loader image
[ays_poll id=7]

मंगळवारी मनमाड येथे रोजगार मेळावा तर बुधवारी नांदगावला विविध लोकोपयोगी सुविधांचे लोकार्पण – दुष्काळाची तीव्रता बघता वाढदिवस साजरा न करण्याचा आमदार कांदे यांचा निर्णय

Sep 4, 2023


पावसाने ओढ दिल्याने नाशिक जिल्ह्यासह नांदगाव तालुक्यात दुष्काळाची तीव्रता पाहता वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय नांदगाव तालुक्याचे आमदार सुहास आण्णा कांदे यांनी घेतला आहे.
आमदार सुहास आण्णा कांदे यांच्या वाढदिवसानिमित्त नागरिकांसाठी विविध लोकपयोगी सुविधांचे लोकार्पण करण्यात येणार आहे .

आमदार सुहास आण्णा कांदे यांच्या स्वखर्चातून मतदारसंघातील नागरिकांच्या सेवेत
9 जल रथ ( पाण्याचे टँकर)
3 नवीन सुसज्ज रुग्णवाहिका
1 मोफत फिरता दवाखाना
1 मोफत शासकीय सुविधा केंद्र
2 वैकुंठ रथ
दीव्यांग बंधावांकरिता 100 सायकल
मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया स्वतंत्र बस
लोकार्पण
बुधवार दिनांक 6 सप्टेंबर रोजी
गुप्ता लॉन्स , नांदगाव येथे
सकाळी 11 वाजता करण्यात येणार आहे.
मंगळवार दिनांक 5 सप्टेंबर रोजी शिवसेना संपर्क कार्यालय मनमाड येथे भव्य रोजगार मेळावा आयोजित करण्यात आला असून जास्तीत जास्त तरुणांनी या मेळाव्याचा लाभ घ्यावा असे आवाहन आमदार कांदे यांनी केले आहे.
मतदारसंघातील जास्तीत जास्त तरुणांना नोकरी मिळवून देण्याच्या उद्देशाने भव्य रोजगार मेळावा आयोजित केला असल्याचे त्यांनी सांगितले.
बुधवार दिनांक 6 सप्टेंबर रोजी नागरिकांच्या भेटीसाठी नांदगाव निवासस्थानी उपस्थित राहणार असून कोणीही पुष्पगुच्छ, हार तुरे आणू नये असे आवाहन आमदार सुहास आण्णा कांदे यांनी केले आहे.


अजून बातम्या वाचा..

व्यसनाधीन तरुण देशाच्या शाश्वत विकासासाठी धोक्याचे जागतिक युवा दिनानिमित्त मनमाड महाविद्यालयात, पोस्टर रांगोळी व पथनाट्य यांचे सादरीकरण

व्यसनाधीन तरुण देशाच्या शाश्वत विकासासाठी धोक्याचे जागतिक युवा दिनानिमित्त मनमाड महाविद्यालयात, पोस्टर रांगोळी व पथनाट्य यांचे सादरीकरण

महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयाच्या रेड रिबन क्लब, राष्ट्रीय...

read more
श्रावण मास अंगारक (मंगळी ) संकष्ट चतुर्थी निमित्त मंगळवार दिनांक 12/08/2025 रोजी वेशीतील श्री निलमणी गणेश मंदिरात विशेष धार्मिक कार्यक्रमा चे आयोजन

श्रावण मास अंगारक (मंगळी ) संकष्ट चतुर्थी निमित्त मंगळवार दिनांक 12/08/2025 रोजी वेशीतील श्री निलमणी गणेश मंदिरात विशेष धार्मिक कार्यक्रमा चे आयोजन

मनमाड - शहराचे आराध्य दैवत आणि नवसाला पावणार गणपती म्हणून पंचक्रोशीत प्रसिद्ध असणाऱ्या वेशीतील...

read more
भारतीय जनता पार्टी मनमाड शहर प्रणित भाजप कामगार आघाडीच्या शहर शाखेच्या फलकाचे उदघाटन

भारतीय जनता पार्टी मनमाड शहर प्रणित भाजप कामगार आघाडीच्या शहर शाखेच्या फलकाचे उदघाटन

मनमाड - भारतीय जनता पार्टी देश स्तरावर विविध क्षेत्रामध्ये काम करीत असते कामगार क्षेत्रामध्ये...

read more
.