loader image
[ays_poll id=7]

जिल्ह्यात लम्पी चर्मरोगाचा प्रादुर्भाव वाढला – जिल्हाधिकारी जलज शर्मा यांच्या उपस्थितीत बैठक संपन्न

Aug 31, 2023

जिल्ह्यात जनावरांमधील लम्पी चर्मरोगाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता, प्राण्यांमधील संक्रमण व सांसर्गिक रोग प्रतिबंधक व नियंत्रण अधिनियम 2009 नुसार संपूर्ण नाशिक जिल्हा जनावरांमधील लम्पी चर्मरोग या आजारासाठी बाधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात येत आहे. या अनुषंगाने पशुसंवर्धन विभागाने गोवर्गीय पशुधनातील या साथीच्या रोगाला नियंत्रणात आणण्यासाठी आवश्यक ती कार्यवाही करावी, अशा सूचना जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी दिल्या.
जिल्हाधिकारी कार्यालयातील मध्यवर्ती सभागृहात लम्पी चर्मरोग प्रादुर्भावाच्या नियंत्रणासाठी जिल्हास्तरीय समितीच्या बैठकीत ते बोलत होते. या बैठकीस जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अर्जुन गुंडे, जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त डॉ. गिरीश पाटील, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. संजय शिंदे आदी उपस्थित होते.जिल्हाधिकारी जलज शर्मा म्हणाले, जिल्ह्यातील 15 पैकी 12 तालुक्यातील गोवंशीय जनावरांमध्ये लम्पी चर्मरोग या साथीच्या आजाराचा प्रादुर्भाव आढळून आला आहे. त्यामुळे बाधित क्षेत्रातील जनावरांचे शेड निर्जंतुकीकरण शीघ्र कृती दल स्थापन करून हा साथीचा आजार नियंत्रणात आणण्यासाठी प्रतिबंधीत लसीकरणाचे नियोजनाबाबत तत्काळ कार्यवाही करण्यात यावी.

तसेच बाधित क्षेत्रातील म्हणजेच संपूर्ण जिल्ह्यातील गोवर्गीय जनावरांची खरेदी, विक्री, बाजार, शर्यती व जत्रा, प्रदर्शन यांचे आयोजन करण्यास प्रतिबंध करण्यात यावा. आंतर राज्य, आंतर जिल्हा व जिल्ह्यांतर्गत गोवर्गीय पशुधनाची सर्व प्रकारची वाहतूक बंद करण्यासाठी पोलीस यंत्रणेचे सहाय्य घेण्यात यावे. तसेच परराज्यातून जे गोवर्गीय पशुधन आपल्या जिल्ह्यात येत असेल त्याच्या तपासणीसाठी आंतर राज्यमार्गावर तपासणी नाका सुरू करावा, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

ज्याठिकाणी गोवर्गीय जनावरांमध्ये लम्पी आजाराचे लक्षणे आढळल्यास त्याबाबत तत्काळ लगतच्या पशुवैद्यकीय चिकित्सालयास संपर्क साधावा. गोठ्यांचा परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी नियमीतपणे निर्जंतुक फवारणी करावी. त्याचप्रमाणे साथीच्या रोगामुळे मृत पावलेल्या जनावरांची योग्य प्रकारे विल्हेवाट लावण्यासाठी संबंधित विभागाने दिलेल्या मार्गदर्शक सूचनांची काटेकोरपणे अंमलबजावणी करावी, अशा सूचनाही जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी यावेळी दिल्या.

अजून बातम्या वाचा..

मनमाड महाविद्यालयातर्फे ‘स्वच्छता ही सेवा’ उपक्रमांतर्गत वागदर्डी धरण परिसरात प्लास्टिक मुक्त अभियान’

मनमाड महाविद्यालयातर्फे ‘स्वच्छता ही सेवा’ उपक्रमांतर्गत वागदर्डी धरण परिसरात प्लास्टिक मुक्त अभियान’

महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित, कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय मनमाड यांच्या राष्ट्रीय सेवा...

read more
मनमाड चे आराध्य दैवत श्री निलमणी गणेशाच्या पार्थिव मूर्तीची ढोल ताशा च्या गजरात पालखी तून विसर्जन महामिरवणुक संपन्न

