loader image

मनमाड येथील सायकलिस्ट योगेश ताथेड यांनी मिळवला सायकलिंग क्षेत्रातील “Super Randonneur” हा मनाचा किताब

Oct 31, 2023

योगेश म्हस्के
मनमाड : येथील उद्योजक आणि सायकलिस्ट योगेश ताथेड यांनी 600 किमीचा सायकलिंग पुर्ण करून सायकलिंग क्षेत्रातील मनाचा समजला जाणारा “Super Randonneur” हा किताब मिळवला आहे.

मनमाड सायकलिस्ट क्लबचे मार्गदर्शक आणि नाशिक सायकलिस्ट फौंडेशनचे सदस्य श्री.योगेश ताथेड यांनी जळगाव सायकलिस्ट क्लब आयोजित 600 किमीची BRM जळगाव – शेगांव – जळगाव – धुळे – सौंदाणे-मालेगाव – धुळे – जळगाव या मार्गावर निर्धारित वेळेच्या आत 39 तासात यशस्वीपणे पुर्ण करून सायकलिंग क्षेत्रात मानाचा समजला जाणारा ” Super Randonneur ” हा किताब मिळविला आहे.

या यशाबद्दल त्यांचे शिवशक्ती सायकल येथे नाशिक सायकलिस्ट फाउंडेशनचे अध्यक्ष श्री. किशोर काळे यांच्या हस्ते योगेश ताथेड यांचे स्वागत करून शाॅल श्रीफळ पुष्पगुच्छ व मेडल देऊन सत्कार करण्यात आला. या प्रसंगी सायकलिस्ट श्री. बाळकृष्ण वेताळ ( नि.पोलीस ), श्री अमित घुगे , श्री भाऊसाहेब काळे , सौ. किरण डोंगरे ,श्री बाळासाहेब कोळे , श्री सुरेश डोंगरे हे सायकलिस्ट उपस्थित होते.

अजून बातम्या वाचा..

मनमाडच्या प्रगती बँकेला महाराष्ट्र स्टेट अर्बन को-ऑप बँक्स फेडरेशनचा राज्यस्तरीय प्रथम क्रमांकाचा सर्वोत्कृष्ट बँक पुरस्कार

मनमाडच्या प्रगती बँकेला महाराष्ट्र स्टेट अर्बन को-ऑप बँक्स फेडरेशनचा राज्यस्तरीय प्रथम क्रमांकाचा सर्वोत्कृष्ट बँक पुरस्कार

  मनमाड - शहरात गेली 29 वर्ष कार्यरत असलेली व मनमाड शहराची अर्थ वाहिनी असलेल्या प्रगती अर्बन...

read more
भुमी क्रिकेट अकॅडमीतील आर्या साळुंखे , स्वरांजली पवार व सुहानी बोरा यांची नंदुरबार जिल्हा क्रिकेट आसोसिएशन महिला अंडर 15 संघात निवड

भुमी क्रिकेट अकॅडमीतील आर्या साळुंखे , स्वरांजली पवार व सुहानी बोरा यांची नंदुरबार जिल्हा क्रिकेट आसोसिएशन महिला अंडर 15 संघात निवड

मनमाड - BCCI अंतर्गत असलेल्या महाराष्ट्र क्रिकेट आसोसिएशन आयोजीत आमंत्रितांच्या स्पर्धेसाठी (...

read more
सेंट झेवियर हायस्कूल मनमाड येथे शिकणाऱ्या वेदांत रवींद्र सोनवणेची नाशिक जिल्हा बास्केटबॉल संघात निवड

सेंट झेवियर हायस्कूल मनमाड येथे शिकणाऱ्या वेदांत रवींद्र सोनवणेची नाशिक जिल्हा बास्केटबॉल संघात निवड

मनमाड- महाराष्ट्र बास्केटबॉल असोसिएशन यांच्या मान्यतेने तसेच नाशिक डिस्ट्रिक्ट बास्केटबॉल असोसिएशन...

read more
.