेट अकॅडमीतील स्वामी दिंडे , खुशाल परळकर, गौरव निते व हसनेन शेख यांची नंदुरबार जिल्हा क्रिकेट असोसिएशन अंडर 19* संघात निवड

* BCCI अंतर्गत असलेल्या महाराष्ट्र क्रिकेट आसोसिएशन आयोजीत आमंत्रितांच्या स्पर्धेसाठी (...

read more
के आर टी हायस्कूल अँड जुनियर कॉलेजमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन साजरा करण्यात आला

के आर टी हायस्कूल अँड जुनियर कॉलेजमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन साजरा करण्यात आला

. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे प्राचार्य मुकेश मिसर यांच्या हस्ते डॉ.बाबासाहेब आंबेडकर...

read more
मार्गशीर्ष मास संकष्ट चतुर्थी निमित्त रविवार दिनांक 07/12/2025 रोजी वेशीतील श्री निलमणी गणेश मंदिरात धार्मिक कार्यक्रम

मार्गशीर्ष मास संकष्ट चतुर्थी निमित्त रविवार दिनांक 07/12/2025 रोजी वेशीतील श्री निलमणी गणेश मंदिरात धार्मिक कार्यक्रम

मनमाड शहराचे आराध्य दैवत आणि नवसाला पावणार गणपती म्हणून पंचक्रोशीत प्रसिद्ध असणाऱ्या वेशीतील श्री...

read more
.