loader image

मनमाड बाजार समितीच्या सभापतीपदी राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार गटाचे दीपक गोगड बिनविरोध

Nov 30, 2023


मनमाड
सहा महिन्यापूर्वी महाविकास आघाडीतर्फे सभापती म्हणुन विराजमान झालेले माजी आमदार संजय पवार यांनी राजीनामा दिल्यानंतर मनमाड बाजार समितीची निवडणूक आज बाजार समितीच्या सभागृहात पार पडली. शिंदे गटातर्फे दशरथ लहिरे यांनी तर महाविकास आघाडीतर्फे गणेश धात्रक व दीपक गोगड यांनी अर्ज दाखल केला मात्र धात्रक आणि लहिरे यांनी अर्ज माघारी घेतल्याने दीपक गोगड यांची बिनविरोध निवड करण्यात आली. दीपक गोगड हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष असुन हेविवेट नेते छगन भुजबळ यांचे समर्थक आहेत.आज झालेल्या निवडणुकीत पुन्हा एकदा आम्ही महाविकास आघाडीचा विजय झाला असुन आम्ही सगळेच सभापती असल्याचे मत नवनिर्वाचित सभापती दीपक गोगड यांनी व्यक्त केले.
मनमाड बाजार समितीची निवडणूक सहा महिन्यांपूर्वी झाली होती अत्यंत प्रतिष्ठतेची झालेली ही निवडणूक राज्यात गाजली होती विद्यमान आमदार सुहास कांदे विरुद्ध मंत्री छगन भुजबळ अशी लढत झाली होती यात छगन भुजबळ यांच्या पॅनेलने जोरदार मुसंडी मारली होती त्यावेळी माजी आमदार संजय पवार यांच्या गळ्यात सभापती पदाची माळ पडली होती मात्र मराठा आरक्षण व समाजाच्या भावना लक्षात घेत संजय पवार यांनी राजीनामा दिला होता.आज 30 नोव्हेंबर रोजी सभापती पदासाठी निवडणूक पार पडली मनमाड बाजार समितीच्या सभागृहात ही निवडणूक झाली सभापती पदांसाठी जिल्हाप्रमुख गणेश धात्रक व राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष दीपक गोगड यांनी तर शिंदे गटातर्फे दशरथ लहिरे यांनी अर्ज दाखल केला मात्र गणेश धात्रक व दशरथ लहिरे यांनी अर्ज माघारी घेतल्याने गोगड यांची बिनविरोध निवड करण्यात आली.यावेळी आयोजित छोटेखानी सत्कार समारंभात संचालक मंडळाने आपले मनोगत व्यक्त केले यात आम्हाला समाजाच्या नावाखाली तसेच इतर पध्दतीने अनेक प्रलोभने देऊन तसेच आर्थिक आमिष दाखवण्यात आले मात्र आम्ही एकही संचालक विकला गेला नाही त्यामुळेच आज दीपक गोगड सभापती होऊ शकले,गोगड यांनी आता चांगले काम करावे आम्ही सगळे सोबत आहोत असे मत व्यक्त केले.यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून सहायक निबंधक विघ्ने व बाजार समितीचे सचिव विश्वास राठोड यांनी कामकाज बघितले.


अजून बातम्या वाचा..

मनमाडच्या प्रगती बँकेला महाराष्ट्र स्टेट अर्बन को-ऑप बँक्स फेडरेशनचा राज्यस्तरीय प्रथम क्रमांकाचा सर्वोत्कृष्ट बँक पुरस्कार

मनमाडच्या प्रगती बँकेला महाराष्ट्र स्टेट अर्बन को-ऑप बँक्स फेडरेशनचा राज्यस्तरीय प्रथम क्रमांकाचा सर्वोत्कृष्ट बँक पुरस्कार

  मनमाड - शहरात गेली 29 वर्ष कार्यरत असलेली व मनमाड शहराची अर्थ वाहिनी असलेल्या प्रगती अर्बन...

read more
भुमी क्रिकेट अकॅडमीतील आर्या साळुंखे , स्वरांजली पवार व सुहानी बोरा यांची नंदुरबार जिल्हा क्रिकेट आसोसिएशन महिला अंडर 15 संघात निवड

भुमी क्रिकेट अकॅडमीतील आर्या साळुंखे , स्वरांजली पवार व सुहानी बोरा यांची नंदुरबार जिल्हा क्रिकेट आसोसिएशन महिला अंडर 15 संघात निवड

मनमाड - BCCI अंतर्गत असलेल्या महाराष्ट्र क्रिकेट आसोसिएशन आयोजीत आमंत्रितांच्या स्पर्धेसाठी (...

read more
सेंट झेवियर हायस्कूल मनमाड येथे शिकणाऱ्या वेदांत रवींद्र सोनवणेची नाशिक जिल्हा बास्केटबॉल संघात निवड

सेंट झेवियर हायस्कूल मनमाड येथे शिकणाऱ्या वेदांत रवींद्र सोनवणेची नाशिक जिल्हा बास्केटबॉल संघात निवड

मनमाड- महाराष्ट्र बास्केटबॉल असोसिएशन यांच्या मान्यतेने तसेच नाशिक डिस्ट्रिक्ट बास्केटबॉल असोसिएशन...

read more
.