loader image
[ays_poll id=7]

भुसावळ विभागाचा तिकीट तपासणीत नवीन विक्रम ६ दिवसात फुकट्याकडुन ३ कोटी ७३ लाख दंडाची वसुली

Nov 16, 2023


नांदगांव : मारुती जगधने
रेल्वेच्या तिकीट तपासणी विभागाने फक्त सहा दिवसात प्रवासी तिकिट तपासणी मोहीम राबविली असता त्या ४१८९४ फुकट्या प्रवाशाकडुन तब्बल ३ कोटी ७३:लाख रुपये दंडाची वसुली करुन एक नवा विक्रम प्रस्थापित केला असून या कमी रेल्वे विभागाचे भुसावळ डिव्हीजनचे ५३७ कर्मचारीनी हे मिशन पार पाडले शिवाय तिकीट तपासणी मोहीम नियमित करण्यात आली आहे .भुसावळ
विभागीय रेल्वे व्यवस्थापक श्रीमती इति पाण्डेय यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापक धीरेंद्र सिंग आणि सहायक वाणिज्य व्यवस्थापक (तिकीट चेकिंग) रत्नाकर क्षीरसागर यांच्या नेतृत्वात भुसावळ विभागाचे ५३७ तिकीट तपासणी कर्मचारी यांनी दिनांक ९/११/२०२३ ते दि. १५/११/२०२३ पर्यंत भुसावळ विभागामध्ये सखोल तिकीट तपासणी मोहिम राबवून भुसावळ विभागाचा नवीन विक्रम प्रस्थपित केला आहे .
परिणाम स्वरूप विनातिकीट/अनधिकृत प्रवासाच्या एकूण ४१८९४ प्रकरणांतून एकूण रु. ३. ७३ करोड रुपये दंड वसूल करण्यात आला.
ह्या मोहिमेच्या परिणाम स्वरूप दिनांक ११/११/२०२३ रोजी भुसावळ मंडळाच्या इतिहासातील सर्वाधिक तिकीट तपासणीच्या आज पर्यंतच्या दंड वसुलीचे सर्व रेकॉर्ड मोडीत काढत एकूण ७ हजार ३७० प्रवाश्यांकडून एकाच दिवसी एकूण ६८लाख ८५ हजार रुपये दंड वसूल करण्यात आला.
सर्व अधिकृत रेल्वे प्रवाशांना आरामदायी प्रवास आणि उत्तम सेवा सुनिश्चित करण्यासाठी, भुसावळ विभागात विनातिकीट आणि अनियमित प्रवासाला आळा घालण्यासाठी मेल एक्स्प्रेस, सुविधा ट्रेन्स , विशेष गाड्यांमध्ये तिकीट तपासणीचे कार्य करण्यात येते.
प्रवाशांनी गैरसोय टाळण्यासाठी आणि सन्मानाने प्रवास करण्यासाठी, भुसावळ विभाग प्रवाशांना योग्य आणि वैध रेल्वे तिकीट घेऊनच प्रवास करावा असे आवाहन करीत आहे.


अजून बातम्या वाचा..

नांदगाव मनमाड मराठी पत्रकार संघ व मनमाड शहर पोलीस स्टेशनतर्फे छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त गड किल्ले बांधणी स्पर्धा

नांदगाव मनमाड मराठी पत्रकार संघ व मनमाड शहर पोलीस स्टेशनतर्फे छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त गड किल्ले बांधणी स्पर्धा

मनमाड ता ८ : 'चला मग किल्ला बनवूया, मातीशी नाते जोडू या' हे ब्रीद वाक्य घेऊन आगामी शिवजयंती...

read more
एच.ए.के.हायस्कूल अँन्ड ज्यु. कॉलेज मनमाड मध्ये इ. १२ वी प्रमाणपत्र परीक्षा फेब्रुवारी / मार्च २०२५ आसनव्यवस्था जाहीर

एच.ए.के.हायस्कूल अँन्ड ज्यु. कॉलेज मनमाड मध्ये इ. १२ वी प्रमाणपत्र परीक्षा फेब्रुवारी / मार्च २०२५ आसनव्यवस्था जाहीर

मनमाड : इयत्ता १२ वी प्रमाणपत्र परीक्षा फेब्रुवारी / मार्च 2025 केंद्र क्रमांक 0236...

read more
.