मेलोडी किंग पार्श्वगायक मुकेश चंद माथुर म्हणजेच मुकेशजी यांच्या 47 व्या पुण्यतिथी निमित्ताने त्यांच्या गत स्मृतींना उजाळा देण्यासाठी मनमाड येथील लोकमान्य सभागृह इंडियन हायस्कूल येथे संगीत मैफिलीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला.कार्यक्रमाचे आयोजन व्हाईस ऑफ मुकेश श्री.दाभाडे व श्री.मंगेश कुलकर्णी ( पॉपुलर इलेक्ट्रॉनिक्स) गांधी चौक यांनी केले तर कार्यक्रमाचे सुत्रसंचालन आणी संगीत दिग्दर्शन प्रा.विनोद मोगल अहिरे ( संगीत विशारद तथा संचालक ऑर्केस्ट्रा स्वर संबोधी) यांनी केले. या कार्यक्रमाला दर्दी रसिक प्रेक्षक आणि नाशिक,भुसावळ,येवला,मालेगाव,धुळे,नांदगांव येथील कलाकार मोठ्या संख्येने उपस्थित होते.
महाराष्ट्र राज्याचे शालेय शिक्षण मंत्री नामदार दादाजी भुसे व नांदगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार सुहास अण्णा कांदे यांचा भव्य नागरी सत्कार नाशिक स्वामीनारायण बँक्वेट हॉल येथे संपन्न झाला.
याप्रसंगी मंचावर नाशिक जिल्ह्यातील शिवसेनेचे नेते पदाधिकारी शिवसैनिक उपस्थित होते. नागरी सत्कार...









