loader image
[ays_poll id=7]

मनमाड महाविद्यालयात विशाखा समितीच्या वतीने आरोग्य संपदा योजनेअंतर्गत व्याख्यान संपन्न

Oct 22, 2023


मनमाड,ता.२१: येथील महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात विशाखा समिती व नाशिक जिल्ह्य गायनिक असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने ‘मुलींचा शारीरिक विकास, पीसीओडी व कॅन्सर या विषयावर शहरातील सुप्रसिद्ध प्रथितयश स्त्रीरोग तज्ञ डॉ. सोनाली गौरव पाटील यांच्या उपस्थितीत आरोग्य संपदा या योजनेअंतर्गत व्याख्यान संपन्न झाले.
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर सुभाष निकम यांच्या मार्गदर्शनाखाली व अध्यक्षतेखाली कार्यक्रम संपन्न झाला. डॉक्टर सोनाली पाटील यांनी आपल्या व्याख्यानात बदलती जीवनशैली व त्यामुळे निर्माण होणाऱ्या स्त्रियांच्या आरोग्य समस्या यावर चर्चा केली.त्याचबरोबर त्यांनी आहार व व्यायाम याबाबतीत गंभीर्याने विचार करावा असा सल्ला दिला महाराष्ट्रात स्त्रियांचे गर्भाशय मुखाचे कॅन्सर व स्तनांच्या कॅन्सरचे प्रमाण झपाट्याने वाढत चालले आहे. यासाठी स्त्रियांनी योग्य ती काळजी घेणे गरजेचे आहे असे आग्रहाने सांगितले. पीसीओडी चे वाढते प्रमाण हे स्त्रियांच्या दृष्टीने अतिशय वाईट व घातक गोष्ट आहे त्यासाठी वेळोवेळी वैद्यकीय मदत व सल्ला घ्यावा . या याप्रसंगी त्यांनी पॉवरपॉईंट सादरीकरण करून अतिशय मौलिक असे आरोग्य विषयक मार्गदर्शन केले व पीसीओडी व कॅन्सर ची माहिती विद्यार्थिनींपर्यंत उत्कृष्टरित्या पोहोचवली. महाविद्यालयाचे प्राचीन डॉक्टर सुभाष निकम यांनी आपल्या अध्यक्षीय मनोगतात विद्यार्थिनींना उत्तम जीवन जगण्यासाठी योग्य आहार व व्यायामाची गरज आहे व त्याचबरोबर पुढील येणारी पिढी सुदृढ निर्माण करणे यासाठी मुलींनी योग्य ती खबरदारी घेणे गरजेचे आहे .मोबाईल मुळे आपले आरोग्य व करियर यावर घातक परिणाम होऊ नये यासाठी योग्य ती काळजी घेणे अतिशय गरजेचे आहे असे निक्षून सांगितले. विशाखा समितीच्या अध्यक्षा प्रा. कविता का खंडकी यांनी प्रास्ताविक केले. डॉ. आरती छाजेड यांनी पाहुण्यांचा परिचय व सूत्रसंचालन केले प्रा.अलका नागरे यांनी आभार प्रदर्शित केले. विशाखा समितीच्या सर्व सदस्यांनी सक्रिय सहभाग नोंदवला प्रा. गणेश गांगुर्डे प्रा. गणेश जावळे प्रा. संदीप ढमाले प्रा. गावित व कुलसचिव श्री समाधान केदारे यांनी कार्यक्रमाच्या आयोजनासाठी मोलाचे सहकार्य केले.


अजून बातम्या वाचा..

पिंपरी हवेली येथील प्रतिष्ठित कापूस व्यापारी व समाजसेवक योगेश साहेबराव वाघ यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्त्यांचा शिवसेना पक्षात प्रवेश.

पिंपरी हवेली येथील प्रतिष्ठित कापूस व्यापारी व समाजसेवक योगेश साहेबराव वाघ यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्त्यांचा शिवसेना पक्षात प्रवेश.

  पिंपरी हवेली येथील सोसायटीचे माजी चेअरमन शिवाजी दामू वाघ बाळासाहेब वाघ पिंटू गांगुर्डे संजय...

read more
सिटू संघटनेसह विविध नगरपालिका कर्मचाऱ्यांचा महाराष्ट्र नगरपालिका कर्मचारी कामगार विकास सेनेत जाहीर प्रवेश

सिटू संघटनेसह विविध नगरपालिका कर्मचाऱ्यांचा महाराष्ट्र नगरपालिका कर्मचारी कामगार विकास सेनेत जाहीर प्रवेश

  "मनमाड शहरात कामगार भवन बांधणार : आमदार सुहास अण्णा कांदे." नांदगाव येथील आमदार निवासस्थानी...

read more
जिल्हास्तरीय क्रिकेट सामण्यात भुमी क्रिकेट अकॅडमीतील खुशाल परळकर शतकवीर तर मयंक भालेरावची अर्धशतकीय खेळी

जिल्हास्तरीय क्रिकेट सामण्यात भुमी क्रिकेट अकॅडमीतील खुशाल परळकर शतकवीर तर मयंक भालेरावची अर्धशतकीय खेळी

  गुरुवार 01 मे 25 रोजी BCCI अंतर्गत असलेल्या महाराष्ट्र क्रिकेट आसोसिएशन क्रिकेट आसोसिएशन...

read more
महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन अंडर 16 जिल्हास्तरीय क्रिकेट सामन्यात भुमी क्रिकेट अकॅडमीतील खुशाल परळकरची शतकीय खेळी हा – जिल्हास्तरीय सामण्यात पहिले शतक

महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन अंडर 16 जिल्हास्तरीय क्रिकेट सामन्यात भुमी क्रिकेट अकॅडमीतील खुशाल परळकरची शतकीय खेळी हा – जिल्हास्तरीय सामण्यात पहिले शतक

  गुरुवार 1 मे 25 रोजी BCCI अंतर्गत असलेल्या महाराष्ट्र क्रिकेट आसोसिएशन क्रिकेट असोसिएशन...

read more
.