loader image

मराठा समाजाचे आंदोलनकर्ते मनोज जरांगे यांची मनमाडच्या पदाधिकाऱ्यांनी घेतली भेट

Nov 6, 2023


मनमाड – मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी आमरण उपोषण पाठीमागे घेतल्यानंतर त्यांना उपचारासाठी छत्रपती संभाजीनगर येथील गॅलेक्सी हॉस्पिटल मध्ये उपचार सुरू असून सध्या तब्येत व्यवस्थित आहे.
आज छत्रपतीसंभाजी नगर येथे सकल मराठा समाज मनमाड च्या टीम ने गॅलॅकसी हॉस्पिटलमध्ये जाऊन त्यांची भेट घेतली व तब्येतीची चौकशी करून काळजी घ्या लवकर बरे व्हा राज्यातला सर्व मराठा समाज आपल्या पाठीशी उभा आहे असे मनमाड मराठा समाजाच्या वतीने सांगितले.

मनमाड ला साखळी उपोषण च्या वेळेस ते पाठिंबा पत्रक आले होते ते त्यांना देण्यात आले. मनोज जरांगे यांनी सांगितले की लवकरच राज्यातील मराठा बांधवांशी संवाद साधणार आहेत. राज्यात पुन्हा एकदा संपूर्ण ताकदीने मजबूत बांधणी करण्यासाठी येणार आहेत तसेच मनमाड येथे येत्या काही दिवसात दौरा करतील असे पाटील यांनी सांगितले.


अजून बातम्या वाचा..

.