नांदगाव : मारुती जगधने
दुभाजक संपताच रस्ता अरुंद असल्याने व त्याठिकाणी दिशादर्शक फलक किंवा रिफ्लेक्टर नसल्याने दुभाजक रस्ता न कळाल्याने केमीकल वाहून नेनारा मालट्रक दुभाजकावर आदळल्याने झालेल्या अपघातात गाडीवे आठ टायर एकाच वेळी फुटल्याने मोठा आवाज झाला. ही घटना नांदगाव पासून ४ थ्या कि मीवर फुलेनगर येथे घडली.
मार्गावरील रस्ता काही ठिकाणी अरूद रस्ता असल्याने अपघात होत आहेत. असाच काहीसा अपघात फुलेनगर येथील दुभाजका जवळील अरूंद रस्त्यामुळे मनमाडहून नांदगाव मार्गे केमीकल घेउन जाणार्या १६ चाकी मालट्रक नं के ए ५६/६७४६
राञीच्या वेळी दिशादर्शक फलक नसल्याने दुभाजकावर जाऊन घसरला त्यात क्लीनर बाजुचे आठ टायर फुटल्याने एकाच वेळी मोठा आवाज झाला १६ चाकी गाडी विरुध्ददिशेने जाऊन रोडच्या मध्यभागी थांबली यात मालट्रकचे सुमारे तिन लाखाचे नुकसान झाले असून या मालवाहुट्रक मध्ये २० टन केमीकल भरलेले आहे .माञ या अपघातात कोणतीच प्राणहाणी झाली नाही सध्या हा मालतट्रक रोडवर पडून आहे .
चालक शंकर गायकवाड वय ४० रा कल्याण हा अहमदाबादहुन केमीकल भरुन हैद्राबाद येथे जात होता या दरम्यान मालेगाव मनमाड नांदगाव मार्गे जात असताना फुलेनगर हद्दीत ४ थ्या किमीवर हा अपघात झाला.केवळ दिशा दर्शक फलक नसल्याने दि २१ रोजी राञी ९ वा ही घटना घडली. माञ दुसर्यादिवसी सकाळी चोरट्यानी या ट्रकमधिल टेपरेकाँर्ड व चार्जर,धुम्रपाणाच्या पुड्या पळविल्या या मार्गवर फुलेनगर हद्दीत दुभाजकाजवळ दिशादर्शक फलक बसविण्याची मागणी वाहन धारकांनी केली .
शिवाय या भागातील दुभाजकावरील सर्व पथदिप बंद असतात शिवाय या दुभाजकावर रिफ्लेक्टर बसविण्यावी गरज आहे.
दरम्यना या मार्गवर नांदगाव शांतीबाग वस्तीजवळ शहरातुन बाहेर जानारा मार्ग घरांजवळ अत्यंत अरुंद असल्याने येथील वळणावर फलक लावण्याची मागणी होत आहे .
