श्री निलमणी गणेश मंदीर सार्वजनिक ट्रस्ट तर्फे गरीब रुग्णांना मोफत सेवेसाठी भाद्रपद गणेश उत्सव 2023 मध्ये
रु.41000/- किंमतीचे विक्रमी संकलीत औषधे सेवा भारती (जनकल्याण समिती ) कडे सुपूर्द
मनमाड – मनमाड शहरात धार्मिक, सांस्कृतिक, पर्यावरण ,सामाजिक व शैक्षणिक आरोग्य सेवा क्षेत्रात सन 1997 पासून आम्ही परंपरा पाळतो ….! आम्ही संस्कृती चे रक्षण करतो…! हे ब्रीद वाक्य घेऊन आजपर्यंत अखंडीतपणे 27 वर्षे विविध उपक्रमांद्वारे धार्मिक व सामाजिक आरोग्य सेवाकार्य करणार्या मनमाड शहरात मानाचे स्थान असणार्या श्री निलमणी गणेश मंदीर सार्वजनिक ट्रस्टतर्फे 2017 पासून यंदाही सलग सातवे वर्षी भाद्रपद महा गणेशोत्सव 2023 मध्ये यंदा उत्सवाच्या 27 व्या वर्षानिमित्त गरीब रुग्णांसाठी शिल्लक औषध संकलन केंद्र सुरु करण्यात आले होते. शहरातील नागरिकांना त्यांच्याकडे उपचारानंतर शिल्लक असणारी औषधे की ज्यांची मुदत वैधता (एक्सपायरी डेट) बाकी आहे. ती श्री निलमणी गणेश मंदीरात ठेवण्यात आलेल्या शिल्लक औषध संकलन पेटीमध्ये देण्याचे आवाहन ट्रस्टतर्फे करण्यात आले होते. मनमाड शहरातील व परिसरातील गणेश भक्तांनी व नागरिकांनी या आरोग्य सेवा उपक्रमास भरभरुन प्रतिसाद दिला. आणि 1 महिन्यांच्या कालावधीमध्ये या औषध शिल्लक संकलन पेटीमध्ये सुमारे रु.41,000/- पेक्षा जास्त किंमतीची विक्रमी औषधे की ज्यांची मुदत वैधता शिल्लक आहे अशी संकलीत झाली. 2017 पासून आज पर्यंत सात वर्षात या उपक्रमा द्वारे ट्रस्ट तर्फे 1,00,000/- पेक्षा जास्त किमतीची औषधे संकलित करण्यात आली आहेत ट्रस्टतर्फे या औषधांचे विविध आजारानुसार वर्गीकरण करण्यात आले आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ संचलित सेवा भारती (जनकल्याण समिती) नाशिक यांच्या मार्फत दुर्गम भागात गरीब रुग्णांसाठी मोफत उपचार व औषधे उपलब्ध करुन दिली जातात म्हणून श्री निलमणी गणेश मंदीर ट्रस्टतर्फे यंदा ही सर्व रु.41,000/- पेक्षा किंमतीची संकलीत औषधे सेवा भारती (जनकल्याण समिती )नासिक यांना ट्रस्टचे अध्यक्ष किशोर गुजराथी, सचिव नितीन पांडे, उपाध्यक्ष शेखर पांगुळ , विश्वस्त गोविंद रसाळ, प्रज्ञेश खांदाट यांनी सूपूर्द केली तर सेवा भारती आरोग्य आयाम नाशिक ग्रामीण प्रमुख मुकुंद पाठक,नासिक सेवा भारती सह सचिव सिमा गोसावी जनकल्याण रक्त केंद्र सह कार्यवाह डॉ रश्मी दिवे जनकल्याण केंद्र नासिक माध्यम समन्वयक (जनसपंर्क अधिकारी )सुरेश पिंगळे यांनी ही औषधे सेवा भारती तर्फे स्वीकारली याप्रसंगी सेवा भारती आरोग्य नाशिक केंद्राचे आरोग्य आयाम चे माजी प्रमुख नरहर जोशी यांनी सेवा भारती (जनकल्याण समिती )च्या वतीने निलमणी ट्रस्ट चे ऋण व्यक्त केले श्री निलमणी गणेश मंदीर सार्वजनिक ट्रस्टतर्फे हा गरीब रुग्णांना मोफत औषध उपलब्ध करुन देणारा शिल्लक औषध संकलन केंद्र उपक्रम अखंडित सुरु राहणार असून सोबतच श्री निलमणी ट्रस्ट तर्फे मनमाड शहरात गरीब रुग्णांन साठी विविध आरोग्य सेवा उपलब्ध करणार असल्याचे ट्रस्टचे सचिव नितीन पांडे यांनी या प्रसंगी सांगितले .श्री निलमणी गणेश मंदीरातर्फे राबविण्यात आलेल्या या उपक्रमात ट्रस्टला अक्षय सानप, अभिषेक पितृभक्त, राहुल लांबोळे, रवींद्र वास्कर,भरत छाबडा, मच्छिन्द्र साळी आदी मान्यवरां सह ज्ञात अज्ञात गणेश भक्तांन चे अनमोल सहकार्य लाभले. हा गरीब रुग्णांसाठीचा शिल्लक औषध संकलन उपक्रम यापुढेही ट्रस्टतर्फे निरंतर वर्षभर राबविला जाणार असून नागरिकांनी व गणेशभक्तांनी या उपक्रमास असाच प्रतिसाद द्यावा असे नम्र आवाहन श्री निलमणी गणेश मंदीर सार्वजनिक ट्रस्टतर्फे विश्वस्त , किशोर गुजराथी ,नितीन पांडे शेखर पांगुळ, गोविंद रसाळ,प्रज्ञेश खांदाट, कृष्णा शिंपी नारायण फुलवाणी भिकाजी कुलकर्णी आदी विश्वस्त मंडळाने केले आहे. या कार्यक्रमास रामदास इप्पर सचिन व्यवहारे आदी मान्यवरांन सह गणेश भक्त मोठया संख्येने उपस्थित होते कार्यक्रम चे संयोजन श्री निलमणी गणेश मंदिर सार्वजनिक ट्रस्ट ने केले.

राशी भविष्य : ०९ ऑक्टोबर २०२५ – गुरुवार
मेष: आज तुमच्यासाठी चांगला दिवस आहे. तुमच्या कार्यक्षेत्रात तुम्ही निर्णय घेण्याची क्षमता वाढेल....