नांदगाव : मारुती जगधने
महाराष्ट्र राज्य क्रीडा युवक सेवा संचालनालय पुणे व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय नंदुरबार यांच्या संयुक्त विद्यमाने 26/11/2023 रोजी संपन्न झालेल्या विभागीय स्तर बॉक्सिंग स्पर्धेमध्ये कला वाणिज्य विज्ञान महाविद्यालय नांदगाव येथील मुलींचा संघ सहभागी झाला होता. या स्पर्धेत एकूण तेरा मुलीचा सहभाग होता यापैकी आशा कांदे (अकरावी आर्ट्स ),योगेश्वरी गुंजाळ (अकरावी विज्ञान), ज्योती बुरकुल (अकरावी आर्ट्स), कावेरी औशीकर (बारावी आर्ट्स), श्रुती आहेर (अकरावी विज्ञान) नीलम मोकळ (अकरावी आर्ट्स)इत्यादी सहा मुलींची राज्यस्तरीय शालेय बॉक्सिंग क्रीडा स्पर्धा अकोला येथे होणाऱ्या स्पर्धेसाठी निवड झाली. सर्व यशस्वी विद्यार्थिनींना संस्थेचे सरचिटणीस नितीन ठाकरे ,अध्यक्ष सुनील ढिकले, उपाध्यक्ष विश्वास मोरे, सभापती बाळासाहेब क्षिरसागर, उपसभापती देवराम मोगल, चिटणीस दिलीप दळवी, नांदगाव चे संचालक अमित बोरसे पाटील, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर एस. एन. शिंदे उपप्राचार्य संजय मराठे व सर्व महाविद्यालयातील प्राध्यापक शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांनी यशस्वी विद्यार्थिनीचे अभिनंदन केले व पुढील स्पर्धेसाठी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.
यशस्वी विद्यार्थिनींना तांत्रिक व योग्य मार्गदर्शन क्रीडा संचालक लोकेश गळदगे आणि उपप्राचार्य दयाराम राठोड यांचे लाभले.

राशी भविष्य : ०४ ऑक्टोबर २०२५ – शनिवार
मेष: आज तुमच्यासाठी चांगला दिवस आहे. तुमच्या कार्यक्षेत्रात तुम्ही निर्णय घेण्याची क्षमता वाढेल....