loader image
[ays_poll id=7]

बघा व्हिडिओ – मनमाड गुप्तसर साहेब गुरुद्वारामध्ये सालाना जोडमेला अभूतपूर्व उत्साहात साजरा

Dec 19, 2023


मनमाड : योगेश म्हस्के श्री गुरू गोविंदसिंगजी महाराज यांच्या पवित्र प

दस्पर्शाने पावन झालेल्या गुप्तसर साहेब गुरुद्वारा मनमाड मध्ये गुरू गोविंदसिंगजी महाराज यांच्या प्रकाश पूरब निमित्ताने सालाना जोडमेला मोठ्या उत्साहात संपन्न झाला.

यंदाच्या वर्षीच्या श्री गुरू गोविंदसिंगजी महाराज यांच्या 357 व्या पावन प्रकाश पूरब निमित्ताने दिनांक 15 , 16 आणि 17 डिसेंबर रोजी गुरुद्वारामध्ये सालाना जोडमेलाचे आयोजन करण्यात आले होते.याप्रसंगी भजन,कीर्तन,लंगर आदी धार्मिक कार्यक्रम साजरे करण्यात आले , तीन दिवस कथा आणि किर्तन सादर करण्यात आले. सालाना जोडमेला निमित्ताने गुरुद्वाराला आकर्षक अशी विद्युत रोषणाई करण्यात आली असुन या उत्सवामध्ये अनेक राज्यातील शीख बांधव , मान्यवर आणि कलाकार सहभागी झाले होते.

गुरुद्वारा पासुन संपुर्ण मनमाड शहरामध्ये सालाना जोडमेला निमित्ताने भव्य स्वरूपात नगर किर्तनाचे आयोजन करण्यात आले, यामध्ये तलवारीबाजी आणि यासारखे साहसी खेळ खेळणारे पथक , पंजाबी बँड , ढोल-ताशा , नगारा , हलकी आदी पथकांसह पवित्र पंचप्यारे आकर्षक सजावट केलेला रथ सहभागी झाले होते.

याप्रसंगी देशातील अनेक भागातुन शीख बांधव आणि शहरातील सर्व धर्मिय नागरिक आणि भाविक या उत्सवात सहभागी झाले होते.


अजून बातम्या वाचा..

ग्रंथालयांच्या अडचणी सोडवण्यासाठी शासन प्रयत्नशील उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील

ग्रंथालयांच्या अडचणी सोडवण्यासाठी शासन प्रयत्नशील उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील

  पुणे - जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत ग्रंथालयांना अनुदान उपलब्ध करून देण्यासाठी, शासन प्रयत्न...

read more
आंतरराष्ट्रीय खेळाडू मुकुंद संतोष आहेर साईराज राजेश परदेशी यांना महाराष्ट्र शासनाचा जिल्हा गुणवंत खेळाडू पुरस्कार जाहीर

आंतरराष्ट्रीय खेळाडू मुकुंद संतोष आहेर साईराज राजेश परदेशी यांना महाराष्ट्र शासनाचा जिल्हा गुणवंत खेळाडू पुरस्कार जाहीर

राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय वेटलिफ्टिंग स्पर्धांमध्ये सातत्याने उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या मनमाड...

read more
मनमाड येथे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातर्फे पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा तीव्र निषेध.

मनमाड येथे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातर्फे पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा तीव्र निषेध.

मनमाड, दि. २५ एप्रिल २०२५: जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे नुकत्याच घडलेल्या भीषण दहशतवादी हल्ल्याचा...

read more
.