loader image
[ays_poll id=7]

लाड- पागे समितीनुसार चतुर्थश्रेणीतील मैल कामगारांना शासकिय सेवेत घेण्याची मागणी

Dec 23, 2023

नांदगाव : मारुती जगधने
लाड-पागे समिती नुसार इतर जातीचे मेहतर समाजाचे कर्मचार्यांना शासकिय नोकरीत सामावुन घेतले जाते पण सार्वजनिक बांधकाम विभाग, जिल्हापरीषद, पाटबंधारे विभाग ,वनविभाग या क्षेञात काम करणारया कामगारांच्या वारसांना शासकिय सेवेत का सामावुन घेतले जात नाही. त्यांनाही सेवेत सामावुन घ्यावे अशी मागणी महाराष्ट्र राज्य लघुवेतन कर्मचारी संघ यांनी मुख्यमंञी, जिल्हाधिकारी यांच्याकडे केली आहे.
सार्वजनिक बांधकांम विभाग वर्ग चार चे कर्मचारी यांनी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंञी एकनाथ शिंदे व जिल्हाधिकारी नाशिक यांना दिलेल्या निवेदनात सार्वजनिक बांधकांम विभाग, जिल्हापरीषद, पाटबंधारे व वनविभाग यातील चतुर्थ श्रेणीतील कामगार हे मैल मजूर आहेत त्यांना रस्त्यांची व साईड पट्टयांची डागडुगी करुन वेळोवेळी स्वच्छता करावी लागते ते देखील सफाई कामगारात मोडतात त्या अनुशंगाने मैलगामगारांना शासकिय सेवेत सामावुन घेण्याची आग्रही मागणी मैल कामगारांनी केली आहे .परंतु शासनाकडुन या संदर्भात कोणताच खुलासा मिळालेला नाही त्यामुळे संघटना शासनाचा निषेध नोंदवत आहे .या संर्दभात राज्य लघुवेतन कर्मचारी संघटनेने २० डिसेंबर २०२३ रोजी नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयात समोर लक्ष वेधी आंदोलन केले. शासनाने या मैलकामगारांची दखल घ्यावी अन्यथा मैल कामगार, मजूर हे मुंबई आझाद मैदानावर अमरण उपोषण करतील असा इशारा संघटनेचे राजाराम आहिरे,अमोल शोगेकार,वाय एस पाटील,अशोक अरर अहिरे,पंडीत खैरनार,दिलीप खैरनार,बाळू आहिरे,तुळशीराम पहारे, नासिक जिल्हा अध्यक्ष अजीत शेख,राजु अहिरे,ढिवर,गणपत सुरसे,निवृती बोरसे साहेबराव सुरसे,विक्रम तावडे,वाल्मीक जोरवर,संभाजी खैरे,मच्छिंद जाधव,मधुकर अहिरे यांनी दिला आहे .

अजून बातम्या वाचा..

महात्मा गांधी विद्या मंदिर संस्थेच्या कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, मनमाड, ता. नांदगाव,जि. नाशिक महाविद्यालयास ‘स्वायत्त दर्जा’ प्रदान

महात्मा गांधी विद्या मंदिर संस्थेच्या कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, मनमाड, ता. नांदगाव,जि. नाशिक महाविद्यालयास ‘स्वायत्त दर्जा’ प्रदान

  मनमाड :- महात्मा गांधी विद्या मंदिर संस्थेच्या कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, मनमाड,...

read more
व्यापारी महासंघाचे अध्यक्ष राजाभाऊ पारीक, अनिल पारीक आणि द्वारकेश पारीक ह्यांच्यावर झालेल्या प्राणघातक हल्ल्याच्या निषेधार्थ बुधवारी मनमाड बंद

व्यापारी महासंघाचे अध्यक्ष राजाभाऊ पारीक, अनिल पारीक आणि द्वारकेश पारीक ह्यांच्यावर झालेल्या प्राणघातक हल्ल्याच्या निषेधार्थ बुधवारी मनमाड बंद

मनमाड -- मनमाड शहर व्यापारी महासंघ चे अध्यक्ष राजाभाऊ पारीक तसेच त्यांचे लहान बंधू अनिल पारीक व...

read more
एक दिवशीय जिल्हास्तरीय टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेत महामानव फॉउंडेशन,मालेगाव संघ विजेता.

एक दिवशीय जिल्हास्तरीय टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेत महामानव फॉउंडेशन,मालेगाव संघ विजेता.

  मनमाड:-एम.एस.स्पोर्ट्स,मनमाड आयोजित भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर रेल्वे क्रिडांगण,मनमाड...

read more
मनमाडमधील धाडसी घरफोडी करणारे तीन सराईत गुन्हेगार अटकेत, १ कोटी ५ लाखांचा माल जप्त

मनमाडमधील धाडसी घरफोडी करणारे तीन सराईत गुन्हेगार अटकेत, १ कोटी ५ लाखांचा माल जप्त

मनमाड : मनमाड शहरातील डमरे कॉलनी परिसरातील व्यावसायिक मुर्तजा अब्दुल हुसेन रस्सीवाला यांच्या घरात...

read more
.