loader image
[ays_poll id=7]

दिवाळी सणासाठी मनमाड ची बाजारपेठ सजली : ग्राहकांच्या ऑनलाइनखरेदीचा बाजारपेठेवर परिणाम

Nov 8, 2023

योगेश म्हस्के

मनमाड : हिंदु समाजातील सर्वात मोठा असणारा सण म्हणजे दिवाळी , गरीब असो वा श्रीमंत जो-तो आपल्या परीने दिवाळी सण मोठ्या उत्साहात साजरा करत असतो.

दर वर्षी दिवाळी सणामध्ये प्रत्येक नागरिक हे आपल्या परिवारासह बाजार पेठेमध्ये खरेदी करत असतात.यासाठी बाजारामध्ये मोठी गर्दी होत असते, यंदाच्या वर्षी देखील अनेक व्यापाऱ्यांनी दिवाळी सणासाठी मोठी उलाढाल केली असुन बाजारपेठे मध्ये सर्व प्रकारची दुकाने लावण्यात आली आहे. दिपावलीसाठी लागणारे आकाशकंदील , रांगोळी , पणत्या , खाद्य पदार्थ , कपडे , पुजेसाठी लागणाऱ्या साहित्यांची आदी दुकाने बाजारपेठेत लावण्यात आली असुन , मात्र सर्वसामान्य ग्राहकांकडून ऑनलाइन खरेदीला देखील मोठ्या प्रमाणात पसंती मिळत असल्याने याचा परिणाम हा बाजारपेठवर जाणवत आहे.

सध्याचे युग हे डिजिटल असल्याने याचे परिणाम हे सणामध्ये बाजारपेठेत होणाऱ्या खरेदीवरही जाणवत आहे. आज कुटुंबातील प्रत्येक सदस्यांकडे मोबाईल फोन आल्याने त्यांच्यासाठी ऑनलाईन बाजारपेठ वापरणे सोपे झाले आहे. सणानिमित्ताने सर्वच कंपन्या या ऑनलाइन खरेदीवर कमी किंमती सह आकर्षक सूट देत असतात , यामुळे साहजिकच नागरिक याकडे आकर्षित होऊन खरेदी करत असतात, परिणामी प्रत्येक शहरातील बाजारपेठेवर याचे परिमाण होऊन सर्व सामान्य ग्राहक कमी होत आहे .

अजून बातम्या वाचा..

रोटरी क्लब ऑफ मनमाड मॅजिक तर्फे मोफत नेत्र तपासणी आणि मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबीर अनकाई येथे संपन्न

रोटरी क्लब ऑफ मनमाड मॅजिक तर्फे मोफत नेत्र तपासणी आणि मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबीर अनकाई येथे संपन्न

  दिनांक 17 मंगळवार रोजी अनकाई येथे रोटरी क्लब ऑफ मनमाड मॅजिक आणि रोटरी आय हॉस्पिटल मालेगाव...

read more
महात्मा गांधी विद्या मंदिर संस्थेच्या कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, मनमाड, ता. नांदगाव,जि. नाशिक महाविद्यालयास ‘स्वायत्त दर्जा’ प्रदान

महात्मा गांधी विद्या मंदिर संस्थेच्या कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, मनमाड, ता. नांदगाव,जि. नाशिक महाविद्यालयास ‘स्वायत्त दर्जा’ प्रदान

  मनमाड :- महात्मा गांधी विद्या मंदिर संस्थेच्या कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, मनमाड,...

read more
व्यापारी महासंघाचे अध्यक्ष राजाभाऊ पारीक, अनिल पारीक आणि द्वारकेश पारीक ह्यांच्यावर झालेल्या प्राणघातक हल्ल्याच्या निषेधार्थ बुधवारी मनमाड बंद

व्यापारी महासंघाचे अध्यक्ष राजाभाऊ पारीक, अनिल पारीक आणि द्वारकेश पारीक ह्यांच्यावर झालेल्या प्राणघातक हल्ल्याच्या निषेधार्थ बुधवारी मनमाड बंद

मनमाड -- मनमाड शहर व्यापारी महासंघ चे अध्यक्ष राजाभाऊ पारीक तसेच त्यांचे लहान बंधू अनिल पारीक व...

read more
एक दिवशीय जिल्हास्तरीय टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेत महामानव फॉउंडेशन,मालेगाव संघ विजेता.

एक दिवशीय जिल्हास्तरीय टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेत महामानव फॉउंडेशन,मालेगाव संघ विजेता.

  मनमाड:-एम.एस.स्पोर्ट्स,मनमाड आयोजित भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर रेल्वे क्रिडांगण,मनमाड...

read more
.