loader image
[ays_poll id=7]

“शारदीय नवरात्रोत्सव “…. आज सहावी माळ

Oct 20, 2023


योगेश म्हस्के
मनमाड : आज शारदीय नवरात्री उत्सवाचा सहावा दिवस , अनेक देवी मंदिरे आणि नवरात्र मंडळामध्ये नवरात्री मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येत आहे.

मनमाड येथील प्रोफेसर कॉलनी येथे श्री धात्रक परिवार यांनी बांधलेल्या श्री अष्टभुजा माता मंदिरामध्ये दरवर्षी मोठ्या उत्साहात नवरात्रोत्सव साजरा करण्यात येत असतो , शहरातील भाविकांची येथे देवी मातेच्या दर्शनासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी होत असुन अनेक धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन देखील नवरात्र उत्सव काळामध्ये मंदिरा मध्ये करण्यात आले आहे.

श्री अष्टभुजा मंदिर हे अनेक वर्ष पुरातन असुन काही वर्षापुर्वी मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात आलेला आहे. मंदिरामध्ये पद्मावती मातेची देखील मुर्ती आहे , या दोनही देवीचे रूप अत्यंत मनमोहक आणि प्रसन्न असुन नवरात्री काळामध्ये देवीच्या दर्शनासाठी शहरातील शेकडो भाविकांची येथे गर्दी होत असते. मंदिराचा परिसर अत्यंत शांत आणि भव्य असुन देवी मंदीरा शेजारी महादेव मंदिर देखील आहे. नवरात्री काळामध्ये मंदिराला आकर्षक विद्युतरोषणाई करून रोज सायंकाळी हरिपाठ , भजन ,आरती , महाप्रसाद आणि विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलेले आहे.


अजून बातम्या वाचा..

मनमाड सार्वजनिक वाचनालय आयोजित निबंध स्पर्धेला शालेय विध्यार्थ्यांचा उदंड प्रतिसाद :578 विध्यार्थ्यांनी घेतला उस्फुर्त सहभाग

मनमाड सार्वजनिक वाचनालय आयोजित निबंध स्पर्धेला शालेय विध्यार्थ्यांचा उदंड प्रतिसाद :578 विध्यार्थ्यांनी घेतला उस्फुर्त सहभाग

मनमाड - मनमाड सार्वजनिक वाचनालय तर्फे स्व.लोकमान्य टिळक यांच्या 168 व्या जयंती तथा व स्व.अण्णाभाऊ...

read more
मध्य रेल्वे महिला कल्याण संघटन संचलित शाळेला रेल प्रबंधक श्रीमती इती पांडे यांची भेट

मध्य रेल्वे महिला कल्याण संघटन संचलित शाळेला रेल प्रबंधक श्रीमती इती पांडे यांची भेट

प्रतिनिधी मनमाड - येथील मध्य रेल्वे महिला कल्याण संघटन संचलित शाळेमध्ये मंडळ श्रीमती इती पांडे...

read more
.