योगेश म्हस्के
मनमाड :येथील गुप्तसर साहिब गुरुद्वारा मनमाडमध्ये दसऱ्याच्या निमित्ताने शिख बांधवांकडुन शस्र पुजन करून दसरा सण साजरा करण्यात आला.
दसऱ्याच्या दिवशी शस्त्रांची पूजा करण्याची परंपरा शतकानुशतके जुनी आहे. अश्विन शुक्ल पक्ष दशमीला शस्त्राची पूजा केली जाते. नवरात्रीचे नऊ दिवस दुर्गादेवीची पूजा केल्यानंतर दसऱ्याचा सण साजरा केला जातो. विजयादशमीला दुर्गा मातेची पूजा केली जाते. माता दुर्गा शक्तीचे प्रतीक आहे. भारतातील अनेक ठिकाणी आणि संस्थानांमध्ये शस्त्रपूजा मोठ्या थाटामाटात साजरी केली जात असते.
मनमाड गुरुद्वारा मध्ये देखील दरवर्षी दसऱ्याच्या निमित्ताने शस्त्र पुजन करण्याची परंपरा असुन , या वर्षी देखील मोठ्या उत्साहात शस्त्र पुजन करण्यात आले.यावेळी मनमाड गुरुद्वाराचे प्रबंधक श्री बाबा रणजितसिंहजी आणि शिख बांधव उपस्थित होते.