loader image
[ays_poll id=7]

के आर टी शाळेत डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन

Dec 7, 2023


के.आर.टी.हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेजमध्ये विश्वरत्न. भारतरत्न.भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन साजरा करण्यात आला.
6 डिसेंबर भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार ज्ञानाचे अथांग सागर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिवस यानिमित्त या महामानवास त्रिवार अभिवादन. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक दीपक व्यवहारे. विश्वस्त धनंजय निंभोरकर. यांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. त्यावेळेस शाळेचे प्राचार्य मुकेश मिसर.उपआचार्य वैभव कुलकर्णी. उपस्थित होते कार्यक्रमाचे आयोजन इयत्ता सातवी व इयत्ता दुसरीच्या विद्यार्थ्यांनी केले होते. इयत्ता दुसरीच्या अदिती केदारे.सायुरी केदारे. आराध्या आव्हाड. इयत्ता सातवीचा. चैतन्य डोंगरे. स्वयंम सरोदे. या विद्यार्थ्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विषयी आपले मनोगत व्यक्त केले. डॉ. बाबासाहेब आंबेड- करांनी दलितांची परिस्थिती सुधारण्यासाठी खूप परिश्रम घेतले “त्यांनी शिका संघटित व्हा! संघर्ष करा” असा संदेश दिला.
” शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे ते जो पेईल तो गुरगुरल्या शिवाय राहणार नाही ” असे म्हणत ६ डिसेंबर १९५६ रोजी दिल्ली येथे त्यांचे महानिर्वाण झाले.
या विद्यार्थ्यांना सौ तेजस्विनी चांदेकर. व प्रवीण आहेर यांचे अनमोल असे मार्गदर्शन लाभले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन आदिती महाजन. फातिमा भारमल यांनी केले.


अजून बातम्या वाचा..

मनमाड महाविद्यालयात स्व.लोकनेते व्यंकटराव हिरे यांच्या पुण्यतिथी निमित्त प्रतिमा पूजन व वृक्षारोपण संपन्न

मनमाड महाविद्यालयात स्व.लोकनेते व्यंकटराव हिरे यांच्या पुण्यतिथी निमित्त प्रतिमा पूजन व वृक्षारोपण संपन्न

मनमाड = कला,विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, मनमाड येथे शिक्षण महर्षी, महात्मा गांधी विद्यामंदिर व...

read more
नांदगाव शहर व चांडक प्लॉट भागाला जोडणाऱ्या नवीन पुलाचे लोकार्पण सौ. अंजुमताई सुहास कांदे यांच्या हस्ते संपन्न.

नांदगाव शहर व चांडक प्लॉट भागाला जोडणाऱ्या नवीन पुलाचे लोकार्पण सौ. अंजुमताई सुहास कांदे यांच्या हस्ते संपन्न.

  आमदार सुहास अण्णा कांदे यांच्या माध्यमातून नांदगाव शहरातील चांडक प्लॉट भागातील व परिसरातील...

read more
व्ही. एन. नाईक हायस्कूल येथे छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली

व्ही. एन. नाईक हायस्कूल येथे छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली

मनमाड :. व्ही. एन. नाईक हायस्कूल येथे छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली....

read more
.