loader image
[ays_poll id=7]

रेल्वे ओव्हरब्रिज दुरुस्तीसाठी ३ कोटी मंजूर – आमदार कांदे

Dec 8, 2023

मनमाड : मनमाडचा रेल्वे ओव्हरब्रिजचा काही भाग कोसळल्याने इंदुर- पुणे महामार्गावरील मनमाड शहरातून जाणारी वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. त्यासाठी या उड्डाणपुलाची डाव्या बाजूची रेल्वे पुलाच्या पोहच मार्गापर्यंत बांधण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांनी ३ कोटी र ूपयांचा तातडीचा निधी मंजूर केला आहे.

आमदार सुहास कांदे यांनी २ डिसेंबरला याबाबत मुख्यमंत्री ना. शिंदे,
सार्वजनिक बांधकाम मंत्री ना. चव्हाण यांची समक्ष भेट घेवून मालेगाव, मनमाड, कोपरगाव रस्त्यावरील मनमाड शहरातील उड्डाणपुलाला संरक्षक भिंत मंजूरी द्यावी त्यासाठी ३ कोटी रूपयांची तरतूद

करावी अशी मागणी केली होती. सार्वजनिक बांधकाम मंत्री ना. चव्हाण यांनी मालेगांव- मनमाड-कोपरगांव रस्ता प ्ररामा ८ मध्ये ६ क्र.१२९ च्या डाव्या बाजूला (रेल ्वे पुलाच्या पोहच मार्गापर्यंत) संरक्षण भिंत बांधण्यासाठी तीन कोटी रूपयांच्या निधीस मंजूरी दिली आहे.

हा तातडीचा निधी मंजूर झाल्यामुळे या पुलाचे बांधकाम येत्या सव्वा महिन्यात पूर्ण होण्याची शक्यता असून तातडीने हा पूल वाहतुकीसाठी सुरू होईल.आमदार कांदे यांनी या प्रश्नाकडे तातडीने लक्ष वेधून राज्य शासनाकडून निधी मंजूर करून घेतल्या बद्दल मनमाड
शहरांतील दक्षिण व उत्तर भागातील नागरीकांना मोठा दिलासा मिळणार आहे.

अजून बातम्या वाचा..

शिक्षक मतदार संघ निवडणूक पुढे ढकलली – शाळांच्या उन्हाळी सुट्ट्या संपल्यानंतर घेण्यात येणार

शिक्षक मतदार संघ निवडणूक पुढे ढकलली – शाळांच्या उन्हाळी सुट्ट्या संपल्यानंतर घेण्यात येणार

केंद्रीय निवडणूक आयोगाने जाहीर केलेली नाशिक विभागाची शिक्षक मतदार संघाची निवडणूक अखेर पुढे ढकलली...

read more
बघा व्हिडिओ-भाजपा +महायुतीच्या उमेदवार डॉ भारती पवार यांचे प्रचारार्थ मतदार संवाद भेटीला उस्फुर्त प्रतिसाद

बघा व्हिडिओ-भाजपा +महायुतीच्या उमेदवार डॉ भारती पवार यांचे प्रचारार्थ मतदार संवाद भेटीला उस्फुर्त प्रतिसाद

मनमाड - शहरातील मुख्य बाजार पेठ मध्ये दिंडोरी लोकसभा मतदार संघातील भाजपा + शिवसेना (शिंदे गट )...

read more
बघा व्हिडिओ-नांदगाव छत्रपती संभाजीनगर रोडवर गंगाधरी येथे एस. टी बस अल्टोगाडी च्या अपघातात तीन मुत्यूमुखी

बघा व्हिडिओ-नांदगाव छत्रपती संभाजीनगर रोडवर गंगाधरी येथे एस. टी बस अल्टोगाडी च्या अपघातात तीन मुत्यूमुखी

  नांदगाव सोमनाथ घोंगाणे नांदगाव शहरातील गंगाधरी गावाजवळ एस. टी . बस व अल्टो कारच्या अपघातात...

read more
शांतीब्रम्ह एकनाथ महाराज चतुर्थ शतकोत्तर रौप्य महोत्सवाची काल्याच्या किर्तनाने सांगता

शांतीब्रम्ह एकनाथ महाराज चतुर्थ शतकोत्तर रौप्य महोत्सवाची काल्याच्या किर्तनाने सांगता

मनमाड : योगेश म्हस्के शांतीब्रम्ह एकनाथ महाराज चतुर्थ शतकोत्तर रौप्य महोत्सवा निमित्ताने आयोजित...

read more
.