मनमाड चे आराध्य दैवत श्री निलमणी गणेशाच्या पार्थिव मूर्तीची ढोल ताशा च्या गजरात पालखी तून विसर्जन महामिरवणुक संपन्न

मनमाड - मनमाड शहराचे आराध्य दैवत व नवसाला पावणारा व गणेश उत्सवा तील प्रथम मानाचा गणपती म्हणून...

read more
श्री गुरुगोविंद सिंग हायस्कूल मनमाड चे शालेय शासकीय शिकाई (मार्शल आर्ट ) , जीत -कुणे -दो व थांग-था मार्शल आर्ट स्पर्धेत घवघवीत यश…

श्री गुरुगोविंद सिंग हायस्कूल मनमाड चे शालेय शासकीय शिकाई (मार्शल आर्ट ) , जीत -कुणे -दो व थांग-था मार्शल आर्ट स्पर्धेत घवघवीत यश…

  नाशिक येथे मीनाताई ठाकरे स्टेडियम येथे झालेल्या क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र...

read more
बघा व्हिडिओ : पाण्याखाली श्रीगणेशाची प्रतिमा रांगोळी ने साकारत बाप्पाचे अनोखे विसर्जन…!

बघा व्हिडिओ : पाण्याखाली श्रीगणेशाची प्रतिमा रांगोळी ने साकारत बाप्पाचे अनोखे विसर्जन…!

या गणेशोत्सवात लाडक्या श्रीगणेशाच्या आगमनाने दहा दिवस सर्वत्र प्रसन्नमय वातावरण झाले. बाप्पाच्या...

read more
बघा व्हिडिओ-भाद्रपद महागणेशोत्सव 2024 निमित्त वेशीतील प्राचीन श्री निलमणी गणेश मंदीरात सलग 10 वर्षी

बघा व्हिडिओ-भाद्रपद महागणेशोत्सव 2024 निमित्त वेशीतील प्राचीन श्री निलमणी गणेश मंदीरात सलग 10 वर्षी

छप्पन महाभोग (महानैवेद्य) कार्यक्रमाचे आयोजन संपन्न गणेश भक्तांचा उदंड प्रतिसाद मनमाड - आम्ही...

read more
नाशिक जिल्हा बँकेने ९ कर्जदारांना बजावल्या अंतीम जप्तीच्या नोटीसा; थकबाकीदारांमध्ये भीतीचे वातावरण ?

नाशिक जिल्हा बँकेने ९ कर्जदारांना बजावल्या अंतीम जप्तीच्या नोटीसा; थकबाकीदारांमध्ये भीतीचे वातावरण ?

नांदगाव : मारुती जगधने नांदगांव तालुक्यातील जिल्हा बँकेचे कर्ज घेतलेल्या व थकित झालेल्या ९...

read more
मनमाड महाविद्यालयात हिंदी दिवस उत्साहात साजरा… “हिंदी फक्त राष्ट्रभाषाच नव्हे तर विश्व भाषा” – श्री.राजेंद्र जगताप

मनमाड महाविद्यालयात हिंदी दिवस उत्साहात साजरा… “हिंदी फक्त राष्ट्रभाषाच नव्हे तर विश्व भाषा” – श्री.राजेंद्र जगताप

मनमाड: येथील महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित, कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयाच्या पदव्युत्तर...

read more
भाद्रपद महागणेशोत्सव ➖2024 निमित्त रविवारी वेशीतील प्राचीन श्री निलमणी गणेश मंदीरात सलग 10 वर्षी छप्पन महाभोग (महानैवेद्य) व श्री सत्यविनायक महापूजा या धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन

भाद्रपद महागणेशोत्सव ➖2024 निमित्त रविवारी वेशीतील प्राचीन श्री निलमणी गणेश मंदीरात सलग 10 वर्षी छप्पन महाभोग (महानैवेद्य) व श्री सत्यविनायक महापूजा या धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन

मनमाड - आम्ही परंपरा पाळतो... आम्ही संस्कृती चे रक्षण करतो.... हे ब्रीद घेऊन मनमाड शहरात धार्मिक...

read more
.