loader image
[ays_poll id=7]

कृष्णा व्यवहारे मेघा आहेर आकांक्षा व्यवहारे साईराज परदेशी पूजा परदेशी मुकुंद आहेर यांची राष्ट्रीय वेटलिफ्टिंग स्पर्धेसाठी निवड

Dec 23, 2023

ईटानगर अरुणाचल प्रदेश येथे २८ डिसेंबर ते ८ जानेवारी दरम्यान होणाऱ्या राष्ट्रीय युथ ज्युनियर व सीनियर वेटलिफ्टिंग स्पर्धेसाठी कृष्णा संजय व्यवहारे मेघा संतोष आहेर आकांक्षा किशोर व्यवहारे साईराज राजेश परदेशी पूजा राजेश परदेशी यांची महाराष्ट्र राज्य वेटलिफ्टिंग संघात निवड करण्यात आली असून आंतरराष्ट्रीय खेळाडू मुकुंद संतोष आहेर राष्ट्रीय स्पर्धेसाठी रेल्वे चे प्रतिनिधित्व करणार आहे
औरंगाबाद येथे झालेल्या राज्य स्तरीय वेटलिफ्टिंग स्पर्धेतील कामगिरीच्या आधारावर वरील खेळाडूंची राष्ट्रीय स्पर्धेसाठी महाराष्ट्र वेटलिफ्टिंग संघात निवड करण्यात आली आहे
छत्रे विद्यालयाचे क्रीडा प्रशिक्षक प्रवीण व्यवहारे यांची ईटानगर येथे होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेसाठी महाराष्ट्र राज्य वेटलिफ्टिंग संघाचे प्रशिक्षक म्हणून नेमणूक करण्यात आली आहे
राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झालेल्या मनमाड च्या खेळाडूंच वैशिष्ठ्य म्हणजे पूजा परदेशी व साईराज परदेशी मेघा आहेर व मुकुंद आहेर आकांक्षा व्यवहारे व कृष्णा व्यवहारे ही एकमेकांची भावंडे आपले कसब आजमावणार आहेत
मेघा आहेर साईराज परदेशी आकांक्षा व्यवहारे हे छत्रे विद्यालयात शिकत असून कृष्णा व्यवहारे गुड शेफर्ड्स स्कूलचा विद्यार्थी आहे
यशस्वी खेळाडूना छत्रे विद्यालयाचे क्रीडा प्रशिक्षक प्रवीण व्यवहारे आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक तृप्ती पाराशर यांचे मार्गदर्शन लाभले आहे
छत्रे विद्यालयाचे आधारस्तंभ पी जी धारवडकर अध्यक्ष पी जे दिंडोरकर सचिव दिनेश धारवाडकर संचालक नाना कुलकर्णी प्रसाद पंचवाघ मुख्याध्यापक आर एन थोरात उपमुख्याध्यापक संदीप देशपांडे पर्यवेक्षिका संगीता पोतदार जय भवानी व्यायाम शाळेचे मोहन अण्णा गायकवाड डॉ विजय पाटील डॉ सुनील बागरेचा प्राचार्य डॉ दत्ता शिंपी गुड शेफर्ड्स स्कूलचे प्राचार्य क्लेमेंट नायडू क्रीडाप्रशिक्षक मनोज देशपांडे लकी रिसम महाराष्ट्र वेटलिफ्टिंग संघटनेचे सचिव संतोष सिंहासने अध्यक्ष सुधीर म्हाळसकर यशस्वी खेळाडूंचे अभिनंदन करुन पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.

अजून बातम्या वाचा..

जिल्हास्तरीय क्रिकेट सामण्यात भुमी क्रिकेट अकॅडमीतील खुशाल परळकर चे दमदार अर्धशतक तर युवराज शर्माचे चार बळी

जिल्हास्तरीय क्रिकेट सामण्यात भुमी क्रिकेट अकॅडमीतील खुशाल परळकर चे दमदार अर्धशतक तर युवराज शर्माचे चार बळी

  रविवार 04 मे 25 रोजी BCCI अंतर्गत असलेल्या महाराष्ट्र क्रिकेट आसोसिएशन क्रिकेट आसोसिएशन...

read more
पिंपरी हवेली येथील प्रतिष्ठित कापूस व्यापारी व समाजसेवक योगेश साहेबराव वाघ यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्त्यांचा शिवसेना पक्षात प्रवेश.

पिंपरी हवेली येथील प्रतिष्ठित कापूस व्यापारी व समाजसेवक योगेश साहेबराव वाघ यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्त्यांचा शिवसेना पक्षात प्रवेश.

  पिंपरी हवेली येथील सोसायटीचे माजी चेअरमन शिवाजी दामू वाघ बाळासाहेब वाघ पिंटू गांगुर्डे संजय...

read more
सिटू संघटनेसह विविध नगरपालिका कर्मचाऱ्यांचा महाराष्ट्र नगरपालिका कर्मचारी कामगार विकास सेनेत जाहीर प्रवेश

सिटू संघटनेसह विविध नगरपालिका कर्मचाऱ्यांचा महाराष्ट्र नगरपालिका कर्मचारी कामगार विकास सेनेत जाहीर प्रवेश

  "मनमाड शहरात कामगार भवन बांधणार : आमदार सुहास अण्णा कांदे." नांदगाव येथील आमदार निवासस्थानी...

read more
जिल्हास्तरीय क्रिकेट सामण्यात भुमी क्रिकेट अकॅडमीतील खुशाल परळकर शतकवीर तर मयंक भालेरावची अर्धशतकीय खेळी

जिल्हास्तरीय क्रिकेट सामण्यात भुमी क्रिकेट अकॅडमीतील खुशाल परळकर शतकवीर तर मयंक भालेरावची अर्धशतकीय खेळी

  गुरुवार 01 मे 25 रोजी BCCI अंतर्गत असलेल्या महाराष्ट्र क्रिकेट आसोसिएशन क्रिकेट आसोसिएशन...

read more
महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन अंडर 16 जिल्हास्तरीय क्रिकेट सामन्यात भुमी क्रिकेट अकॅडमीतील खुशाल परळकरची शतकीय खेळी हा – जिल्हास्तरीय सामण्यात पहिले शतक

महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन अंडर 16 जिल्हास्तरीय क्रिकेट सामन्यात भुमी क्रिकेट अकॅडमीतील खुशाल परळकरची शतकीय खेळी हा – जिल्हास्तरीय सामण्यात पहिले शतक

  गुरुवार 1 मे 25 रोजी BCCI अंतर्गत असलेल्या महाराष्ट्र क्रिकेट आसोसिएशन क्रिकेट असोसिएशन...

read more
.