के आर टी हायस्कूल व जुनिअर कॉलेजमध्ये राष्ट्रीय क्रीडा दिन साजरा करण्यात आला .दिनांक 28 ऑगस्ट हा दिवस राष्ट्रीय क्रीडा दिन म्हणून साजरा करण्यात येत असून के आर टी हायस्कूल मध्ये दरवर्षी मुलांमध्ये खेळाचे महत्व व आवड निर्माण होण्यासाठी हा दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो. 28 ऑगस्टला इयत्ता नववीच्या विद्यार्थ्यांनी या दिवसाचे महत्त्व सांगितले .सदर माहिती वैष्णवी आव्हाड व ईश्वरी शिंदे या मुलींनी 28 ऑगस्ट चे महत्त्व .खेळाबद्दल ची माहिती मुलांना दिली. या राष्ट्रीय क्रीडा दिनाच्या निमित्त इयत्ता नववी व दहावी वर्गातील मुलांची हॉलीबॉल मॅच चे आयोजन करून विजयी संघाला पारितोषिक देण्यात आले .यावेळी शाळेचे प्राचार्य मुकेश मिसर मुख्याध्यापक दीपक व्यवहारे. उपप्राचार्य वैभव कुलकर्णी विश्वस्त धनंजय निंभोरकर व सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यावेळी उपस्थित होते. या विद्यार्थ्यांना शाळेचे क्रीडाशिक्षक विशाल झाल्टे यांचे अनमोल असे मार्गदर्शन लाभले.














