Breaking News

[post-marguee]

[ays_poll id=7]

मनमाड येथे जिल्हास्तरीय बास्केट बॉल स्पर्धा संपन्न

Sep 6, 2023

मनमाड : झेवियर्स स्पोट् र्स क्लब मनमाड व प्रिन्सी मेमोरियल फाउंडेशन( पुणे)द्वारा आयोजित जिल्ह्यातील निमंत्रित संघाच्या भव्य जिल्हास्तरीय बास्केटबॉल स्पर्धा रविवार दिनांक 3 सप्टेंबर 2023 रोजी संत झेवियर्स हायस्कूलच्या बास्केटबॉल मैदानावर संपन्न झाल्या. या स्पर्धेत प्रथम क्रमांकाचे श्री. प्रशांत बनसोडे यांच्या कडून देण्यात आलेले रोख रु.5001चे पारितोषिक एपेक्स -ए नाशिक या संघाने पटकावले. स्वर्गीय निलेश शिंपी यांच्या स्मरणार्थ मित्रपरिवारा तर्फे देण्यात आलेले द्वितीय क्रमांकाचे 3001रु.चे पारितोषिक के.व्ही.नाशिक या संघाने पटकावले. तृतीय क्रमांकाचे श्री. मुकुंद झाल्टे यांच्यातर्फे देण्यात आलेले रोख रु.1001चे पारितोषिक विज्डम हायस्कूल नाशिक या संघाने पटकावले.बेस्टशुटरचे पारितोषिक साई ससाणे, बेस्ट ऑलराऊंडरचे पारितोषिक अश्विन, बेस्ट डिफेन्स चे पारितोषिक ध्रुव बोरा यांनी पटकावले.शिस्तप्रिय संघाचे पारितोषिक मनमाडच्या झेवियर -ए संघाने पटकावले.
या.याशिवाय स्वर्गवासी आनंदीबाई सुमंतराव दोंदे यांच्या स्मरणार्थ श्री.दिवाकर दोंदे यांच्याकडून सर्व चषके देण्यात आली. स्वर्गवासी शशिकला अमोलिक, यादवराव अमोलिक, व संगीता अमोलिक यांच्या स्मरणार्थ 501रु पारितोषिके श्री.सुशील अमोलिक यांच्यातर्फे देण्यात आली.श्री. परविंदरसिंग रिसम यांच्या तर्फेही काही बक्षिसे देण्यात आली.पारितोषिक वितरण प्रसंगी या.फादर लाईड, श्री. प्रशांत बनसोडे, श्री.मुकूंद झाल्टे.श्री.दिवाकर दोंदे श्री.सुशील अमोलिक,सुचित सोनवणे,संदीप सोनवणे,महेश कातकडे,हेमंत ठाकूर आदी मान्यवर उपस्थित होते.कार्यक्रमाचे सुत्रसंचालन श्री.हेमंत वाले यांनी तर प्रास्ताविक श्री.दत्तू जाधव सरांनी केले.विजेत्या संघास मान्यवरांच्या हस्ते पारितोषिके देण्यात आलीत. या स्पर्धेला संत झेवियर विद्यालयाचे माननीय मुख्याध्यापक फादर माल्कम नातो यांचे विशेष सहकार्य लाभले आहे. सर्वश्री दिवाकर दोंदे,अनिल निकाळे, सुधाकर कातकडे , दत्तू जाधव, स्वप्निल बाकळे, तेजस अमोलिक, महेश पाथरकर, लक्ष्मीकांत दरवडे, परविंदर सिंग रिसम, सीमोन स्वामी, रितेश माळी, करण गरुड ,शाहरुख मिर्झा, श्रीकांत फाटे, देविदास गांगुर्डे,सागर साळवे,आदित्य गरुड ,मयुर मुंढे,निरज राजपूत, सिद्धार्थ कुसमाडे अथर्व कुलकर्णी व झेवियर स्पोर्ट्स क्लबचे सर्व सदस्यांनी विशेष परिश्रम घेतले.

अजून बातम्या वाचा..

माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय वाघदर्डी येथे डॉ.एपीजे अब्दुल कलाम यांची जयंती व वाचन प्रेरणा दिन उत्साहात साजरा

माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय वाघदर्डी येथे डॉ.एपीजे अब्दुल कलाम यांची जयंती व वाचन प्रेरणा दिन उत्साहात साजरा

माध्यमिक विद्यालय वागदर्डी येथे भारताचे माजी राष्ट्रपती, थोर शास्त्रज्ञ, मिसाईल मॅन डॉ. एपीजे...

read more
डॉ.संपदा प्रशांत हिरे यांच्या वाढदिवसानिमित्त मनमाड महाविद्यालयात जलसंवर्धन व पाणीबचत जनजागृती अभियानास प्रारंभ

डॉ.संपदा प्रशांत हिरे यांच्या वाढदिवसानिमित्त मनमाड महाविद्यालयात जलसंवर्धन व पाणीबचत जनजागृती अभियानास प्रारंभ

मनमाड : महात्मा गांधी विद्यामंदिर संस्थेच्या समन्वयिका डॉ. संपदा प्रशांत हिरे यांच्या...

read more
नांदगाव तालुकास्तरीय योग स्पर्धेत प्रकृती स्कूलच्या विद्यार्थ्यांचे उल्लेखनीय यश

नांदगाव तालुकास्तरीय योग स्पर्धेत प्रकृती स्कूलच्या विद्यार्थ्यांचे उल्लेखनीय यश

नांदगाव येथे आयोजित करण्यात आलेल्या तालुकास्तरीय योग स्पर्धेत प्रकृती स्कूलच्या विद्यार्थ्यांनी...

read more
मनमाड येथे अग्रसेन जयंती उत्सव उत्साहात संपन्न ; महिला समितीच्या अध्यक्षपदी सौ.मनिषा रमेश अग्रवाल यांची निवड

मनमाड येथे अग्रसेन जयंती उत्सव उत्साहात संपन्न ; महिला समितीच्या अध्यक्षपदी सौ.मनिषा रमेश अग्रवाल यांची निवड

मनमाड येथे अहिंसा व समतेचे प्रतिक अग्रकुल प्रवर्तक छत्रपति महाराजाधिराज अग्रसेन जी भगवान यांचा...

read more
आगामी कुंभमेळ्यात आर्थिक लाभाबरोबर स्थानिक अर्थव्यवस्थेला मोठी गती मिळेल – बाळकृष्ण भरतिया

आगामी कुंभमेळ्यात आर्थिक लाभाबरोबर स्थानिक अर्थव्यवस्थेला मोठी गती मिळेल – बाळकृष्ण भरतिया

बारा वर्षानंतर गोदावरी तीरावर होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळा फक्त धार्मिक पर्वणी नाही तर...

read more
[hsas-shortcode group="" speed="10" direction="left" gap="50"]