loader image
[ays_poll id=7]

नांदगाव तालुक्यात झालेल्या नुकसानीचे पंचनामे वेगाने व काटेकोर पणे करावे – महेंद्र बोरसे

Nov 29, 2023


नांदगाव सोमनाथ घोगांणे

नांदगाव तालुक्यातील शास्त्रीनगर आणि धोटाणे हे कालच्या नैसर्गिक आपत्तीचा केंद्रबिंदू ठरले असून दुष्काळात मोठ्या कष्टानं पाणी उपलब्धतेनुसार थोड्याफार प्रमाणात केलेली बागाईत पिके वाया गेली असुन अनेक घरांचे अतोनात नुकसान झाले आहे, कुठे घराचे पत्रे उडून गेले तर कुठे भिंतिसहित संपुर्ण घरच नुकसानग्रस्त झाले आहे. काही ठिकाणी माणसे तर कुठे जनावरे जखमी झाले आहेत. बऱ्याच ठिकाणी जनावरे मुत्यूमुखी पडलेली असून त्यांचाही पंचनामा होऊन भरपाई मिळावी अशी ग्रामस्थांची मागणी आहे. अनेक ठिकाणी स्थानिक कर्मचारी उपस्थित असले तरी पंचनामे करण्यासाठी संयुक्त समिती गठित करणे आवश्यक असते. अद्याप पर्यन्त तरी बऱ्याच ठिकाणी गठित संयुक्त समिती बांधावर पोहचलेली नव्हती. तालुका प्रशासनाने गावनिहाय नेमलेली समिती प्रसिध्द करून नियुक्त केलेल्या कर्मचाऱ्यांची नावे जाहिर केल्यास कामात सुसूत्रता येईल.स्थानिक पातळीवरील ग्रामपंचायत प्रतिनिधी व सामाजिक कार्यकर्ते मात्र मदतीत आघाडीवर असुन मदतकार्य पार पाडीत आहे.
मनमाड विभागात एकूण २० ट्रान्सफॉर्मर व २०० विजेचे खांब क्षतिग्रस्त झाल्याचा प्राथमिक अहवाल प्राप्त असुन विद्युत मंडळाचे अधिकारी व कर्मचारी ह्यांनी तातडीने काम सुरू केले असले तरी साधनसामग्रीची कमतरता हा मुख्य अडथळा असेल. प्रथमतः गावातील जोडणी २ दिवसात पूर्ववत होण्यासाठी काम करून नंतर पुढील ५/६ दिवसात शेतशिवारातील जोडणी करण्यात येईल असे विद्युत मंडळाचे उप अभियंता भुषण तळेले यांनी राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांना सांगितले.
नुकसानग्रस्त हिरेनगर सटाने, कऱ्ही, एकवई, बेजगाव, हिसवळ,, कोंढार, पारेकरवाडी,हिंगनवाडी, बोराळे, आमोदे,वेहेळगाव, मंगळणे, कळमदरी, साकोरा, पळाशी,सावरगाव, बिरोळे, परधाडी, पिंप्री, हिंगणे, न्यायडोंगरी इत्यादी गावातून बाधीत शेतकरी बांधवांनी गाऱ्हाणं मांडले आहे.
वरील गावांत कमी अधिक प्रमाणात शेतीपिकांचे व मालमत्तेचे नुकसान झाले असून ह्या व्यतिरिक्त आवश्यक असेल तिथे प्रशासनाने रितसर पंचनामे करून बाधितांना दिलासा द्यावा, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष महेंद्र बोरसे यांनी केली आहे. या प्रसंगी सोपान बिन्नर, संजय बिन्नर, साहेबराव मुंजाळ, सागर पवार, मनोहर काझिकर, ज्ञानेश्वर दुकळे व ग्रामस्थ उपस्थित होते.


अजून बातम्या वाचा..

श्रावण मास अंगारक (मंगळी ) संकष्ट चतुर्थी निमित्त मंगळवार दिनांक 12/08/2025 रोजी वेशीतील श्री निलमणी गणेश मंदिरात विशेष धार्मिक कार्यक्रमा चे आयोजन

श्रावण मास अंगारक (मंगळी ) संकष्ट चतुर्थी निमित्त मंगळवार दिनांक 12/08/2025 रोजी वेशीतील श्री निलमणी गणेश मंदिरात विशेष धार्मिक कार्यक्रमा चे आयोजन

मनमाड - शहराचे आराध्य दैवत आणि नवसाला पावणार गणपती म्हणून पंचक्रोशीत प्रसिद्ध असणाऱ्या वेशीतील...

read more
भारतीय जनता पार्टी मनमाड शहर प्रणित भाजप कामगार आघाडीच्या शहर शाखेच्या फलकाचे उदघाटन

भारतीय जनता पार्टी मनमाड शहर प्रणित भाजप कामगार आघाडीच्या शहर शाखेच्या फलकाचे उदघाटन

मनमाड - भारतीय जनता पार्टी देश स्तरावर विविध क्षेत्रामध्ये काम करीत असते कामगार क्षेत्रामध्ये...

read more
.