loader image

के आर टी मध्ये संत गाडगेबाबा यांना अभिवादन

Dec 22, 2023


के आर टी स्कूल अँड ज्युनियर कॉलेजमध्ये संत गाडगेबाबा यांची पुण्यतिथी साजरी करण्यात आली.
कार्यक्रमाचे आयोजन इयत्ता सातवीच्या विद्यार्थ्यांनी केले होते. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी शाळेचे प्राचार्य मुकेश मिसर, मुख्याध्यापक दीपक व्यवहारे, उपप्राचार्य वैभव कुलकर्णी, विश्वस्त धनंजय निंभोरकर यांच्या हस्ते संत गाडगेबाबा यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.इयत्ता सातवी च्या ओवी सांगळे,सायली गोरे या मुलींनी संत गाडगेबाबा यांच्या विषयी आपले विचार मांडले. संत गाडगेबाबा हे थोर मराठी संत व समाज सुधारक होते. चिंध्याची गोधडी हे त्यांचे महावस्त्र होते. त्यांच्या हातात गाडगे असायचे म्हणून लोक त्यांना गाडगे महाराज म्हणून ओळखत. समाजात लोकसेवेचे व्रत त्यांनी स्वीकारले. समाजात सुधारणा व्हावी म्हणून त्यांनी कीर्तनाचे माध्यम वापरले ते गावोगावी फिरले. व कीर्तनाच्या माध्यमातून लोक जागृती केली. गावोगावी फिरताना त्यांनी हातातील खराट्याने गावांचे रस्ते झाडले. कीर्तनातील त्यांचे उपदेश सर्वसामान्यांना उपयुक्त ठरतील असेच होते. माणसाने स्वच्छता राखावी,चोरी करू नये,दारू पिऊ नये असे उपदेशही आपल्या कीर्तनातून देत असत. या विद्यार्थ्यांना प्रवीण आहेर यांचे मार्गदर्शन लाभले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन लोकेश भिल्लाडे आणि कबीर बोरसे यांनी केले.


अजून बातम्या वाचा..

.