केंद्रातील सरकार देशभरातील शालेय विद्यार्थ्यांचा डेटा गोळा करीत आहे. देशभरातील शालेय विद्यार्थ्यांना अपार आयडी (APAAR) देण्यात येणार आहे. एक देश एक विद्यार्थी आयडी अंतर्गत केंद्रीय शिक्षण मंत्रालय शालेय विद्यार्थ्यांचा आधार क्रमांक, नाव, पत्ता, जन्मतारीख आणि फोटोसह अन्य माहिती गोळा करीत आहे. या आयडी कार्डद्वारे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक कारकीर्दीतील सर्व नोंदींसाठी डिजिटल लॉकर तयार केले जाणार आहे.विद्यार्थ्यांची शालेय जीवनातील संपादणूक, इतर उपक्रमातील सहभाग, शैक्षणिक कारकीर्दीतील सर्व नोंदी ‘अपार’ आयडीद्वारे डीजीटल लॉकरमध्ये सुरक्षित ठेवल्या जाणार आहेत. भविष्यात उच्च शिक्षणासाठी तसेच नोकरी, उद्योग यासाठी ‘अपार’ आयडी विद्यार्थ्यांना उपयोगी ठरणार आहे. राज्यात जिल्हा परिषद शाळेतील सर्व मुख्याध्यापकांना यासंबंधीच्या सूचना देण्यात आल्या असून प्रत्येक विद्यार्थ्यांचा आधार क्रमांक आधारित ‘अपार’ आयडी तयार करण्यासाठी पालकांची संमती घेण्यासाठी विशेष पालक सभा घेण्याचे सूचित केले आहे.

राशी भविष्य : १६ सप्टेंबर २०२५ – मंगळवार
मेष : आपल्या मतांविषयी आग्रही राहाल. आरोग्याच्या तक्रारी कमी होतील. वृषभ : महत्त्वाची कामे...