नांदगांव : मारुती जगधने
तालुक्यातील दुष्काळ आणी गारपिट या आसमानी संकटांना तोंडदेत शेतकरी आता पुरता कोलमडून पडला आहे दुष्काळाचे निकष लागू होण्याच्या बेतात असताना गारपिटीने पुन्हा फटका दिला त्यामुळे तालुक्यातील शेतकर्यांचे संकट आणी पाठ शिवनीचा खेळ असे दुहेरी संकटे येऊ लागली आहे .
दरम्यान
शास्ञीनगर येथे घर कोसळल्याने एक महिला एक पुरुष जखमी झाले तसेच धोटेणे येथील जि प शाळेची पडझड झाली ,सदर घटनास्थळी आमदार सुहास कांदे यांनी व खासदार भारती पवार यांचे स्विय सहाय्यक रौंदळ यांनी भेट देऊन पहाणी केली असता आमदार कांदे यांनी काही नागरीकाना स्वखर्चातुन मदत केली या पहाणी दौर्यात तहसीलदार,बिडीओ,कृषी अधिकारी आदी उपस्थित होते.
दि २६ रोजी झालेल्या गारपिटीने नांदगांव तालुक्यात कांदा,कपाशी,मका,भाजीपाला,डिळींब,अंबा, केळी,द्राक्षे, आदीसह जनावरांचा चारा यांचे मोठे नुकसाने झाले त्यातच सापडलेल्या गारपिटीत आनेक जनावरे जखमी झाले त्यात दुभत्या गाई म्हशींचा समावेश आहे .या सर्व घटनास्थळांची आमदार कांदे यांनी अधिकार्या समवेत पहाणी केली. घराची छते उडाल्याने आनेक कुटुंब उघड्यावर आली अशा लोकांना आ कांदे यांनी मदत केली.
तालुक्यात
सुलतानी व आसमानी संकटानी शेतकरी पुरता कोलमडला आहे.
धोटाने खुर्द येथे भरती ताई पवार यांचे स्विय सहाय्यक यांनी जिल्हा परिषद शाळा धोटाने येथे नुकसान झालेले शालेची पहानी केली येथे कांदा व अन्यपिकांचे नुकसान झाले .
यावेळी बिडिओ तहसीलदार तलाठी सर्कल सर्व मोठ्या संख्येने उपस्थित होते
: शास्त्रीनगर येथे आमदार सुहास कांदे हे प्रत्यक्ष भेटी देत आहेत.
शास्त्रीनगर येथे आमदार सुहास कांदे यांनी एक महिला एक पुरुष जखमी अवस्थेत त्यांना प्रत्यक्ष भेट देण्यात आली यावेळी प्रांत अधिकारी व्हिडिओ तहसीलदार व सर्व अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते येथे पंचनामे करण्यात आले . तातडीने नुकसान भरपाई द्यावी असे आ
सुहास कांदे यांनी अधिकाऱ्यांना सुचित केले.
या भागात काही जनावरे सुद्धा दगवली गेली आहे व कांदा मिरची ज्वारी भुईमूग या पिकांचे यांचे मोठ्या प्रमाणे नुकसान झालेले आहे
: अक्षरश मोठ्या मोठ्या प्रमाणात पडलेली गारा वादळ वारा चा मोठ्या प्रमाणे घरांची छती पडण्यात आली व मोठ्या संख्येने घरांची नुकसान देखील झाली आहे.शास्त्रीनगर येथे रोहिञाचे चे मोठ्या संख्येने नुकसान झाले.यावेळी नागरिकांची मोठ्याप्रमाणात हाल सोसावे लागले.
: आमदार सुहास कांदे यांनी घटनास्थळाची भेट देण्यात आली यावेळी कांद्याचे झालेले नुकसान हे सुद्धा बघण्यात आले तालुक्यातील विविध संकटांशी सामना कसा करावा तसेच यातुन बाहेर कसे निघावे हा मोठा पेच बळीराजावर दिसून येतो.आजुन आनेक गावांची परिस्थितीची पहाणी करणे बाकी आहे .