loader image
[ays_poll id=7]

नांदगाव तालुका दुष्काळी जाहीर व्हावा न झाल्यास राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (अजितदादा पवार गट) वतीने उपोषणाचा इशारा…

Nov 5, 2023

आज दि. ०४ नोव्हेंबर २०२३
नांदगांव तालुक्यामध्ये या वर्षी सर्वात कमी पर्जन्यमान झालेले आहेत जून महिनापासून पाऊसाने दडी मारली तर आत्तापर्यंत अतिशय अल्प १८६.३ मिली पाऊस झाल्याने तालुक्याची आणेवारी ३६ पैशांपर्यंत आहे. तालुक्यात खरीप हंगामाची पीक जमिनीतून फक्त उगवली आहेत‌‌. पुढील वाढीसाठी पाऊसचं पडला नाही. ऑगस्ट महिन्याच्या दरम्यान सलग महिनाभर पाऊस न पडल्यामुळे संपूर्ण खरीप हंगाम होरपळून गेला. त्यामुळे खरीप हंगामाचे हंगामाचे १००% टक्के नुकसान झाले आहे. जनावरांना चाराही राहिलेला नाही. जनावरं व माणसांच्या पिण्याच्या पाण्याचा अतिशय गंभीर प्रश्न निर्माण झालेला आहेत. हातांना काम नाही‌. बेरोजगारीचा प्रश्न निर्माण झाला आहेत.*
*तालुक्यात सर्वात कमी पर्जन्यमान व सर्वात कमी पिकांची आणेवारी लागली आहेत. अशा प्रकारचे दुष्काळाची दाहकता नांदगाव तालुक्यात कधीही जाणवली नाही. अशी दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली असताना आजपर्यंत नांदगाव तालुका दुष्काळ म्हणून जाहीर झालेला नाही. तरी परिस्थितीचे अवलोकन करून तात्काळ नांदगाव तालुका दुष्काळी जाहीर करावी करावी.*
*नांदगाव तालुका दुष्काळ जाहीर न झाल्यास मंगळवार दिनांक- ७ नोव्हेंबर पासून नांदगाव तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने (अजित दादा पवार गट) उपोषण करण्यात येईल याची नोंद घ्यावी, असे निवेदन नायब तहसीलदार केतन कोनकर यांना देण्यात आले.*
*यावेळी तालुकाध्यक्ष विजय पाटील, नगरसेवक विलास राजुळे, महिला तालुकाध्यक्ष योगिता पाटील, युवक तालुकाध्यक्ष सोपान पवार, सामाजिक न्याय विभाग राजेंद्र लाठे, सोशल मीडिया तालुकाध्यक्ष वाल्मीक टिळेकर, देवदत्त सोनवणे, युवक शहराध्यक्ष गौतम जगताप, पंडित सूर्यवंशी, अशोक पाटील, अलका आयनोर, हेमंत देहाडराय, प्रशांत बोरसे, जगदीश सुरसे, शुभम बोरसे, जयवंत सुरसे, शंकर शिंदे, राजेंद्र सावंत, करूणा कासार, लक्ष्मण बोगीर, वाल्मीक वाघमारे, नितीन गांगुर्डे, पंढरीनाथ वाघमारे, संजय सोमासे आदींसह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

अजून बातम्या वाचा..

पिंपरी हवेली येथील प्रतिष्ठित कापूस व्यापारी व समाजसेवक योगेश साहेबराव वाघ यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्त्यांचा शिवसेना पक्षात प्रवेश.

पिंपरी हवेली येथील प्रतिष्ठित कापूस व्यापारी व समाजसेवक योगेश साहेबराव वाघ यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्त्यांचा शिवसेना पक्षात प्रवेश.

  पिंपरी हवेली येथील सोसायटीचे माजी चेअरमन शिवाजी दामू वाघ बाळासाहेब वाघ पिंटू गांगुर्डे संजय...

read more
सिटू संघटनेसह विविध नगरपालिका कर्मचाऱ्यांचा महाराष्ट्र नगरपालिका कर्मचारी कामगार विकास सेनेत जाहीर प्रवेश

सिटू संघटनेसह विविध नगरपालिका कर्मचाऱ्यांचा महाराष्ट्र नगरपालिका कर्मचारी कामगार विकास सेनेत जाहीर प्रवेश

  "मनमाड शहरात कामगार भवन बांधणार : आमदार सुहास अण्णा कांदे." नांदगाव येथील आमदार निवासस्थानी...

read more
जिल्हास्तरीय क्रिकेट सामण्यात भुमी क्रिकेट अकॅडमीतील खुशाल परळकर शतकवीर तर मयंक भालेरावची अर्धशतकीय खेळी

जिल्हास्तरीय क्रिकेट सामण्यात भुमी क्रिकेट अकॅडमीतील खुशाल परळकर शतकवीर तर मयंक भालेरावची अर्धशतकीय खेळी

  गुरुवार 01 मे 25 रोजी BCCI अंतर्गत असलेल्या महाराष्ट्र क्रिकेट आसोसिएशन क्रिकेट आसोसिएशन...

read more
महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन अंडर 16 जिल्हास्तरीय क्रिकेट सामन्यात भुमी क्रिकेट अकॅडमीतील खुशाल परळकरची शतकीय खेळी हा – जिल्हास्तरीय सामण्यात पहिले शतक

महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन अंडर 16 जिल्हास्तरीय क्रिकेट सामन्यात भुमी क्रिकेट अकॅडमीतील खुशाल परळकरची शतकीय खेळी हा – जिल्हास्तरीय सामण्यात पहिले शतक

  गुरुवार 1 मे 25 रोजी BCCI अंतर्गत असलेल्या महाराष्ट्र क्रिकेट आसोसिएशन क्रिकेट असोसिएशन...

read more
.