loader image
[ays_poll id=7]

आमदार सुहास कांदे यांच्या पाठपुराव्यामुळे महावितरण २१ कर्मचारी पुन्हा सेवेत

Nov 30, 2023



मनमाड विभाग अंतर्गत विज कर्मचारी यांना शैक्षणिक अर्हता कारणांमुळे कमी केले होते. आमदार सुहास आण्णा कांदे यांनी या कर्मचाऱ्यांचा बेरोजगारी चा तसाच परिवाराच्या उपासमारीचा विचार करून मुख्यमंत्री तसेच ऊर्जा मंत्री यांचा पाठपुरावा केला यानंतर या कर्मचाऱ्यांना शैक्षणिक अर्हता पुर्ण करून देण्यासाठी 3 वर्षाचा अवधी देण्यात आला व या पाठपुराव्यामुळे महाराष्ट्र मधील सर्व कर्मचारी ना लाभ झाला.
पण नाशिक विभागात त्या आदेशाच पालन होत नसल्याने हे कर्मचारी महावितरण विभाग कार्यालय समोर आमरण उपोषणाला बसले असता आमदार सुहास आण्णा कांदे यांनी तत्काळ उपोषणस्थळी दखल घेऊन उपोषणकर्ते व महावितरण अधिकारी यांची बैठक बोलावली.व बैठकीत यशस्वी तोडगा काढुन कर्मचाऱ्यांना न्याय मिळवून दिला व मनमाड विभागातील 4 जणांना ऑर्डर देण्यात आल्या असून उर्वरित कर्मचाऱ्यांना 2 ते 3 दिवसात ऑडर देण्यात येणार आहे.यावेळी महावितरण विभागाचे अधिकारी यांची बैठक आमदार कार्यालयात तातडीने फरहान खान, शहरप्रमुख मयुर बोरसे, तालुकाध्यक्ष साईनाथ गिडगे बैठक बोलवली होती यावेळी बैठकीला, उप मुख्य औद्योगिक संबंध अधिकारी राजेभोसले , व्यवस्थापक HR बादल शिंदे , कार्यकारी अभियंता संजय तडवी , उपव्यवसथापक HR बगाड तसेच यावेळी आशिष यमगर, रामदास बाचकर, नितीन घुगे, नवनाथ बाचकर, सचिन रोटकर, अमोल आहेर आदी उपस्थित होते.

अनेक दिवसांच्या मागणीला न्याय मिळवून दिल्याबद्दल सर्व विज कर्मचाऱ्यांनी आमदार सुहास आण्णा कांदे यांचे आभार मानले.


अजून बातम्या वाचा..

*मनमाड महाविद्यालयात राजमाता जिजाऊ भोसले व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना जयंती निमित्त विनम्र अभिवादन* 

*मनमाड महाविद्यालयात राजमाता जिजाऊ भोसले व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना जयंती निमित्त विनम्र अभिवादन* 

  *मनमाड* महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित, कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय मनमाड येथे...

read more
तीन सुवर्ण तीन रौप्य व चार कांस्य पदकासह यूथ मुलींमध्ये पटकावले सांघिक विजेतेपद

तीन सुवर्ण तीन रौप्य व चार कांस्य पदकासह यूथ मुलींमध्ये पटकावले सांघिक विजेतेपद

राज्यस्तरीय वेटलिफ्टिंग स्पर्धेत पुन्हा एकदा मनमाडच्या खेळाडूंचा डंका तळेगाव दाभाडे पुणे येथे 23...

read more
सेंट झेवियर हायस्कूलमध्ये वार्षिक स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरणाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न

सेंट झेवियर हायस्कूलमध्ये वार्षिक स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरणाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न

मनमाड -येथील सेंट झेवियर हायस्कूलमध्ये वार्षिक स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरणाचा कार्यक्रम मोठ्या...

read more
.